Lokmat Sakhi >Relationship > हाऊ टू मर्डर युअर हजबंड?- असं पुस्तक लिहून तिनंच केला नवऱ्याचा खून, पण..

हाऊ टू मर्डर युअर हजबंड?- असं पुस्तक लिहून तिनंच केला नवऱ्याचा खून, पण..

नॅन्सी ब्रॉफी या लेखिकेचं हाऊ टू मर्डर युअर हजबंड हे गाजलेलं पुस्तक, मात्र स्वत:च्या नवऱ्याचा खून करताना ती काही गोष्टी विसरली..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 04:23 PM2022-05-19T16:23:16+5:302022-05-19T16:25:50+5:30

नॅन्सी ब्रॉफी या लेखिकेचं हाऊ टू मर्डर युअर हजबंड हे गाजलेलं पुस्तक, मात्र स्वत:च्या नवऱ्याचा खून करताना ती काही गोष्टी विसरली..

Nancy crampton brophy, she wrote how to murder your husband and then her husband found dead | हाऊ टू मर्डर युअर हजबंड?- असं पुस्तक लिहून तिनंच केला नवऱ्याचा खून, पण..

हाऊ टू मर्डर युअर हजबंड?- असं पुस्तक लिहून तिनंच केला नवऱ्याचा खून, पण..

Highlightsतिच्या पुस्तकापेक्षाही प्रत्यक्ष कहाणीचा खराखुरा प्लॉट जास्त रंजक आहे.

‘हाऊ टू मर्डर युअर हजबंड?’ अशा नावचं कोणी पुस्तक लिहू शकतं का? लिहिलं तर आपणच लिहिलेलं पुस्तक वाचून आपल्याच नवऱ्याला मारुन टाकू शकतं का? विश्वास बसणार नाही पण अमेरिकेत राहणाऱ्या एका ७१ वर्षांच्या महिलेनं असं करुन दाखवलं आहे. त्या लेखिोचं नाव आहे नॅन्सी क्रॅम्प्टन ब्रॉफी. नॅन्सी एक जान्यामान्या लेखिका आहेत. त्यांनी लिहिलेलली ‘राँग नेव्हर फेल्ट सो राइट’ ही पुस्तकांची मालिका गाजली. त्यातही द राँग हजबंड, द राँग लव्हर ही पुस्तकं विशेष गाजली. त्याच मालिकेतलं एक पुस्तक होतं, हाऊ टू मर्डर युअर हजबंड? पुस्तकाच्या शिर्षकापासूनच तेव्हा भरपूर चर्चा झालेली असली तरी आता मात्र नॅन्सी आजी स्वत:च कोर्टात उभ्या आहेत आणि नवऱ्याचा खून केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

(Image : Google)

आता वय झालं मला  फारसं काही आठवत नाही, असं म्हणणाऱ्या नॅन्सीआजींनी अलीकडेच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती, त्यात मात्र त्या सांगतात की, नवरा (डेन) जिवंत होता त्यापेक्षा आता माझं जरा जास्त मजेत चाललं आहे, तेव्हा होती त्यापेक्षा माझी आर्थिक स्थिती आता जास्त चांगली आहे.’ मुद्दा आहेच की कर्जाचे हप्ते फेडू न शकणाऱ्या आजींकडे एवढा पैसा आला कुठून तर त्याचं उत्तर हेच की, आजींनी नवऱ्याचाच खून केला. दुर्देव हे की, लिहिताना त्यांनी पकडले न जाण्याचे अनेक प्लॉट मांडले असले तरी त्या स्वत: मात्र रंगेहाथ पकडल्या गेल्या.
नॅन्सी आजीची ही भारी थरार गोष्ट. डिटेक्टिव्ह स्टोऱ्या असतात तशी. सध्या नॅन्सी आजीवर खटला सुरु आहे, त्यांनी नवऱ्याचा खून केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या कहाणीत सगळं आहे, भलामोठा काढलेला इन्श्युरन्स, अमेंशिया, हत्यार गायब, सीसीटीव्हीचे फुटेज असं सारं सापडलं आणि आजी अडकल्या. आजींवर बरंच कर्ज होतं, आर्थिक स्थिती हलाखीची. कर्जाचे हप्ते फेडण्याची पंचाईत झाली. मात्र त्यांनी इंश्यूरन्स बरेच घेतले होते. पैशासाठीच त्यांनी नवऱ्याला मारले असल्याचा संशय आहे. शेफ असलेल्या डॅनचा खून त्याच्या इन्स्टिट्यूटसमोरच झाला आणि नॅन्सी तेव्हा तिथंच होती. सीसीटीव्ही फुटेजही ते दाखवते. पैशांसाठीच नॅन्सीनं नवऱ्याला मारल्याचा सकृतदर्शनी पुरावा आहे. एकीकडे पैसे नव्हते पण ती त्याच्या १० इन्श्युरन्सचे हप्ते फेडत होती. नवऱ्याला मारुन तिनं इन्श्युरन्सचे पैसे कमावले असे दिसते.
तिच्या पुस्तकापेक्षाही प्रत्यक्ष कहाणीचा खराखुरा प्लॉट जास्त रंजक आहे.

Web Title: Nancy crampton brophy, she wrote how to murder your husband and then her husband found dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.