lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > "संदिप को बोलो...." स्विगी ऑर्डर लवकर यावी म्हणून बघा काकांनी काय मेसेज लिहिला....

"संदिप को बोलो...." स्विगी ऑर्डर लवकर यावी म्हणून बघा काकांनी काय मेसेज लिहिला....

Viral Screenshot of Funniest Swiggy Order: या मेसेजचा स्क्रिनशॉट सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर चांगलाच हशा पिकतो आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2023 04:09 PM2023-08-18T16:09:24+5:302023-08-18T16:10:19+5:30

Viral Screenshot of Funniest Swiggy Order: या मेसेजचा स्क्रिनशॉट सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर चांगलाच हशा पिकतो आहे...

Man hilarious craziest delivery instruction to swiggy leaves everyone laugh, viral screenshot of funniest swiggy order | "संदिप को बोलो...." स्विगी ऑर्डर लवकर यावी म्हणून बघा काकांनी काय मेसेज लिहिला....

"संदिप को बोलो...." स्विगी ऑर्डर लवकर यावी म्हणून बघा काकांनी काय मेसेज लिहिला....

Highlightsहा मेसेज वाचून जेवणाची ऑर्डर पटकन आली की नाही, ते माहिती नाही. पण त्यांनी दिलेली ऑर्डर मात्र चांगलीच गाजते आहे.

आपल्याकडे ओळखी सांगून फार पटापट कामं करून घेतली जातात. कामानिमित्त कोणत्याही ऑफिसमध्ये गेलं आणि तिथे जर संबंधित व्यक्ती आपलं काम करून द्यायला वेळ लावत असेल, तर आपण कशी ना कशी, कुठूनतरी एखादी ओळख काढतो. किंवा काही स्मार्ट लोक त्या ऑफिसमध्ये जाण्याच्या आधीच ओळखीचं एखादं दमदार नाव सोबत घेऊन गेलेले असतात. त्यांचं नाव सांगितलं की मग कशी कामं पटापट होतात... किंवा याउलट "माझं नाव सांग त्यांना, पटकन होईल काम..." असं सांगणारेही असतात. असे दोन्ही अनुभव आपण कधी ना कधी घेतलेलेच असतात.. असंच एक गृहस्थ स्विगी ऑर्डर (swiggy order) देताना करायला गेले आणि चांगलेच व्हायरल झाले (Viral Screenshot of Funniest Swiggy Order).

 

@pachtaogaybro या ट्विटर हॅण्डलवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. ज्या मुलीने पोस्ट शेअर केली आहे, ती म्हणतेय की या आठवड्यात आम्ही बाहेरून जेवण मागवायचं ठरवलं. वडिलांनी मोबाईलवरून ऑर्डर दिली आणि खाली "संदिप को बोलो बिट्टू का ऑर्डर है, जल्दी करा देगा..." असा छानसा मेसेजही लिहून पाठवला.

रोज फक्त १० मिनिटं करा २ व्यायाम, पोटावरची चरबी झरझर होईल कमी- मिळेल फिटनेससह उत्तम फिगर

एरवी ओळख सांगितली की कामं पटापट होतात, या सर्वसामान्य भारतीयांच्या अनुभवानुसार त्यांनी मेसेज लिहिला असावा. पण तो वाचून मात्र मुलीला हसणे थांबवता आले नाही. तिने त्या मेसेजचा स्क्रिनशाॅट काढून तो थेट ट्विटरवर शेअर केला. त्यानंतर तो आता जबरदस्त व्हायरल झाला आहे. काकांनी लिहिलेला हा मेसेज वाचून जेवणाची ऑर्डर पटकन आली की नाही, ते माहिती नाही. पण त्यांनी दिलेली ऑर्डर मात्र चांगलीच गाजते आहे.


 

Web Title: Man hilarious craziest delivery instruction to swiggy leaves everyone laugh, viral screenshot of funniest swiggy order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.