lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > Femina Miss India 2022 : मिस इंडिया स्पर्धेत वडिलांचा हात धरून नेहा धूपियाच्या लेकीची एण्ट्री; पाहा व्हायरल व्हिडिओ

Femina Miss India 2022 : मिस इंडिया स्पर्धेत वडिलांचा हात धरून नेहा धूपियाच्या लेकीची एण्ट्री; पाहा व्हायरल व्हिडिओ

Femina Miss India 2022 : या दृश्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 04:56 PM2022-07-04T16:56:14+5:302022-07-04T17:01:34+5:30

Femina Miss India 2022 : या दृश्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Femina Miss India 2022 : Neha dhupias daughter is touching the hearts of the fans a lot angad bedi took care of this | Femina Miss India 2022 : मिस इंडिया स्पर्धेत वडिलांचा हात धरून नेहा धूपियाच्या लेकीची एण्ट्री; पाहा व्हायरल व्हिडिओ

Femina Miss India 2022 : मिस इंडिया स्पर्धेत वडिलांचा हात धरून नेहा धूपियाच्या लेकीची एण्ट्री; पाहा व्हायरल व्हिडिओ

'फेमिना मिस इंडिया 2022' या सौंदर्य स्पर्धेच्या (Femina Miss India 2022) अनेक सुंदर स्पर्धक आणि बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये एक लहान मुलगी सर्वांचे मन जिंकत आहे. ही मुलगी दुसरी कोणी नसून नेहा धुपिया (Neha Dhupia) आणि अंगद बेदी (Angad Bedi) यांची मुलगी मेहर आहे. 'फेमिना मिस इंडिया'च्या भव्य कार्यक्रमात, नेहा धुपियाची मुलगी तिचे वडील अंगद बेदी यांचा हात धरून चालताना दिसली. या दृश्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Neha dhupia's daughter is touching the hearts of the fans a lot angad bedi took care of her)

JIO वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये रविवारी रात्री आयोजित फेमिना मिस इंडिया 2022 च्या भव्य कार्यक्रमात नेहा धुपिया देखील पोहोचली. या कार्यक्रमात नेहा धुपिया रेड कार्पेटवर दिसली आणि त्यानंतर ती जजिंग पॅनेलमध्येही सामील झाली. या कार्यक्रमात नेहा तिची जबाबदारी पार पाडत होती. 

 पहिल्यांदाच बदाम खाऊन पाहिले अन् खारूताईनं अशी काही रिएक्शन दिली; पाहा व्हायरल व्हिडिओ

तर अंगद बेदी तिच्या राजकुमारीची काळजी घेण्यात व्यस्त होता. पाहुणे आणि प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या या कार्यक्रमात वडील अंगद बेदी आपली मुलगी मेहेरचा हात धरताना दिसत आहेत. मेहेर रेड कार्पेटवर वडीलांसोबत चालताना दिसली. नेहा धूपिया सध्या काही काळ चित्रपटाच्या पडद्यापासून दूर आहे, तरीही ती सोशल मीडिया आणि कार्यक्रमांमध्ये आपली उपस्थिती नोंदवत असते.

 गणिताच्या टिचरला 'बकरी' म्हणायचे विद्यार्थी, त्यांनी सांगितलेलं कारण ऐकून शिक्षिकेच्या डोळ्यात आलं पाणी..

या कार्यक्रमात 21 वर्षीय सिनी शेट्टीला (Sini Shetty)'मिस इंडिया'चा मुकुट देण्यात आला. (Miss India 2022 Winner)  तर राजस्थानची रुबल शेखावत फेमिना मिस इंडिया 2022 ची पहिली रनर अप आणि उत्तर प्रदेशची शिंता चौहान फेमिना (Shinata Chauhan) मिस इंडिया 2022 ची दुसरी रनर अप ठरली.
 

Web Title: Femina Miss India 2022 : Neha dhupias daughter is touching the hearts of the fans a lot angad bedi took care of this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.