lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > मोहम्मद शमीवर बेताल आरोप करणारी हसीन जहाँ कोण? तिची शमीवर एवढी खुन्नस का आहे?

मोहम्मद शमीवर बेताल आरोप करणारी हसीन जहाँ कोण? तिची शमीवर एवढी खुन्नस का आहे?

Mohammed Shami-Hasin Jahan controversy : क्रिकेटपटू मोहम्मद शमीची बायको हसीन जहाँ, तिने ‘त्याच्या’पासून बऱ्याच गोष्टी लपवल्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2023 02:30 PM2023-11-17T14:30:32+5:302023-11-17T14:31:55+5:30

Mohammed Shami-Hasin Jahan controversy : क्रिकेटपटू मोहम्मद शमीची बायको हसीन जहाँ, तिने ‘त्याच्या’पासून बऱ्याच गोष्टी लपवल्या..

Mohammed Shami-Hasin Jahan controversy | मोहम्मद शमीवर बेताल आरोप करणारी हसीन जहाँ कोण? तिची शमीवर एवढी खुन्नस का आहे?

मोहम्मद शमीवर बेताल आरोप करणारी हसीन जहाँ कोण? तिची शमीवर एवढी खुन्नस का आहे?

टीम इंडियाचा (Team India) क्रिकेटपटू मोहम्मद शमीवर (Mohammad Shami) सध्या अख्खं भारत कौतुकाचं वर्षाव करीत आहे. कारण एकट्या पठ्ठ्याने ७ विकेट्स घेत न्युझीलंडच्या टीमला धूळ चारली. भारतानं विश्वचषक सेमी फायनलमध्ये न्युझीलंडचा ७० धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. हा सामना चुरशीचा ठरला. कारण या सामन्यात विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी बॅट फिरवत शतक झळकावली. तर मोहम्मद शमीने ७ विकेट्स घेत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. वर्ल्ड कपमध्ये ५० विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज बनला.

या सरस कामगिरीनंतर शमीचे तोंड भरून कौतुक तर होत आहेच, मात्र, दुसरीकडे त्याच्या बायकोची चर्चा जोरदार सुरु आहे. कारण या अभूतपूर्व कामिगिरीची दखल हसीन जहाँ हिने घेतलेली नाही. ते दोघे वेगळे राहत असून, त्याच्या बायकोने आतापर्यंत अनेक आरोप-प्रत्यारोप करत शमीवर केस ठोकली आहे. त्यामुळे हसीन जहाँ नक्की आहे तरी कोण? तिच्यात आणि शमीमध्ये नेमकं बिनसलं काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे(Mohammed Shami-Hasin Jahan controversy).

हसीन जहाँ आणि शमीचं नातं कसं होतं?

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचं लग्न ६ जून २०१४ साली कोलकाता येथे झाले. मात्र, लग्नानंतर काही वर्षात त्यांच्यात खटके उडाल्याचे सांगण्यात येते. २०१८ सालापासून ते दोघेही वेगळे राहतात. मात्र, हे जोडपं एकमेकांपासून वेगळे जरी राहत असले तरी, तिने आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच ठेवली. 'शमी घरी पैसे खर्च करायला देत नाही', 'त्याचे बाहेर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरु आहे', 'शमी देशद्रोही आहे', 'हुंड्यासाठी छळ करतो', शिवाय शमीने धोका दिला असल्याचं देखील तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. मात्र, हे सगळे आरोप फेटाळून शमी पुन्हा नव्याने उभा राहिला.

मला माफ करा, माझे निधन झाले! कॅन्सरशी लढली पण सोशल मिडियात पोस्ट केली आणि...

हसीन जहाँ नक्की आहे तरी कोण?

हसीन जहाँ ही एक फॅशन मॉडल होती. शिवाय ती कोलकाता नाइट रायडर्स या संघासाठी चीअरलीडर बनली. याच दरम्यान, दोघांची ओळख झाली, आणि दोघांनी एकमेकांसोबत लग्नाच्या बेडीत अडकण्याचं ठरवलं. घरच्यांच्या विरोधात जात शमीने हसीनसोबत लग्न केलं. मात्र, दोघेही या बेडीतून लवकरच मुक्त झाले.

शमीने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'हसीनने आपल्या पहिल्या लग्नाबद्दल सांगितले नव्हते. तिचे पहिले लग्न २००२ साली तिचा प्रियकर सैफुद्दीनसोबत झाले होते. ८ वर्षांच्या संसारानंतर २०१० झाली त्यांनी विभक्त होण्याचं ठरवलं. दरम्यान, तिला २ मुलं असून, तिने लग्नाच्या वेळी तिच्या दोन मुलांबद्दल चुकीची माहिती दिली होती. तिने ही दोन मुलं आपल्या बहिणीच्या मुली असल्याचं सांगितलं होतं. मला लग्नाच्या बऱ्याच वर्षानंतर तिचं पहिलं लग्न झालं असल्याचं कळलं'

आमीरशी ५ वर्षे अबोला, सलमानला लग्नाला नकार आणि शाहरुखची दोस्ती- हसऱ्या जुही चावलाची अनकही कहाणी

'शमी तू इंग्रजी सुधार, मी लग्नाला तयार'

गेल्या काही दिवसांपासून शमीच्यामागे एक सौंदर्यवती लागली आहे. अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेली पायल घोषने शमीला थेट लग्नाची मागणी घातली आहे. तिने सोशल मिडीयावर, ''शमी तू तुझं इंग्लिश सुधार, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे.'' अशा आशयाचं पोस्ट केलं असून, यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Web Title: Mohammed Shami-Hasin Jahan controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.