lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > २०२३ मध्ये भारतीयांनी अलेक्झाला 'हे' प्रश्न विचारून भंडावून साेडलं- तुम्हीही असंच काही विचारलं होतं?

२०२३ मध्ये भारतीयांनी अलेक्झाला 'हे' प्रश्न विचारून भंडावून साेडलं- तुम्हीही असंच काही विचारलं होतं?

Most Frequently Asked Questions To Amazon Alexa: २०२३ या वर्षांत भारतीयांनी अलेक्झालो कोणते प्रश्न सर्वाधिक विचारले, याविषयीची माहिती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2024 03:18 PM2024-02-19T15:18:50+5:302024-02-19T15:19:41+5:30

Most Frequently Asked Questions To Amazon Alexa: २०२३ या वर्षांत भारतीयांनी अलेक्झालो कोणते प्रश्न सर्वाधिक विचारले, याविषयीची माहिती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे...

Most frequently asked questions to amazon alexa in 2023 by Indians | २०२३ मध्ये भारतीयांनी अलेक्झाला 'हे' प्रश्न विचारून भंडावून साेडलं- तुम्हीही असंच काही विचारलं होतं?

२०२३ मध्ये भारतीयांनी अलेक्झाला 'हे' प्रश्न विचारून भंडावून साेडलं- तुम्हीही असंच काही विचारलं होतं?

Highlights“Alexa, are you single?” किंवा “अलेक्झा क्या तूम मेरी बेहेन बनोगी” असे मजेशीर प्रश्न विचारण्यातही भारतीय मागे नाहीत. 

अलेक्झा आता जणू काही आपल्या सगळ्यांचीच मैत्रिण झाली आहे. अगदी शाळकरी मुलांशीही तिची चांगलीच गट्टी जमलेली आहे. म्हणूनच तर त्यांना कंटाळा आला तर कधी ते तिला एखादा जोक सांगायला लावतात, तर कधी स्वत:ला माहिती नसलेला सामान्य विज्ञानाच अवघड प्रश्न तिच्याकडून चटकन सोडवून घेतात. वयस्कर मंडळी सुरुवातीला अलेक्झाशी मैत्री करायला बिचकत होते, पण आता मात्र बऱ्याच जणांची तिच्याशी खूप छान ओळख झाली आहे. बाहेरगावी जाताना, ड्रायव्हिंग करताना तर अलेक्झा आपल्या मदतीला येतेच.. आपण नेहमीच तिला काही ना काही प्रश्न विचारतो. (Most frequently asked questiones to amazon alexa in 2023 by Indians)

 

आता २०२३ या वर्षांत तिला जे बरेच प्रश्न विचारले गेले, त्यापैकी सगळ्यात जास्त जणांकडून विचारण्यात आलेले प्रश्न कोणते होते, याची यादी नुकतीच ॲमेझॉनने जाहीर करण्यात आली आहे.

वजन कमी होईना? वारंवार ॲसिडिटी- अपचन होते? गरम पाण्यात चिमूटभर 'हा' पदार्थ टाकून प्या...

ॲमेझॉनने असेही सांगितले आहे की मागच्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी अलेक्झाला विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये ३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. “Alexa, are you single?” किंवा “अलेक्झा क्या तूम मेरी बेहेन बनोगी” असे मजेशीर प्रश्न तिला विचारण्यातही भारतीय मागे नाहीत. 

 

सर्वाधिक विचारल्या गेलेल्या प्रश्नांची जी यादी जाहीर झाली आहे, त्यात भारतीयांनी अलेक्झाला सामान्य ज्ञानाबाबत सर्वाधिक प्रश्न विचारले आहेत. उदा. आजच्या तारखेचे महत्त्व काय, आज कोणत्या मोठ्या लोकांचा वाढदिवस आहे.

प्रियांका चोप्राच्या सुंदर त्वचेचं सिक्रेट सांगतेय तिची आई- ७ दिवसांत त्वचा होईल चमकदार, करून पाहा

यानंतरचे प्रश्न प्रसिद्ध व्यक्तींबाबत आहे. सेलिब्रिटींचे नेट वर्थ जाणून घेण्यात तसेच त्यांचे वय जाणून घेण्यात खूप लोकांना रस दिसला. अनेकांनी वेगवेगळ्या रेसिपी अलेक्झाला विचारल्या. त्यानंतर रिॲलिटी शो किंवा डेली सोप्सवर सध्या काय सुरू आहे, असा प्रश्न विचारणारेही खूप लाेक आहेत. कोणत्याही प्रश्नाचं झटपट आणि स्मार्टली उत्तर देते, म्हणूनच तर अलेक्झा दिवसेंदिवस सगळ्यांना आवडते आहे.. 

 

Web Title: Most frequently asked questions to amazon alexa in 2023 by Indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.