lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > Cooking Tips : रोजच्या स्वयंपाकाला द्या मस्त तडका, ३ टिप्स-झटपट चविष्ट स्वयंपाक

Cooking Tips : रोजच्या स्वयंपाकाला द्या मस्त तडका, ३ टिप्स-झटपट चविष्ट स्वयंपाक

Cooking Hacks And Tips : जर तुम्ही घरी कोणाला जेवायला बोलावले असेल आणि त्यांना गोड खीर खाऊ घालत असाल तर आम्ही खीर बनवण्याची एक अतिशय सोपी पद्धत माहीत करून घ्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 12:36 PM2022-05-31T12:36:00+5:302022-05-31T13:38:26+5:30

Cooking Hacks And Tips : जर तुम्ही घरी कोणाला जेवायला बोलावले असेल आणि त्यांना गोड खीर खाऊ घालत असाल तर आम्ही खीर बनवण्याची एक अतिशय सोपी पद्धत माहीत करून घ्या.

Cooking Hacks And Tips : Tips and tricks to cook food early and tasty | Cooking Tips : रोजच्या स्वयंपाकाला द्या मस्त तडका, ३ टिप्स-झटपट चविष्ट स्वयंपाक

Cooking Tips : रोजच्या स्वयंपाकाला द्या मस्त तडका, ३ टिप्स-झटपट चविष्ट स्वयंपाक

आजच्या काळात स्त्री असो की पुरुष, दोघेही एकमेकांना मोठ्या उत्साहाने साथ देतात. ऑफिस असो किंवा घरातील कोणतेही काम. एकमेकांच्या सहकार्याशिवाय काम करणे खूप अवघड होऊन बसते. घराच्या अनेक जबाबदाऱ्या एकट्या स्त्रीवर आल्याचे अनेकवेळा दिसून येते. (Cooking Hacks And Tips) आजच्या लेखात आम्ही असे काही हॅक्स सांगणार आहोत जे तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतात. त्यांचा अवलंब करून तुम्ही खीर, भात आणि डाळ पटकन तसेच स्वादिष्ट बनवू शकता. (Tips and tricks to cook food early and tasty)

1) जर तुम्ही घरी कोणाला जेवायला बोलावले असेल आणि त्यांना गोड खीर खाऊ घालत असाल तर आम्ही खीर बनवण्याची एक अतिशय सोपी पद्धत माहीत करून घ्या. ज्याद्वारे तुमचा गॅसही कमी खर्च होईल, खीर लवकर तयार होईल आणि  चवही अप्रतिम असेल. सर्वप्रथम कुकरमध्ये भात शिजवून घ्या. पहिली पद्धत, त्यानंतर उकळलेल्या दुधात मिल्क मेड मिक्स करून त्यात भात टाकावा. आता २-३ उकळी येईपर्यंत शिजवा. वरून वेलची पावडर आणि भाजलेले ड्रायफ्रुट्स घाला.

2) याशिवाय दुसरा मार्ग म्हणजे कुकरमध्ये दूध, तांदूळ आणि साखर टाकून एक शिट्टी येईपर्यंत शिजवा. झाकण काढून त्यात तळलेले ड्रायफ्रुट्स आणि वेलची पूड घालून दोन उकळी येईपर्यंत शिजवा. यामुळे तुमची खीर खूप चविष्ट होईल. वेळ आणि गॅस दोन्हीची बचत होईल.

3) बरेचदा असे होते की पाहुणे येणार असतात तेव्हा भात चिकटू लागतो. अशा स्थितीत भात बनवण्यापूर्वी कुकरमध्ये दोन चमचे तूप किंवा तेल टाकावे. यामुळे तांदूळ एकत्र चिकटणार नाही आणि स्वादिष्ट देखील होईल.

4) डाळ बनवण्यापूर्वी काही वेळ पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे डाळ लवकर शिजेल.  गॅस आणि वेळेची बचत होईल. आता स्वादिष्ट डाळ बनवण्यासाठी सर्वप्रथम डाळीची फोडणी घाला. डाळीची चव वाढवण्यासाठी तुम्ही ती आधी थोडी भाजूनही घेऊ शकता. याशिवाय डाळ बनवण्यासाठी कुकरचे झाकण लावण्यापूर्वी काही वेळ असेच शिजवावे. त्यामुळे पाणी कमी पडणार नाही आणि डाळही रुचकर बनेल.

Web Title: Cooking Hacks And Tips : Tips and tricks to cook food early and tasty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.