बहुतेकवेळा कडाक्याच्या उन्हात बाहेरचे तापमान जसे वाढते, तसा त्याचा थेट परिणाम आपल्या घरातील उपकरणांवर, विशेषतः फ्रिजवर होतो. अशावेळी फ्रिजच्या कुलिंगची समस्या अनेक घरांमध्ये डोकेदुखी ठरते. कितीही प्रयत्न केला तरी फ्रिज हवा तसा गार होत नाही, परिणामी दूध फाटणे, भाज्या सुकणे किंवा अन्नापदार्थ नासणे, दुर्गंधी येणे अशा समस्या सुरू होतात(Improve refrigerator cooling efficiency).
वाढत्या तापमानामुळे फ्रिजला नेहमीपेक्षा जास्त काम करावे लागते, पण काहीवेळा केवळ सेटिंग बदलून किंवा छोट्या टिप्स फॉलो करून आपण फ्रिजचे कुलिंग पुन्हा पहिल्यासारखे करू शकतो. फ्रिज नीट काम करत नाही, असं वाटून आपली चिंता अधिक वाढते. पण काळजी करू नका काही सोपे आणि घरगुती उपाय करून तुम्ही फ्रिजचं कुलिंग पुन्हा वाढवू शकता. जर तुम्हीही उन्हाळ्यात फ्रिजच्या कमी कुलिंगमुळे हैराण असाल आणि फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ खराब होण्याची भीती वाटत (how to make refrigerator colder quickly) असेल तर फ्रिजचे कुलिंग वाढवण्यासाठी आणि ते टिकवून (how to improve cooling in old refrigerator at home) ठेवण्यासाठी नेमके कोणते खास उपाय करावेत ते पाहूयात.
फ्रिजची कुलिंग वाढवण्यासाठी सोपे घरगुती उपाय...
१. फ्रिज भिंतीपासून थोड्या अंतरावर ठेवा :- फ्रिज भिंतीला खेटून ठेवल्याने त्यातील उष्णता बाहेर पडू शकत नाही, ज्याचा परिणाम कुलिंगवर होतो. फ्रिजच्या मागे कमीत कमी ४-६ इंचाची जागा (गॅप) नक्की ठेवा, जेणेकरून हवेचा प्रवाह खेळता राहील.
२. कॉइल्सची नियमित स्वच्छता करा :- फ्रिजच्या मागे किंवा खाली असलेल्या कंडेंसर कॉइल्सवर धूळ साचल्याने कुलिंग कमी होते. दर २-३ महिन्यांनी यांची स्वच्छता करणे गरजेचे आहे, जेणेकरून फ्रिज चांगल्या प्रकारे काम करू शकेल.
३. दरवाजावरील रबरी गॅस्केट तपासा :- जर फ्रिजचा दरवाजा नीट बंद होत नसेल, तर थंड हवा बाहेर निघून जाते. जर रबर गॅस्केट लूज किंवा खराब झाले असेल तर ते बदलून घ्या, यामुळे कुलिंगमध्ये लगेच सुधारणा होते.
४. फ्रिजमध्ये जास्त सामान भरू नका :- खूप जास्त सामान एकाचवेळी फ्रिजमध्ये ठेवल्याने थंड हवेचे रोटेशन थांबते. फ्रिजमध्ये वस्तू / पदार्थ व्यवस्थित ठेवा आणि गरजेपेक्षा जास्त सामान भरणे टाळा, जेणेकरून प्रत्येक कोपऱ्यापर्यंत कुलिंग पोहोचू शकेल.
मूग डाळ आणि रव्याचे कुरकुरीत पापड! कढईत टाकताच चौपट फुलतात - चवीला अप्रतिम आणि पौष्टिक...
५. गरम अन्नपदार्थ थेट फ्रिजमध्ये ठेवू नका :- गरम अन्नपदार्थ थेट फ्रिजमध्ये ठेवल्याने आतील तापमान वाढते, ज्याचा ताण कुलिंग सिस्टमवर पडतो. नेहमी अन्नपदार्थ थंड झाल्यानंतरच फ्रिजमध्ये ठेवावे.
६. योग्य तापमान सेट करा :- फ्रिजचे तापमान योग्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सामान्यतः फ्रिजसाठी ३ ते ५°C आणि फ्रीजरसाठी -१८°C तापमान योग्य मानले जाते. यामुळे कुलिंग उत्तम राहते.
७. दरवाजा वारंवार उघडणे टाळा :- फ्रिजचा दरवाजा वारंवार उघडल्याने थंड हवा बाहेर पडते आणि कुलिंग कमी होते. गरज पडेल तेव्हाच दरवाजा उघडा आणि तो लगेच बंद करण्याचा प्रयत्न करा.
८. वेळोवेळी डीफ्रॉस्ट करा :- जर तुमच्या फ्रिजमध्ये जास्त बर्फ साचत असेल, तर त्याचा कुलिंगवर परिणाम होतो. फ्रिज व्यवस्थित चालण्यासाठी वेळोवेळी डीफ्रॉस्ट करणे गरजेचे आहे.
