Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Parenting > नीतू कपूर म्हणतात आलिया भट अत्यंत कडक शिस्तीची आई! .. राहाला आतापासूनच 'या' गोष्टींना बंदी

नीतू कपूर म्हणतात आलिया भट अत्यंत कडक शिस्तीची आई! .. राहाला आतापासूनच 'या' गोष्टींना बंदी

Parenting Style: अभिनेत्री आलिया भट एक आई म्हणून कशी आहे याविषयी तिच्या सासुबाईंनी म्हणजेच नीतू कपूर यांनी केलेला खुलासा...(Neetu Kapoor explains what kind of mother Alia Bhatt is.. )

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2026 14:10 IST2026-05-18T13:44:03+5:302026-05-18T14:10:09+5:30

Parenting Style: अभिनेत्री आलिया भट एक आई म्हणून कशी आहे याविषयी तिच्या सासुबाईंनी म्हणजेच नीतू कपूर यांनी केलेला खुलासा...(Neetu Kapoor explains what kind of mother Alia Bhatt is.. )

neetu Kapoor explains what kind of mother alia bhatt is.. neetu Kapoor explains about the parenting style of alia bhatt | नीतू कपूर म्हणतात आलिया भट अत्यंत कडक शिस्तीची आई! .. राहाला आतापासूनच 'या' गोष्टींना बंदी

नीतू कपूर म्हणतात आलिया भट अत्यंत कडक शिस्तीची आई! .. राहाला आतापासूनच 'या' गोष्टींना बंदी

Highlightsवस्तू जागच्याजागीच ठेवल्या पाहिजेत. टीव्ही बघणं टाळलंच पाहिजे असे तिचे खूप नियम असतात.

आलिया भट एक अभिनेत्री म्हणून कशी आहे हे तिच्या चाहत्यांना चांगलेच माहिती आहे. जशी प्रत्येक वर्किंग वुमनवर तिचं काम आणि तिचं कुटूंब यांची जबाबदारी असते तशीच ती आलिया भटवरही आहे. तिचं अभिनेत्री असणं याला अपवाद नाही.. तिलाही एक अभिनेत्री म्हणून तिच्या करिअरवर फोकस करावं लागतं आणि त्याच वेळी राहाची आई म्हणून लेकीकडेही लक्ष द्यावं लागतं. तिच्या पॅरेंटिंग स्टाईलबद्दलही बऱ्याचदा खूप चर्चा होत असते. कारण ती कधी राहासोबत पुस्तक वाचताना दिसते तर कधी एक आई म्हणून राहाच्या संगोपनात तिची भुमिका कशी असावी; याविषयी एक्सपर्ट लोकांशी चर्चा करताना दिसते. यावरूनच ती आई म्हणून किती सजग आहे हे दिसतं. आता याच तिच्या आईपणाविषयी सांगत आहेत खुद्द तिच्याच सासूबाई म्हणजेच नीतू कपूर...(Neetu Kapoor explains what kind of mother Alia Bhatt is.. )

 

अभिनेत्री साेहा अली खान हिचा एक पॉडकास्ट सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये नीतू कपूर आणि त्यांची लेक रिद्धिमा कपूर या दोघी सहभागी झाल्या होत्या. चर्चेदरम्यान नीतू कपूर यांना रणबीर, आलिया आणि त्यांची लेक राहा यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी नीतू म्हणाल्या की रणबीर हा एक अतिशय कुल बाबा आहे. राहाची त्याच्यासोबत धमाल मस्ती चालू असते. तो जणू काही तिचा मित्र आहे. पण त्याच वेळी आलियाला मात्र ती खूप घाबरते. 'आलिया इज ए ग्रेट मदर' अशा शब्दांत त्यांनी आलियाचं कौतूकही केलं. त्या म्हणाल्या की आलिया ही खूप शिस्तीची आहे. त्यामुळे राहाकडेही तिचं खूप बारकाईने लक्ष असतं.

 

वस्तू जागच्याजागीच ठेवल्या पाहिजेत. टीव्ही बघणं टाळलंच पाहिजे असे तिचे खूप नियम असतात. राहाला चॉकलेट देणंही तिला आवडत नाही. पण आजी म्हणून मी मात्र 'लिटिल स्पॉयलर' ठरते आणि राहाला चॉकलेट खाऊ देण्याचा आग्रह करते. दोन पिढ्यांमध्ये पालकत्वाची पद्धती खूप बदलली आहे. आम्ही पालक म्हणून कसे होतो आणि आताची पिढी कशी आहे ही तुलनाच होऊ शकत नाही. कारण काळ खूप बदलला आहे. त्यामुळे दोन्ही पालकांच्या भूमिका बदललेल्या आहेत, असंही नीतू यांनी अतिशय समजूतदारपणे सांगितलं. नातवंडांना पालकांकडून असलेली वेगवेगळ्या प्रकारची बंदी काही आजी- आजोबांना अजिबात आवडत नाही. त्यावरून अनेकदा कुटूंबात वादही होत असतात. अशावेळी नीतू यांनी घेतलेली ही भूमिका अतिशय समजूतदारपणाची ठरते. 


Web Title: neetu Kapoor explains what kind of mother alia bhatt is.. neetu Kapoor explains about the parenting style of alia bhatt