Join us
Daily Top 2Weekly Top 5

रणरणत्या उन्हाळ्यात गरमागरम चहा पिणं बाधतं? आल्याऐवजी घाला 'हा' पदार्थ - शरीर राहील थंड वाटेल फ्रेश...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2026 17:48 IST

ginger tea alternative in summer : ayurvedic tea for summer season : dry ginger tea benefits : उन्हाळ्यात गरमागरम चहा पिणं त्रासदायक वाटतंयं ? फक्त करा १ बदल आणि बिंधास्त घ्या चहाचा आनंद...

गरमागरम चहा हा आपल्या डेली रुटीनचा एक अविभाज्य भागच आहे. सकाळची सुरुवात असो, कामाचा थकवा घालवायचा असो किंवा गप्पांचा फड रंगवायचा असो, अनेकांसाठी चहाचा कप म्हणजे अगदी जीव की प्राणच...मात्र रणरणत्या उन्हाळयात गरमागरम चहा पिणं अनेकदा त्रासदायक वाटू लागतं. वाढत्या तापमानात गरम चहा प्यायल्याने शरीरात अधिक उष्णता निर्माण होऊन घाम, अस्वस्थता आणि डिहायड्रेशनचा त्रास वाढू शकतो. उकाड्यात जेव्हा घामाच्या धारा वाहत असतात आणि पारा ४० अंशांच्या पार जातो, तेव्हा अनेकांना प्रश्न पडतो की, "गरमागरम चहा पिणं योग्य आहे का?" आपल्यापैकी कित्येकांसाठी चहा म्हणजे केवळ पेय नसून तो एक 'इमोशन' आहे. पण रणरणत्या उन्हात तोच चहा पित असताना शरीरातली उष्णता अधिकच वाढल्यासारखं वाटतं आणि मग कधीकधी चहा नकोसा होतो. परंतु चहाप्रेमींसाठी किंवा चहा पिण्याची सवय असणाऱ्यांसाठी चहा नसेल तर काहीतरी चुकल्यासारखेच वाटते...(ginger tea alternative in summer).

उन्हाळ्यात चहा पिणं पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही! उलट, काही खास घरगुती घटकांचा वापर करून तुम्ही तुमच्या नेहमीच्या चहाला एक 'हेल्दी आणि कुलिंग' ट्विस्ट देऊ शकता. यामुळे तुमच्या चहाची चव (ayurvedic tea for summer season) तर वाढेलच, पण तो शरीरासाठी बाधक न ठरता थंडावा देण्यासही मदत करेल. रणरणत्या उन्हाळ्यात चहा (dry ginger tea benefits) पिणं शरीराला बाधू नये म्हणून, चहामध्ये कोणते बदल करायचे आणि तो 'हेल्दी' कसा करायचा ते पाहूयात. 

उन्हाळ्यात आल्याऐवजी चहात घाला सुंठ पावडर...

उन्हाळ्यात कडक उन्हामुळे वातावरण खूपच कोरडे आणि उष्ण होते, याचा थेट परिणाम शरीरावरही होतो. याचबरोबर, जेव्हा आपण दूध घातलेला चहा बनवतो, तेव्हा तो शरीरासाठी पचायला खूपच जड होतो. अशा परिस्थितीत आल्याऐवजी सुंठ म्हणजेच सुकलेल्या आल्याची पावडर चहामध्ये टाकणे हा एक चांगला आणि हेल्दी पर्याय असू शकतो. सुंठ पावडर फक्त शरीर थंड ठेवण्यासच मदत करत नाही, तर पोटासाठी देखील खूप हलके मानले जाते. 

रवा-भाज्यांचे पौष्टिक पॅनकेक, नेहमीच्या नाश्त्याला चविष्ट ट्विस्ट - सुपरहेल्दी टेस्टी पदार्थ...

आठवड्यातून एकदा कमोडमध्ये बर्फाचे तुकडे का टाकावेत? फायद्याची आहे व्हायरल ट्रिक - विनामेहनत कमोड स्वच्छ... 

उन्हाळ्यात चहामध्ये आल्याऐवजी 'सुंठ पावडर' का वापरावी?

१. पचनासाठी हलकी :- उन्हाळ्यात दूध घातलेला चहा पचायला जड होतो. आल्याची प्रकृती उष्ण असते, पण सुंठ (Dry Ginger) पचायला हलकी आणि गुणधर्माने शीतल मानली जाते.

२. पोटाचे विकार :- सुंठ चहामध्ये टाकल्याने ॲसिडिटी, ब्लोटिंग (पोट फुगणे) आणि पोटाचा जडपणा कमी होतो. हे शरीरातील 'डायजेस्टिव्ह फायर' (पाचक अग्नी) वाढवण्यास मदत करते.

३. आळस दूर करते :- चहा प्यायल्यानंतर येणारी सुस्ती किंवा जडपणा घालवण्यासाठी सुंठ पावडर अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यातील चहा हेल्दी करण्यासाठी आल्याऐवजी सुंठ पावडरचा वापर करणे हा एक उत्तम पर्याय आहे.

२१ दिवस पपई 'या' पद्धतीने खा! ढेरी होईल कमी, फॅटी लिव्हर आणि वेटलॉसही होईल झटपट, व्हाल सुपरफिट... 

चहा तयार करताना सुंठ पावडर नेमकी कधी घालावी ? 

ज्याप्रमाणे आपण चहामध्ये आलं कुटून टाकतो, त्याचप्रमाणे, १ छोटा चमचाभर सुंठ पावडर पाण्यात उकळायला टाका. त्यानंतर चहा पावडर, दूध आणि साखर घालून चहा तयार करा. उन्हाळ्यात दूध घातलेला चहा पचायला जड होतो, अशावेळी सुंठ पावडर टाकल्याने चहा पचायला हलका होतो. यामुळे पोटाचा जडपणा, गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. उन्हाळ्यात आलं जास्त उष्ण असते, त्याऐवजी सुंठ पावडर वापरणे हा एक आरोग्यदायी पर्याय आहे.


English
हिंदी सारांश
Web Title : Drink tea in summer, but replace ginger with dry ginger!

Web Summary : Drinking hot tea in summer can be harmful. Replace ginger with dry ginger powder in your tea. This helps keep the body cool, aids digestion, prevents acidity and bloating, and keeps you feeling refreshed.
टॅग्स :अन्नपाककृतीउन्हाळासमर स्पेशलकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आरोग्यहेल्थ टिप्स