lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कोण म्हणतं प्रोटीन महाग असतं? ६ पदार्थ खा-रस्त्यावर मिळेल १० रूपये वाटा, मसल्स होतील मजबूत

कोण म्हणतं प्रोटीन महाग असतं? ६ पदार्थ खा-रस्त्यावर मिळेल १० रूपये वाटा, मसल्स होतील मजबूत

Add These 6 High Protein Vegetables in Your Diet : काही व्हेज पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही प्रोटीन्सची कमतरता भरून काढू शकता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 12:22 PM2024-03-07T12:22:18+5:302024-03-07T14:55:36+5:30

Add These 6 High Protein Vegetables in Your Diet : काही व्हेज पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही प्रोटीन्सची कमतरता भरून काढू शकता

Add These 6 High Protein Vegetables in Your Diet To Make Your Mucles Strong And Healthy | कोण म्हणतं प्रोटीन महाग असतं? ६ पदार्थ खा-रस्त्यावर मिळेल १० रूपये वाटा, मसल्स होतील मजबूत

कोण म्हणतं प्रोटीन महाग असतं? ६ पदार्थ खा-रस्त्यावर मिळेल १० रूपये वाटा, मसल्स होतील मजबूत

प्रोटीन शरीरातील अनेक महत्वपूर्ण अवयवांसाठी महत्वाचा आहे. मांसपेशी आणि शरीराच्या विकासासाठी प्रोटीन्सचे सेवन गरजेचे असते. (Health Tips) डाळी, दूध, पनीर, प्रोटीन्सचे उत्तम स्त्रोत आहेत. काही भाज्या प्रोटीन्सच्या उत्तम स्त्रोत असतात. (Protein Rich Foods) काही व्हेज पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही प्रोटीन्सची कमतरता भरून काढू शकता. (6 High Protein Vegetables in Your Diet To Make Your Muscles Strong And Healthy)

न्युट्रिशनिस्ट आणि आहारातज्ज्ञ शिखा यांच्यामते भाज्यांमध्येही जास्तीत जास्त प्रोटीन असते. (Best Plants Based Protein Foods) काही भाज्यांचा आपल्या आहारात समावेश करून तुम्ही प्रोटिन्सची  कमतरता भरून काढू शकता. प्रोटीन्स शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असते. (Foods For Protein)

1) चणे

रेडक्लिफ लॅबच्या रिपोर्टनुसार काळ्या चण्यांमध्ये २० ग्रॅम प्रोटीन्स, १२ ग्रॅम डायटरी फायबर्स, कार्बोहायड्रेट्स ६३ ग्रॅम असते. रोज तुम्ही मूठभर चणे खाल्ले तरी शरीराची प्रोटीन्सची  कमतरता दूर होते. काळ्या चण्यांमध्ये फायबर्स, मिनरल्स, व्हिटामीन्स असतात. ज्यामळे रोजच्या आहारात चण्यांचा समावेश करायलाच हवा.

2) हिरवे मटार

एक कप हिरव्या मटारमध्ये जवळपास ८ ग्राम प्रोटीन्स असतात. याव्यतिरिक्त फायबर्सचा चांगला स्त्रोत आहे. एक कप हिरव्या मटारमध्ये जवळपास ३५ टक्के प्रोटीन्सची कमरता भरून निघते. रात्रीच्या जेवणात स्टिअर फ्राय, सूपमध्ये तुम्ही मटार वापरू शकता. ज्यामुळे चव आणि पोषण दोन्ही वाढते. 

3) पालक

एक कप पालकमध्ये  ६ ग्राम प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. यात व्हिटामीन ए, व्हिटामीन के, व्हिटामीन सी यांसारखी पोषक तत्व असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्यासही मदत होते.   डोळे चांगले ठेवण्यासाठी आणि रक्तप्रवाह व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही पालकाचे सेवन करू शकता.

दूध प्यायची सवयच नाही-कॅल्शियम कसं मिळणार? रोज ५ पदार्थ खा, हाडांना मिळेल भरपूर कॅल्शियम

4) शतावरी

शतावरी एक प्रोटीनयुक्त आणि कमी कार्ब्सयुक्त भाजी आहे ज्यातून पोषण मिळते. शतावरी फॉलेट, व्हिटामीन ए चा चांगला स्त्रोत आहे. यामुळे त्वचा चांगली राहते. एक कप शतावरीमध्ये ४.३ ग्राम प्रोटीन्स असतात.

5) ब्रसेल्स स्प्राऊट्स

एक कप ब्रसेल्स स्प्राऊट्समध्ये ४ ग्राम प्रोटीन असते. ब्रसेल्स स्प्राऊट्समध्ये फायबर्स आणि प्रोटीन्सव्यतिरिक्त व्हिटामीन आणि इतर पोषक तत्व असतात. ज्यामुळे तुम्हाला संतुष्ट आणि आनंदी वाटते. याचे अनेक  मानसिक फायदे मिळतात. निरोगी राहण्यापासून कॅन्सरशी लढण्यापर्यंत रक्तदाब  कमी होईपर्यंत अनेक फायदे मिळतात. 

बदामापेक्षा चारपट जास्त प्रोटीन देतात ५ बिया; खर्च फक्त १० रूपये-भरपूर प्रोटीन मिळेल, हाडांना येईल ताकद

6) मशरूम

मशरूम फक्त स्वादीष्ट नसतात तर इतर भाज्याच्या तुलनेत यात जास्तीत जास्त प्रोटीन असते. एक कप शिजवलेल्या मशरूमध्ये जवळपास ४ ग्राम प्रोटीन असते. यात मशरूम व्हिटामीन बी मोठ्या प्रमाणात असते. मशरूम युवी प्रकाशात उगवले जाते. यात व्हिटामीन डी मोठ्या प्रमाणात असते. यातून पोषक तत्व मिळतात. 

Web Title: Add These 6 High Protein Vegetables in Your Diet To Make Your Mucles Strong And Healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.