Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Mental Health > एखादा शब्द किंवा नाव डोक्यात असतं, पण लगेच आठवत नाही? पाहा काय आहे यामागचं वैज्ञानिक कारण...

एखादा शब्द किंवा नाव डोक्यात असतं, पण लगेच आठवत नाही? पाहा काय आहे यामागचं वैज्ञानिक कारण...

Mental Health : तुम्ही त्या शब्दाची लांबी सांगू शकता, पहिलं अक्षर सांगू शकता, त्यासारखे इतर शब्दही आठवतात… पण नेमका शब्द मात्र आठवत नाही. काळजी करू नका, हा अनुभव खूप सामान्य आहे.   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 10:09 IST2026-04-28T10:09:20+5:302026-04-28T10:09:58+5:30

Mental Health : तुम्ही त्या शब्दाची लांबी सांगू शकता, पहिलं अक्षर सांगू शकता, त्यासारखे इतर शब्दही आठवतात… पण नेमका शब्द मात्र आठवत नाही. काळजी करू नका, हा अनुभव खूप सामान्य आहे.   

A word or name pops into your head, but you can't immediately remember it? Here's reason behind it | एखादा शब्द किंवा नाव डोक्यात असतं, पण लगेच आठवत नाही? पाहा काय आहे यामागचं वैज्ञानिक कारण...

एखादा शब्द किंवा नाव डोक्यात असतं, पण लगेच आठवत नाही? पाहा काय आहे यामागचं वैज्ञानिक कारण...

Mental Health : तुमच्यासोबत कधी असं झालं आहे का, की एखाद्या जुन्या मित्राचं नाव, एखाद्या चित्रपटाचं नाव किंवा एखादा खास शब्द आठवण्याचा प्रयत्न करताना तो शब्द अगदी “जिभेच्या टोकावर” असल्यासारखा वाटतो, पण आठवतच नाही? तुम्ही त्या शब्दाची लांबी सांगू शकता, पहिलं अक्षर सांगू शकता, त्यासारखे इतर शब्दही आठवतात… पण नेमका शब्द मात्र आठवत नाही. काळजी करू नका, हा अनुभव खूप सामान्य आहे.   

याला काय म्हणतात?

मानसशास्त्रात या अवस्थेला Tip-of-the-Tongue Phenomenon किंवा TOT म्हणतात. ही अशी मानसिक अवस्था आहे, ज्यात आपल्याला माहिती आहे की त्याला उत्तर माहीत आहे, पण त्या क्षणी मेंदू ती माहिती बाहेर काढू शकत नाही.    

हे का होतं?

मानसशास्त्रज्ञांच्या मते, आपला मेंदू शब्द आणि माहिती वेगवेगळ्या स्तरांमध्ये साठवतो. जेव्हा आपण एखादा शब्द आठवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मेंदू त्या शब्दाचा अर्थ शोधतो. त्याचा आवाज किंवा उच्चार जोडतो. TOT तेव्हा होतं, जेव्हा मेंदू अर्थापर्यंत पोहोचतो, पण उच्चाराशी कनेक्शन जुळत नाही. म्हणजेच, तुम्हाला माहिती आहे काय शोधायचंय… पण नाव दारात येऊन अडकल्यासारखं होतं.

TOT दरम्यान काय वाटतं?

या अवस्थेत आपल्याला त्या शब्दाबद्दल इतर गोष्टी आठवतात. जसे की, शब्दाची लांबी – लहान आहे की मोठी, आवाज – कसा ऐकू येतो, पहिलं अक्षर – कधी कधी आठवतं,  समानार्थी शब्द – मूळ शब्दाऐवजी इतर शब्द आठवतात.

यामागची कारणं

कमी वापरलेले शब्द

जे शब्द आपण रोज वापरत नाही, ते पटकन आठवत नाहीत.  

ताण आणि थकवा

मेंदू थकलेला असेल किंवा दबावाखाली बोलत असाल, तर memory retrieval धीमं होतं.   

वय वाढणं

वयानुसार TOT चे अनुभव वाढू शकतात, कारण मेंदूला माहिती जोडायला जास्त वेळ लागू शकतो.

काय करावे?

शांत राहा

थोडा वेळ विषय बदलून दुसरं काम करा

ताण घेऊ नका

अनेकदा काही मिनिटांनी तो शब्द आपोआप आठवतो.

Web Title : शब्द याद क्यों नहीं आता? 'टिप-ऑफ-द-टंग' के पीछे का विज्ञान

Web Summary : जब आप कोई शब्द जानते हैं लेकिन याद नहीं कर पाते तो 'टिप-ऑफ-द-टंग' की स्थिति होती है। यह मेमोरी स्टोरेज और पुनः प्राप्ति समस्याओं, तनाव, थकान, उम्र बढ़ने और शब्दों के कम उपयोग के कारण होता है। शांत रहें, ध्यान बदलें; अक्सर शब्द वापस आ जाता है।

Web Title : Why can't you recall a word? The science behind tip-of-the-tongue

Web Summary : The tip-of-the-tongue phenomenon (TOT) occurs when you know a word but can't retrieve it. This happens due to memory storage and retrieval issues, stress, fatigue, aging, and infrequent word usage. Relax, shift focus; the word often returns.