Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Gardening > उन्हाळ्यात रोपांना पाणी कधी आणि किती प्रमाणात द्यावं? रोपांच्या वाढीसाठी खास टिप्स- पालवी फुटून येईल नव्याने बहर

उन्हाळ्यात रोपांना पाणी कधी आणि किती प्रमाणात द्यावं? रोपांच्या वाढीसाठी खास टिप्स- पालवी फुटून येईल नव्याने बहर

Natural fertilizers for plant growth: Plant care guide for beginners: उन्हाळ्यात पाहूया रोपांच्या वाढीसाठी काही खास टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2026 15:02 IST2026-04-17T15:02:02+5:302026-04-17T15:02:37+5:30

Natural fertilizers for plant growth: Plant care guide for beginners: उन्हाळ्यात पाहूया रोपांच्या वाढीसाठी काही खास टिप्स

Summer Gardening Tips Best time to water plants in summer How to keep plants green in hot weather Container gardening summer care | उन्हाळ्यात रोपांना पाणी कधी आणि किती प्रमाणात द्यावं? रोपांच्या वाढीसाठी खास टिप्स- पालवी फुटून येईल नव्याने बहर

उन्हाळ्यात रोपांना पाणी कधी आणि किती प्रमाणात द्यावं? रोपांच्या वाढीसाठी खास टिप्स- पालवी फुटून येईल नव्याने बहर

फेब्रुवारी-मार्च महिना संपला की वातावरणात बदल झालेला पाहायला मिळतो. उन्हाच्या झळा जाणवू लागतात. वाढत्या तापमानाचा जसा आपल्यावर परिणाम होतो तसाच झाडांवर देखील होतो. यामुळे कुंडीतील माती लवकर तापते, ज्याचा थेट परिणाम झाडांच्या मुळांवर होतो.(Gardening Tips) अनेकजण झाड सुकतात म्हणून दिवसातून तीन-चार वेळा पाणी घालतात, तर काही दुपारी कडक उन्हात पाणी देण्याची चूक करतात. यामुळे झाडांना थर्मल शॉक बसतो आणि कोमेजून जातात. (Plant care guide for beginners)
उन्हाळ्यात रोपांना फक्त पाणी देणं पुरेसं नसतं, तर ते कधी, कसं आणि किती प्रमाणात दिलं जातं यावर त्यांचं आयुष्य अवलंबून असतं.(Watering schedule for home garden) योग्य पद्धतीने रोपांना पाणी दिलं, त्यांची काळजी घेतली तर झाडं फक्त जगणारच नाहीत, तर त्यांना नवीन पालवी फुटून ती पुन्हा एकदा हिरवीगार होतील. पाहूया रोपांच्या वाढीसाठी काही खास टिप्स...(How to keep plants green in hot weather)

दिवसभर ऑफिसमध्ये AC मध्ये बसून तुम्हीच नाही तुमची त्वचाही म्हातारी होतेय? ३ गोष्टी रोज करा न विसरता

उन्हाळ्यात रोपांना पाणी देण्याची सगळ्यात योग्य वेळ सकाळी ८ वाजेच्या आत. सकाळी पाणी दिल्याने रोपांना दिवसभराच्या उन्हाचा सामना करण्यासाठी आर्द्रता मिळते. जर सकाळी शक्य नसेल, तर सूर्यास्तानंतर संध्याकाळी पाणी द्यावे. दुपारी १२ ते ४ या वेळेत चुकूनही पाणी देऊ नका. गरम मातीत पाणी पडल्याने वाफ तयार होते आणि मुळं जळतात, ज्यामुळे झाड मरण्याची शक्यता असते. 

रोपांना वरुन पाणी शिंपडण्यापेक्षा डीप वॉटरिंग करा. म्हणजे इतकं पाणी द्या की ते कुंडीच्या खालच्या छिद्रातून बाहेर येईल. यामुळे पाणी मुळांच्या खोलपर्यंत पोहोचते. वरवर पाणी दिल्यास फक्त वरची माती ओली होते आणि मुळं पाण्याअभावी कोमजून जातात. 

पाणी देण्यापूर्वी कुंडीतील माती १ ते २ इंच उकरुन काढा.  माती आतून कोरडी असेल तर पाणी द्या. मातीचा चिखल झाल्यामुळे मुळं सडतात, ज्यामुळे झाड मरते. उन्हाळ्यात हवेत कोरडेपणा असतो. त्यामुळे आठवड्यातून किमान दोनदा स्प्रे पंपाने झाडांच्या पानांवर पाणी फवारावे. यामुळे पानांवरील धूळ निघून जाते आणि झाडांना प्रकाशसंश्लेषण करणं सोपे जाते. ज्यामुळे नवीन पालवी फुटते. 

उन्हाळ्यात मातीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी मल्चिंग हा सर्वोत्तम उपाय आहे. कुंडीतील मातीच्या वरच्या थरावर सुका पालापाचोळा, नारळाच्या शेंड्या किंवा लाकडाचा भुसा पसरा. यामुळे सूर्याची किरणं थेट मातीवर पडत नाहीत आणि ओलावा जास्त काळ टिकून राहतो. कडक उन्हात झाडांना रासायनिक खतं देऊ नका. त्याऐवजी शेणखत किंवा गांडूळ खताचा अर्क द्या. यामुळे झाडांना थंडावा मिळेल आणि नवीन बहर येण्यास मदत होईल. 
 

Web Title : गर्मी में पौधों को पानी देना: विकास और खिलने के लिए टिप्स

Web Summary : गर्मी में पौधों को सुबह या शाम को पानी दें, दोपहर की गर्मी से बचें। गहराई से पानी देना ज़रूरी है। पानी देने से पहले मिट्टी की नमी जाँच लें। नमी बनाए रखने के लिए मल्च करें और स्वस्थ विकास और नए फूलों के लिए जैविक उर्वरकों का उपयोग करें।

Web Title : Watering plants in summer: Tips for growth and flourishing.

Web Summary : Water plants early morning or evening, avoiding midday heat. Deep watering is crucial. Check soil moisture before watering. Mulch to retain moisture and use organic fertilizers for healthy growth and new blooms.