lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > How to get relief from constipation : जेवल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटतं, पोट साफ व्हायला त्रास होतो? ५ उपाय, पोटाचे विकार राहतील लांब

How to get relief from constipation : जेवल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटतं, पोट साफ व्हायला त्रास होतो? ५ उपाय, पोटाचे विकार राहतील लांब

How to get relief from constipation :

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 12:07 PM2022-02-04T12:07:42+5:302022-02-04T14:37:13+5:30

How to get relief from constipation :

How to get relief from constipation : Ayurveda expert shares 5 tips for gut health to improve gut bacteria and increase immunity | How to get relief from constipation : जेवल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटतं, पोट साफ व्हायला त्रास होतो? ५ उपाय, पोटाचे विकार राहतील लांब

How to get relief from constipation : जेवल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटतं, पोट साफ व्हायला त्रास होतो? ५ उपाय, पोटाचे विकार राहतील लांब

सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत अनेकांना गॅस, पोट साफ न होणं, पोट फुगल्यासारखं वाटणं असे त्रास वारंवार उद्भवतात. पचनाच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी पचनशक्तीप्रमाणे पदार्थ खाण्याचा आणि जीवनशैलीवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. (How To Get Rid Of Constipation Immediately) पण तुम्हाला माहीत आहे का की तुमची पचनशक्ती तुमच्या प्रतिकारशक्तीशीही (Immunity) संबंधित आहे? अशा वेळी जेव्हा आपण सर्वजण आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याचे मार्ग शोधत असतो, तेव्हा आपल्या आतड्यांच्या आरोग्याकडेही लक्ष देणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. (constipation solution at home)

आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. नितिका कोहली यांच्या मते, पचनशक्ती आणि रोगप्रतिकारशक्ती एकत्रच चालते. तुमच्या आतड्यात राहणारे सूक्ष्मजंतू तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि तुमचे एकूण आरोग्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. निरोगी आतड्यांशिवाय रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे शक्य नाही. (How to Make Yourself Poop)   योग्य अन्न खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि संपूर्ण आरोग्य नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. त्यांनी इंस्टाग्राम हँडलवरून पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याचे उपाय दिले आहेत.  (Home remedies for constipation)

थंडीमुळे चेहरा काळपट, कोरडा झालाय? घरच्याघरी स्टेप बाय स्टेप फेशियल करून मिळवा ग्लोईंग त्वचा

नियमित व्यायाम करा

आपले शरीर तंदुरुस्त आणि सक्रिय ठेवणे खूप महत्वाचे आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही नियमितपणे हे करा, असं डॉ. कोहली सांगतात.

रात्री उशिरा जेवू नका

आतडे निरोगी ठेवण्यासाठी तज्ज्ञ  रात्रीचे जेवण लवकर आणि हलके काहीतरी खाण्याची शिफारस करतात. रात्री उशिरा किंवा झोपण्यापूर्वी जड जेवण खाल्ल्याने पचनसंस्थेचे सर्वाधिक नुकसान होते.

आलं

आलं तुमच्या पोटासाठी खूप चांगले आहे. हे पचन सुधारण्याबरोबरच सूज कमी करण्यासाठी ओळखले जाते. याशिवाय, जीआय ट्रॅक्ट शुद्ध करण्याबरोबरच, ते अँटिऑक्सिडेंट पातळी आणि प्रतिकारशक्ती देखील वाढवते.

कोण म्हणतं व्हेज जेवणात प्रोटीन कमी असतं? ४ पदार्थ खा नेहमी फिट, हेल्दी राहाल

दालचिनी

दालचिनी हा पचनसंस्थेच्या समस्यांना तोंड देण्यासाठी एक उत्तम उपाय आहेच. यामुळे पचनक्रिया सुधारते. एवढेच नाही तर त्याचा आहारात समावेश केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणे आणि रक्तातील साखर संतुलित करणं सोपं होतं.

ताण तणाव दूर राहतो

तणावाचा केवळ मानसिकच नाही तर शारीरिकदृष्ट्याही परिणाम होतो. तुमचे आतडे योग्य प्रकारे कार्य करू शकत नाहीत याचे हे एक मुख्य कारण आहे. जेव्हा रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याचा विचार येतो तेव्हा आतडे निरोगी ठेवणे अत्यंत महत्वाचे  ठरते. आतड्यातील बॅक्टेरिया आणि मायक्रोबायोम  रोगाच्या संवेदनशीलतेवर परिणाम करू शकतात. त्यामुळे चांगल्या इम्युनिटीसाठी पचनक्रिया चांगली असणं गरजेचं आहे. 

Web Title: How to get relief from constipation : Ayurveda expert shares 5 tips for gut health to improve gut bacteria and increase immunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.