जास्वंदाचे रोप आपली सुंदरता आणि औषधी गुणांसाठी ओळखले जाते. पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे या रोपाला फुलं येणं कमी होतं. जर जास्वंदाच्या रोपाला फुलं येण्याऐवजी फक्त पानंच येत असतील तर तुम्ही महागड्या फर्टिलायजरऐवजी घरगुती उपाय करू शकता. किचनमध्ये असलेली चहा पावडर जास्वंदाच्या रोपासाठी अमृत ठरू शकते. (How To Increase Hibiscus Plant Growth Faster)
यातील नायट्रोजन आणि टॅनिक एसिड मातीला उपजाऊ आणि अम्लीय बनवते जे जास्वंदाच्या रोपाच्या वाढीसाठी फार महत्वाचे असते. एक चमचा चहा पावडरचे हे फ्री मिश्रण आठवड्यातून २ वेळा वापरल्यास रोपांची चांगली वाढ होईल. यामुळे रोपाला मोठी, लालबुंद जास्वंदाची फुलं येतील. (RV Garden Expert Shared Secret To Increase Hibiscus Plant Growth Faster And Get More Flowers)
चहा पावडर उत्तम खत का?
जास्वंदाच्या रोपासाठी एसिडीक मातीची आवश्यकता असते. चहा पावडरमध्ये टॅनिक एसिड असते ज्यामुळे मातीचा पीएच स्तर संतुलित होतो जे जास्वंदासाठी अनुकूल ठरते. याव्यतिरिक्त चहा पावडरमध्ये नायट्रोजनचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे रोपाला नवीन फांद्या आणि चमकदार हिरवी पानं येण्यास मदत होते. जेव्हा माती अम्लीय असते तेव्हा रोप इतर पोषक तत्व सहज शोषून घेते.
द्रावण तयार करण्याची योग्य पद्धत
हे द्रावण बनवण्यासाठी तुम्हाला १ ग्लास पाण्यात १ चमचा ताजी चहा पावडर मिसळावी लागेल. ४ ते ५ तासांसाठी तसंच ठेवा. नंतर तुम्ही वापरलेल्या चहा पावडरचा वापर पुन्हा करू शकता. यात साखर किंवा दूध जराही घालू नका. वापरलेली चहा पावडर सुकवून नंतर वापरा, आठवड्यातून २ वेळा हे द्रावण मातीत घाला.
जास्वंदाच्या रोपाची सर्वात मोठी समस्या म्हणजे कळ्या आल्यानंतर पिवळ्या होऊन गळून पडतात. पोटॅशियमची कमतरता किंवा मातीचं असंतुलन याचं कारण असू शकतं. चहा पावडरच्या या द्रावणामुळे मातीची मुळं मजबूत होतात आणि कळ्यांना ऊर्जा मिळते. ज्यामुळे फक्त फुलं येत नाहीत तर आकारही मोठा होतो.
मातीती उर्वरता आणि मायक्रो न्युट्रिएंट्स
चहा पावडर फक्त नायट्रोजन देत नाही तर यात सूक्ष्म प्रमाणात पोटॅशियम आणि फॉस्फरसही असते. ज्यामुळे मातीतील गूड बॅक्टेरियाज वाढतात. जेव्हा तुम्ही आठवड्यातून २ वेळा हे मिश्रण मातीत घालता तेव्हा माती भूरभूरी राहते आणि हवेचा संचार चांगला होतो. जे मुळांच्या हेल्दी ग्रोथसाठी उत्तम ठरते.
चहा पावडरमधील नैसर्गिक गुण मातीला किटकांपासून वाचवतात. जास्वंदावर अनेकदा मिलिबग्सचे आक्रमण होते. जेव्हा रोप आतून मजबूत होते तेव्हा त्याची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. नियमित हे द्रावण रोपाला दिल्यास रोप कमी आजारी पडते आणि नवीन फुलं येण्याची क्षमता वाढते.
