lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दातांवर पिवळा थर आलाय, दुर्गंध येतो? किचनमधल्या ४ गोष्टींनी दात घासा, पांढरेशुभ्र होतील दात

दातांवर पिवळा थर आलाय, दुर्गंध येतो? किचनमधल्या ४ गोष्टींनी दात घासा, पांढरेशुभ्र होतील दात

Top 4 Home Remedies For Teeth Whitening (Pivale dat upay sanga) : ऑईल पुलिंग दातांमध्ये चिकटलेला प्लाक बाहेर काढते आणि दात दीर्घकाळ स्वच्छ राहण्यास मदत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 12:57 PM2024-01-23T12:57:37+5:302024-01-23T15:38:28+5:30

Top 4 Home Remedies For Teeth Whitening (Pivale dat upay sanga) : ऑईल पुलिंग दातांमध्ये चिकटलेला प्लाक बाहेर काढते आणि दात दीर्घकाळ स्वच्छ राहण्यास मदत होते.

Top 4 Home Remedies For Teeth Whitening : Best Ayurvedic Remedies For Remove Plaque or Tarter From Teeth | दातांवर पिवळा थर आलाय, दुर्गंध येतो? किचनमधल्या ४ गोष्टींनी दात घासा, पांढरेशुभ्र होतील दात

दातांवर पिवळा थर आलाय, दुर्गंध येतो? किचनमधल्या ४ गोष्टींनी दात घासा, पांढरेशुभ्र होतील दात

स्वच्छ, पांढऱ्याशुभ्र दातांचा आत्मविश्वास वाढवण्यात महत्वाचा रोल असतो. (How to get Strong White Teeth) पर्सनॅलिटी चांगली दिसण्यास ओरल हायजीनसाठीही हे फायदेशीर ठरते. काळे, पिवळे दात ओरल हेल्थ खराब (Oral Health Tips) असल्याचे लक्षण मानले जाते. (How to remove plaque From Teeth) काही घरगुती उपाय तुमचं हे काम सोपं करू शकतात. (Yellow Teeth Solution)

नॅच्युरल उपाय (Natural Home remedies) दातांमधील प्लाक काढून टाकण्यास फायदेशीर ठरतात. (White Teeth at Home) काहीजण रोज २ ते ३ वेळा दात घासतात तरी त्यांच्या दातांवर हवीतशी चमक येत नाही. डेंटिस्टकडे जायचं म्हटलं की एकावेळी ५ ते १० हजार खर्च होतात. अशावेळी जर घरगुती उपाय केले दातांना कोणतीही इजा न पोहोचवता दात चमकतील आणि सुंदर दिसतील. (How to Remove Tarter From Teeth)

केळ्याच्या साली दातांवर रगडा

केळ्याच्या साली दातांवर रगड्याने दात स्वच्छ आणि चकचकीत दिसतात. (Ref) आपण केळी खाल्ल्यानंतर सालं फेकून देतो पण असं न करतात सालीचा आतला भाग दातांवर रगडला तर ५ मिनिटांनी दात नव्यासारखे दिसतील त्यानंतर गुळण्या करा. या सालीतील iगुणधर्म दातांना पांढरे शुभ्र ठेवण्यास मदत करतात.

नारळाच्या तेलाने पुलिंग

ऑईल पुलिंग दातांमध्ये चिकटलेला प्लाक बाहेर काढते आणि दात दीर्घकाळ स्वच्छ राहण्यास मदत होते. नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिनच्या रिपोर्टनुसार नारळाच्या तेलाने तोंडातील बॅक्टेरिया निघून जाण्यास मदत होते. (Ref) ऑईल पुलिंगमुळे दातांमध्ये चिकटलेला कचरा बाहेर निघण्यास मदत होते. यासाठी नारळाचं तेल घेऊन तोंडामध्ये चारही बाजूंनी फिरवा.   नारळाचे तेल डाग काढून टाकण्यात आणि ओरल हेल्थ चांगली ठेवण्यात फायदेशीर ठरेल.

कंबर दुखते, सतत थकवा येतो? व्हिटामीन बी-१२ देणारे ५ व्हेज पदार्थ खा; तरतरी येईल-फिट राहाल

एक्टिव्हेटेट चारकोल

कोळश्याची पावडर दातांमधील प्लाक आणि टार्टर काढून टाकण्यासाठी प्रभावी ठरते.  दातांवर ब्रश करण्यासाठी तुम्ही चारकोल  टूथपेस्ट किंवा कॅप्सूलचा वापर करू शकता. एक्टिव्हेट चारकोलमुळे दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होते.

200 किलो वजनाच्या कोरोओग्राफरनं ९८ किलो घटवलं; डाएटमध्ये 'हे' ५ बदल करून मेंटेन केलंं

लिंबू आणि बेकिंग सोड्याची पेस्ट

दातांना पांढरे बनवण्यासाठी तुम्ही या पेस्टचा वापर करू शकता. यासाठी बेकींग सोड्यात थोडा लिंबाचा रस मिसळा आणि ही पेस्ट दातांवर हलक्या हाताने रगडा २ मिनिटांसाठी तसंच राहू द्या. लिंबातील एसिड आणि बेकिंग सोड्याचे फ्रिक्शन दातांना पांढरेशुभ्र बनवण्यासाठी फायदेशीर ठरेल.

Web Title: Top 4 Home Remedies For Teeth Whitening : Best Ayurvedic Remedies For Remove Plaque or Tarter From Teeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.