Heart Attack Sign In women's : हार्ट अॅटॅकच्या केसेस हल्ली खूपच वाढल्या आहेत. केवळ जास्त वयातच नाही तर कमी वयातही तरूण हार्ट अॅटॅकचे शिकार होत आहेत. केवळ पुरूषच नाही तर महिलांमध्येही हार्ट अॅटॅकमुळे मृत्यूचं प्रमाण मोठं आहे. पण तरी सुद्धा महिलांमध्ये हार्ट अॅटॅकची लक्षणं वेळीच समजण्यास उशीर होतो. पण असं का होतं, महिलांमध्ये हार्ट अॅटॅकची लक्षणं वेळीच का दिसत नाही किंवा ती दिसण्यास उशीर का होतो? खरंतर यामागे अनेक गोष्टी कारणीभूत असतात, त्या कोणत्या हे आपण समजून घेणार आहोत.
पुरूषांमध्ये वेगळी लक्षणं
पुरूषांमध्ये हार्ट अॅटॅकचं सगळ्यात सामान्य लक्षण म्हणजे छातीत वेदना किंवा दबाव जाणवणे. महिलांच्याही छातीत दुखू शकतं, त्यांना अनेकदा अशा लक्षणांचा सामना करावा लागतो, त्यामुळे त्या याला सामान्य समजतात.
खांदे, पाठ किंवा मानेत वेदना - हार्ट अॅटॅकमध्ये वेदना केवळ छातीपुरत्या मर्यादित राहत नाही, दुखणं शरीराच्या वरच्या भागात पसरतं.
जास्त थकवा - कोणत्याही मेहनतीच्या कामाशिवायही अचानक कमजोरी किंवा जास्त थकवा जाणवणे.
श्वास घेण्यास त्रास - थोडं जरी चालले किंवा बसून असल्यावरही श्वास घेण्यास त्रास होऊ लागणे.
पचनास समस्या - पोट खराब होणे, मळमळ किंवा अपचन यांसारख्या समस्यांना गॅस समजून दुर्लक्ष केलं जातं.
अस्वस्थ वाटणे - कोणत्याही कारणाशिवाय एंझायटी किंवा घाम येणे.
ही सगळी लक्षणं छातीत वेदनेसोबतही दिसू शकतात आणि त्याशिवाय सुद्धा. त्यामुळे महिलांना अंदाज लावता येत नाही की, समस्या हृदयासंबंधी आहे.
कोरोनरी आर्टरी डिसीज न होणे
पुरूषांमध्ये हार्ट अॅटॅक अनेकदा आर्टरी डिसीज म्हणजे धमण्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्याने येतो. पण महिलांमध्ये अनेकदा हार्ट अॅटॅक धमण्यांमध्ये कोणतेही ब्लॉकेज नसतानाही येऊ शकतो. कारण सामान्यपणे मेडिकल टेस्टमधूनच मोठ्या धमण्यांमध्ये असलेल्या ब्लॉकेजची माहिती मिळते. त्यामुळे महिलांमध्ये सुरूवातीचा किंवा असामान्य हार्ट अॅटॅक ओळखणं डॉक्टरांसाठी अवघड होतं.
लक्षणांकडे दुर्लक्ष
सामाजिक आणि मानसिक कारणांमुळे महिला अनेकदा आपल्या तब्येतीला प्राधान्य देत नाहीत. त्या गंभीर लक्षणांना थकवा, तणाव किंवा वयाचा प्रभाव समजून टाळतात. दवाखान्यात जायला टाळाटाळ करणे किंवा उशीर केल्याने उपचारासाठीचा गोल्डन आवर संपतो.
कसा कराल बचाव?
लक्षणांकडे दुर्लक्ष न करणे - जर आपल्याला अचानक थकवा किंवा फार जास्त वेदना जाणवत असेल, आधी असं कधी झालं नसेल तर याकडे कानाडोळा करू नका.
धोका ओळखा - डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, तणाव आणि मनोपॉजनंतर वाढत्या वजनाने हृदयरोगांचा धोका वाढतो. त्यामुळे अचानक काही वेगळी लक्षणं दिसली तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.
