Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रात्री ब्रा घालून झोपल्याने कॅन्सरचा धोका वाढतो का? एका चुकीमुळे आरोग्याचे होते नुकसान- डॉक्टर म्हणतात...

रात्री ब्रा घालून झोपल्याने कॅन्सरचा धोका वाढतो का? एका चुकीमुळे आरोग्याचे होते नुकसान- डॉक्टर म्हणतात...

Breast health and sleep quality: Best clothing for sleeping for women: रात्री ब्रा घालून झोपल्याने कॅन्सरचा धोका वाढतो का जाणून घेऊया याबाबतचे तथ्य.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2026 15:09 IST2026-04-23T15:08:35+5:302026-04-23T15:09:14+5:30

Breast health and sleep quality: Best clothing for sleeping for women: रात्री ब्रा घालून झोपल्याने कॅन्सरचा धोका वाढतो का जाणून घेऊया याबाबतचे तथ्य.

Is sleeping with a bra linked to breast cancer Side effects of wearing a tight bra at night Does wearing a bra cause lymph node blockage Health risks of sleeping in a bra | रात्री ब्रा घालून झोपल्याने कॅन्सरचा धोका वाढतो का? एका चुकीमुळे आरोग्याचे होते नुकसान- डॉक्टर म्हणतात...

रात्री ब्रा घालून झोपल्याने कॅन्सरचा धोका वाढतो का? एका चुकीमुळे आरोग्याचे होते नुकसान- डॉक्टर म्हणतात...

महिलांच्या आरोग्याबाबत अनेक समज-गैरसमज समाजात प्रचलित आहेत, त्यापैकीच एक म्हणजे रात्री ब्रा घालून झोपल्याने कॅन्सर होतो का? अनेक वर्षांपासून हा चर्चेचा विषय राहिला असून, यामुळे अनेक महिलांच्या मनात भीतीचे वातावरण असते.(Breast health and sleep quality) सोशल मीडिया आणि इंटरनेटवर अशा अनेक पोस्ट फिरत असतात, ज्यामध्ये असा दावा केला जातो की रात्री ब्रा घालून झोपल्यामुळे लसिका ग्रंथींवर (Lymph nodes) दबाव येतो आणि त्यातून कॅन्सरचा धोका निर्माण होतो. (Best clothing for sleeping for women)
कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा संबंध एखाद्या कपड्याशी जोडण्यापूर्वी डॉक्टरांचे आणि संशोधकांचे काय मत आहे, हे पाहणे गरजेचे आहे.(Mahilanche arogya tips Marathi) रात्री झोपताना शरीराला विश्रांती मिळणे आवश्यक असते आणि अशा वेळी घातलेले घट्ट कपडे रक्ताभिसरणावर परिणाम करू शकतात का किंवा खरंच त्याचा संबंध कॅन्सरशी आहे का, या प्रश्नांची उत्तरे शोधणे काळाची गरज आहे. रात्री ब्रा घालून झोपल्याने कॅन्सरचा धोका वाढतो का जाणून घेऊया याबाबतचे तथ्य.

१४ तास उपाशी आणि ३५ वर्षांपासून सकाळची एक सवय! दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांच्या 'एव्हरग्रीन' फिटनेसचं रहस्य- पाहा डाएट प्लान

जर आपण रात्री झोपताना खूप घट्ट असलेली ब्रा घालून झोपली तर त्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. ज्यामुळे सूज, शरीरात पाणी साठणे आणि कालांतराने स्तनांच्या ऊतींचे नुकसान होऊ शकते. पण ब्रा घालून झोपल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो हा दावा २०१७ मध्ये फेटाळून लावण्यात आला. 'अमेरिकन कॅन्सर सोसायटी' आणि अनेक नामांकित वैद्यकीय संस्थांच्या मते, ब्रा घालण्याचा आणि कॅन्सर होण्याचा कोणताही थेट संबंध आतापर्यंतच्या संशोधनातून सिद्ध झालेला नाही.

१९९० च्या दशकात एका पुस्तकामुळे हा समज पसरला होता की, घट्ट ब्रा घातल्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास अडथळा येतो आणि त्यामुळे कॅन्सर होतो. मात्र, २०१४ मध्ये 'फ्रेड हचिन्सन कॅन्सर रिसर्च सेंटर'ने केलेल्या एका मोठ्या अभ्यासात असे स्पष्ट झाले की, ब्रा चे स्वरूप कसे आहे, ती किती वेळ घातली जाते किंवा ती कधीपासून घालायला सुरुवात केली, याचा कॅन्सरच्या धोक्याशी कोणताही संबंध नाही.

रात्री ब्रा घालून झोपल्याने कॅन्सर होत नसला तरी आरोग्यासाठी गैरसोयीचे आहे. जर ब्रा अतिशय घट्ट असेल तर त्यामुळे छातीभोवतीच्या रक्ताभिसरणावर परिणाम होऊ लागतो, यामुळे झोपेत अस्वस्थता जाणवते. उन्हाळ्यात किंवा घाम येत असताना ब्रा घातल्यास त्वचेवर पुरळ येणे, खाज सुटणे किंवा फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो. 

रात्री झोपताना शरीराला पूर्ण विश्रांती मिळणे जास्त गरजेचे आहे. अशावेळी सैल कपडे घालायला हवे. घट्ट कपड्यांमुळे श्वासोच्छवासात किंचित अडथळा जाणवून झोप वारंवार मोडू शकते. सततच्या घर्षणामुळे किंवा दाबा मुळे ब्रा च्या पट्ट्यांच्या ठिकाणी त्वचा काळी पडू शकते. 
 

Web Title : क्या ब्रा पहनकर सोने से कैंसर का खतरा बढ़ता है?

Web Summary : टाइट ब्रा पहनकर सोने से कैंसर नहीं होता, अध्ययन बताते हैं। लेकिन, टाइट ब्रा रक्त परिसंचरण को बाधित कर सकती है, जिससे बेचैनी, त्वचा में जलन और नींद में खलल हो सकता है। बेहतर आराम के लिए रात में ढीले कपड़े पहनें।

Web Title : Sleeping with a bra: Does it increase cancer risk?

Web Summary : Sleeping in a tight bra doesn't cause cancer, studies confirm. However, tight bras can hinder circulation, cause discomfort, skin irritation, and disrupt sleep. Opt for loose clothing at night for better rest.