उन्हाळा सुरू झाला असून सूर्याचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. रणरणत्या उन्हामुळे आणि वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत असून घामाच्या धारांनी सर्वजण हैराण झाले आहेत. अशा कडक उन्हात बाहेर पडणे तर कठीण झालेच आहे, पण घरात बसल्यावरही असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. (how to clean cooler) या वाढत्या तापमानापासून आणि घामापासून तात्पुरती सुटका मिळवण्यासाठी आपल्याला फॅन, कुलर आणि एसी यांसारख्या साधनांची अत्यंत गरज भासत आहे. (Best way to disinfect cooler water)
आपल्यापैकी अनेकांच्या घरात फॅनसह कुलर देखील आहे. उकाड्यापासून आराम मिळण्यासाठी आपण कुलरचा वापर करतो. काही दिवस कुलर वापरल्यानंतर त्यातून कुबट आणि घाण वास येऊ लागतो. अनेकदा कुलरमधील पाणी वेळेवर न बदलल्यामुळे किंवा कुलरच्या 'हनीकॉम्ब पॅड्स'मध्ये धूळ साचल्यामुळे हा त्रास होतो. (Air cooler cleaning hacks) या दुर्गंधीमुळे केवळ घराचे वातावरण खराब होत नाही, तर श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो आणि डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांचे धोके वाढतात. अनेकांना असे वाटते की कुलर स्वच्छ करणे हे मोठे जिकिरीचे काम आहे, म्हणून ते याकडे दुर्लक्ष करतात. पण काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्यास आपला कुलर तर स्वच्छ होईलच तसेच दुर्गंधीही येणार नाही.
1. कुलरच्या पाण्यातून येणारा वास घालवण्यासाठी तुरटी हा सर्वात स्वस्त आणि उत्तम पर्याय आहे. तुरटीचा एक छोटा तुकडा किंवा थोडी तुरटी पावडर कुलरच्या पाण्यात घाला. तुरटीमध्ये नैसर्गिकरित्या पाणी शुद्ध करण्याचे आणि जंतू मारण्याचे गुणधर्म असतात. यामुळे पाण्यातील घाण तळाला जाऊन बसते आणि पाण्याचा कुबट वास कमी होतो.
2. आपल्याला नैसर्गिक उपाय करायचा असेल तर कुलरच्या पाण्यात कडुनिंबाची पाने एका कापडी पिशवीत बांधून टाका. कडुनिंब हा उत्तम जंतुनाशक आहे. यामुळे पाण्यात डास होत नाहीत आणि बॅक्टेरियांची वाढ देखील थांबते.
3. कुलरमधील पाणी बदलताना त्यात थोडा बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घाला. हे मिश्रण नैसर्गिक डिओडोरायझर म्हणून काम करते. लिंबामुळे कुलरमध्ये एक प्रकारचा ताजेपणा जाणवतो आणि दुर्गंधी नाहीशी होते.
4. कुलरमधील पाणी फक्त बदलून उपयोग नाही. कुलरच्या आजूबाजूला असलेल्या गवत किंवा हनिमकोंब पॅड्समध्ये धूळ आणि शेवाळ साचते. महिन्यातून किमान दोनदा हे पॅड्स काढून पाण्याने नीट धुवावेत. यामुळे हवेचा फ्लो सुधारतो आणि हवा सुगंधी राहते.
5. कुलर वापरणे बंद केल्यावर किंवा रात्री पाणी भरण्यापूर्वी एकदा खराब पाणी पूर्णपणे काढून टाका. आठवड्यातून किमान एकदा कुलर पूर्णपणे कोरडा करून उन्हात ठेवल्यास त्यात बॅक्टेरिया तयार होत नाहीत.
