lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > पारंपरिक सातूचे पीठ बनवायचेय? सुगंधी, पौष्टिक आणि सुपर हेल्दी, ही घ्या सोप्पी रेसिपी....

पारंपरिक सातूचे पीठ बनवायचेय? सुगंधी, पौष्टिक आणि सुपर हेल्दी, ही घ्या सोप्पी रेसिपी....

दोन मिनिटात तयार होणारा पारंपरिक पौष्टिक पदार्थ म्हणजे सातूचे पीठ. अनेक जणींना सातूचे पीठ आवडतेही आणि करायचेही असते. पण त्याची रेसिपी माहिती नसते. म्हणूनच ही घ्या सातूचे पीठ बनविण्याची अतिशय सोपी रेसिपी. सातूचे पीठ हा सुपर हेल्दी पदार्थ नक्कीच संपूर्ण कुटूंबाचे पोषण करण्यास उपयुक्त ठरतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:49 PM2021-06-23T16:49:39+5:302021-06-23T17:03:19+5:30

दोन मिनिटात तयार होणारा पारंपरिक पौष्टिक पदार्थ म्हणजे सातूचे पीठ. अनेक जणींना सातूचे पीठ आवडतेही आणि करायचेही असते. पण त्याची रेसिपी माहिती नसते. म्हणूनच ही घ्या सातूचे पीठ बनविण्याची अतिशय सोपी रेसिपी. सातूचे पीठ हा सुपर हेल्दी पदार्थ नक्कीच संपूर्ण कुटूंबाचे पोषण करण्यास उपयुक्त ठरतो.

Recipe of healthy sattu aata , satuche pith | पारंपरिक सातूचे पीठ बनवायचेय? सुगंधी, पौष्टिक आणि सुपर हेल्दी, ही घ्या सोप्पी रेसिपी....

पारंपरिक सातूचे पीठ बनवायचेय? सुगंधी, पौष्टिक आणि सुपर हेल्दी, ही घ्या सोप्पी रेसिपी....

Highlightsगहू आणि हरबरा डाळ भाजताना गॅस मंदच असला पाहिजे. मोठा गॅस करून भाजले तर ते आतून कच्चे राहतात आणि अजिबात चव येत नाही.सातूचे पीठ एवढे पौष्टिक असते की ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनाही आणि ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांनाही ते खाल्लेले चालते.

शरिरातील उष्मा कमी करण्यासाठी उन्हाळ्यात सातूचे पीठ आवर्जून खावे, असे सांगितले जाते. पण सातूचे पीठ हे एवढी उर्जा देणारे असते, की तुम्ही ते वर्षभर खाऊ शकता. सातूचे पीठ बनविण्यासाठी जे घटक  लागतात ते गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळ्यांच्या घरात सहज उपलब्ध  होऊ शकतात. महाराष्ट्राप्रमाणेच  उत्तरप्रदेश आणि बिहारमध्येही सातूचे पीठ आवडीने खाल्ले जाते. सातूच्या पीठामध्ये प्रोटीन्सचे प्रमाण भरपूर असते. थकवा दूर करण्यासाठी, रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी सातूचे पीठ खाणे फायदेशीर असते. 

 

सातूचे पीठ बनविण्यासाठी लागणारे साहित्य
गहू, हरबरा डाळ, सुंठ, जीरे, विलायची

कृती
१. सातूचे पीठ बनविण्यासाठी जर दोन वाट्या गहू घेतले असतील तर १ वाटी हरबऱ्याची डाळ घ्यावी. गहू आणि हरबरा डाळ यांचे प्रमाणे २ : १ असे ठेवावे.
२. हरबरा डाळ घेण्याऐवजी अनेक जण दाळवं देखील घालतात.
३. गहू आणि हरबरा डाळ स्वच्छ धुवून घ्यावी.
४. यानंतर एका कापडावर पसरवून पंख्याखाली साधारण एखादा तास ठेवून सुकवून घ्यावी.
५. यानंतर गहू आणि डाळ दोन्ही कढईत टाकून एकत्र करावे आणि मंद आचेवर भाजून घ्यावी.
६. गहू आणि डाळ यांना चांगला लालसर रंग आला की गॅस बंद करावा. गहू व डाळ कढईतून काढून घ्यावेत आणि आता याच कढईमध्ये जीरे, सुंठ आणि विलायची घालून थोडे हलवावे.
७. कढईमध्ये जी उष्णता निर्माण झालेली असते त्यातच जीरे, सुंठ आणि विलायची भाजून घ्यावी. पुन्हा  गॅस लावायची गरज नाही. कारण हे पदार्थ गरजेपेक्षा जास्त  भाजले जाण्याची शक्यता असते. 
८. आता हे सर्व पदार्थ एकत्र करावेत आणि गिरणीतून दळून आणावेत. 

 

सातूचे पीठ खायचे कसे ?
सातूचे पीठ घरात तयार असले, तर करायला काहीच वेळ लागत नाही. अगदी एका मिनिटात तुम्ही समोरच्या व्यक्तीला ते देऊ शकता.
एका व्यक्तीसाठी साधारण तीन ते चार टेबल स्पून एवढे सातूचे पीठ घ्यावे. त्यामध्ये आवडीनुसार साखर घालावी आणि कोमट दूध किंवा पाणी घालून ते कालवावे. कालवताना एकदम पाणी किंवा दूध ओतू नये. हळूहळू टाकावे आणि थोडे टाकले की लगेच चमच्याने गोलाकार आकारात फिरवावे. जेणेकरून पीठात गुठळ्या होत नाहीत आणि ते एकसारखे कालविले जाते.
साखरेऐवजी गुळ घालणार असाल तर गुळाचे पाणी आधी करून घ्यावे आणि त्या पाण्यात सातूचे पीठ कालवावे.
सातूचे पीठ जास्त घट्टही नको आणि खूपच पाणीदारही नको. चमच्याने खाता येईल असे सरसरीत पीठ कालविले जावे.
सातूचे पीठ कालविण्यासाठी पाण्याऐवजी दुधाचा वापर केला तर त्याच्यातले पौष्टिक गुण अजून वाढतात.

 

सातूचे पीठ खाण्याचे फायदे
१. एक- दिड वर्षाच्या बाळापासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांसाठीच सातूचे पीठ अतिशय आरोग्यदायी असते.
२. डाएटींगवर असणाऱ्या व्यक्ती आणि डायबेटिज पेशंटही गुळ घालून सातूचे पीठ खाऊ शकतात. 
३. चटकन उर्जा देणारा आणि कुपोषण रोखणारा पदार्थ म्हणून सातूचे पीठ ओळखले जाते.
४. हा अतिशय हेल्दी नाष्टा असून अनेक जण ऑफिसमधून घरी आल्यानंतरही काहीतरी हलके- फुलके खायचे असल्यास सायंकाळी सातूचे पीठ खाणे पसंत करतात. 
 

Web Title: Recipe of healthy sattu aata , satuche pith

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.