Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सकाळी झोपेतून उठताच अचानक डोळ्यातून पाणी येऊ लागतं, चिकटपणा जाणवतो? पाहा नेमकी काय आहे समस्या

सकाळी झोपेतून उठताच अचानक डोळ्यातून पाणी येऊ लागतं, चिकटपणा जाणवतो? पाहा नेमकी काय आहे समस्या

Watering Eyes : अनेकदा काही लोकांच्या डोळ्यातून फार पाणी येतं. झोपेतून उठताच डोळ्यातून पाणी येऊ लागतं. खासकरून लहान मुलांमध्ये ही समस्या अधिक बघायला मिळते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 10:34 IST2026-04-17T10:33:58+5:302026-04-17T10:34:32+5:30

Watering Eyes : अनेकदा काही लोकांच्या डोळ्यातून फार पाणी येतं. झोपेतून उठताच डोळ्यातून पाणी येऊ लागतं. खासकरून लहान मुलांमध्ये ही समस्या अधिक बघायला मिळते.

Why tearing begins immediately after waking up in morning, know the reason | सकाळी झोपेतून उठताच अचानक डोळ्यातून पाणी येऊ लागतं, चिकटपणा जाणवतो? पाहा नेमकी काय आहे समस्या

सकाळी झोपेतून उठताच अचानक डोळ्यातून पाणी येऊ लागतं, चिकटपणा जाणवतो? पाहा नेमकी काय आहे समस्या

Watering Eyes : डोळे आपल्यासाठी किती महत्वाचे आहे हे काही वेगळं सांगायला नको. हे सुंदर जग डोळ्यांशिवाय बघायला मिळालं नसतं. आपण अनेकदा ऐकलं असेल की, एखाद्या अमुक व्यक्तीचे डोळे बोलके आहेत. तमुक गोष्टी डोळ्यात दिसतात. डोळ्यांची आणखी एक खासियत म्हणजे ते आपल्या आरोग्यासंबंधी बऱ्याच गोष्टी सांगतात. डोळ्यांमधून अनेक आजारांचे किंवा शरीरात झालेल्या बिघाडाचे संकेत मिळतात. अनेकदा काही लोकांच्या डोळ्यातून फार पाणी येतं. झोपेतून उठताच डोळ्यातून पाणी येऊ लागतं. खासकरून लहान मुलांमध्ये ही समस्या अधिक बघायला मिळते. सामान्यपणे जन्मावेळी बाळांसोबत असं होतं, पण मग १ वर्षात डोळ्यातून पाणी येणं बंदही होतं. डोळ्यातून पाणी येण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. अनेकदा अश्रू निघण्याच्या मार्गात काही ब्लॉकेज असेल तर अशी स्थिती निर्माण होऊ शकते. अशात डोळ्यातून पाणी येण्याची कारणे आपण जाणून घेणार आहोत.

डोळ्यातून पाणी येण्याची कारणे

अ‍ॅलर्जी - डोळ्यातून पाणी येण्याचं एक मोठं कारण अ‍ॅलर्जी मानलं जातं. अ‍ॅलर्जी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींमधून होऊ शकते. जसे की, फुलं-पाने, गवत, स्मोकिंग, परफ्यूम, काही औषधं तर कधी प्रदूषणामुळेही अ‍ॅलर्जी होऊ शकते.  अनेकदा तर आपल्या घरातील पाळीव प्राण्यांमुळे देखील अ‍ॅलर्जी होऊ शकते. फक्त आपल्याला ती ओळखायची आहे आणि अशा गोष्टींपासून दूर रहायचं आहे.

कंझंक्टिवायटिस - बदलत्या वातावरणामुळे कंझंक्टिवायटिसची तक्रार खूप लोकांना होते. ज्यामुळे डोळे लाल होऊ लागतात आणि इन्फेक्शन झाल्यामुळे डोळ्यातून पाणी येऊ लागतं. अचानक डोळ्यातून पाणी येण्याला हे एक मुख्य कारण मानलं जातं. 

अश्रूंचा मार्ग ब्लॉक होणे - अनेकदा डोळ्यातून अश्रू बाहेर पडण्याचा जो मार्ग असतो तो ब्लॉक होतो. ज्याला नॅटली ब्लॉकेज म्हटलं जातं. ही समस्या झाली तर डोळ्यातून पाणी येत राहतं. लहान मुलांना डोळ्यातून पाणी येण्याची समस्या अधिक होते. 

कसा कराल बचाव

डोळ्यातून अचानक खूप जास्त पाणी येत असेल तर सर्वातआधी डॉक्टरांना दाखवायला हवं. डोळे फार संवेदनशील असतात, त्यामुळे काही घरगुती उपाय करून त्यांमध्ये काही टाकू नका. सकाळी झोपेतून उठल्यावर डोळ्यांवर थंड पाणी शिंपडा. याने थोडा आराम मिळेल. जर डोळे लाल झाले असतील किंवा इन्फेक्शन झालं असेल गरम पाण्याने हलके शेकाल तर आराम मिळेल. लहान मुलांच्या डोळ्यातून पाणी किंवा घाण बाहेर येत असेल तर डॉक्टर यासाठी औषध देऊ शकतात किंवा डोळ्यांचे व्यायाम करायला सांगू शकतात. जर अश्रूचा मार्ग ब्लॉक झाला असेल तर यासाठी डीसीआर सर्जरी केली जाते.

Web Title : सुबह उठते ही आँखों से पानी? कारण और उपाय समझें।

Web Summary : अत्यधिक आँसू आना एलर्जी, कंजंक्टिवाइटिस या अवरुद्ध अश्रु नलिकाओं का संकेत हो सकता है। पराग, धुआं या पालतू जानवरों की रूसी जैसे एलर्जी सामान्य ट्रिगर हैं। उपचार में ठंडी सिकाई और नेत्र धोने से लेकर दवा या गंभीर मामलों में सर्जरी शामिल है। उचित निदान और देखभाल के लिए डॉक्टर से परामर्श लें।

Web Title : Watery eyes upon waking? Understand the causes and remedies.

Web Summary : Excessive tearing can indicate allergies, conjunctivitis, or blocked tear ducts. Allergens like pollen, smoke, or pet dander are common triggers. Treatment ranges from cold compresses and eye washes to medication or, in severe cases, surgery. Consult a doctor for proper diagnosis and care.