बाजारात मिळणारी ताजी, हिरवीगार वालपापडी पाहिली की, ती विकत घेण्याचा मोह आवरताच येत नाही. हिरवीगार, करकरीत वालपापडी चवीला जितकी खास, तितकीच पौष्टिकही असते. वालपापडी विकत आणताच नेहमीची रस्सा भाजी किंवा सुकी भाजी तर आपण हमखास करतोच, पण याच वालपापडीचा एक खास पदार्थ म्हणजे खमंग, कुरकुरीत भरली वालपापडी...आत्तापर्यंत आपण भरली वांगी, भरली कारली, भरली भेंडी, भरली मिरची अनेकदा खाल्ली असेल, पण या सगळ्यांसोबतच भरल्या वालपापडीची चवच न्यारी...दिसायला कुरकुरीत, खमंग तसेच मसाल्याचा सुगंध आणि घरगुती चवीमुळे सारण भरलेली वालपापडी चवीला अप्रतिम लागते की, दोन पोळ्या जास्तच खाल्ल्या जातील! गरमागरम वरण-भात आणि सोबत खमंग, कुरकुरीत भरली वालपापडी... नुसत्या कल्पनेनेच तोंडाला पाणी सुटतं ना? वालपापडीच्या शेंगांमध्ये भरलेला मसाला जेव्हा तेलात छान परतला जातो, तेव्हा त्याचा सुगंध घरभर दरवळतो(Bharli Valpapdi Recipe).
कमी साहित्यात आणि झटपट होणारी ही कुरकुरीत वालपापडी म्हणजे जेवणाच्या ताटातील विशेष पदार्थ... मसाला भरून केलेली ही कुरकुरीत वालपापडी दिसायला जितकी छान दिसते, तितकीच ती चवीला भन्नाट लागते. मुलांच्या डब्यापासून ते पाहुण्यांच्या पाहुणचारापर्यंत, ही रेसिपी खाणाऱ्या प्रत्येकाला आवडेल अशीच आहे. खमंग आणि कुरकुरीत भरली वालपापडी (How To Make Bharli Valpapdi At Home) करण्याची साधीसोपी रेसिपी पाहूयात...
साहित्य :-
१. वालपापडी - पाव किलो
२. बेसन - २ ते ३ टेबलस्पून
३. तांदुळाचे पीठ - १ टेबलस्पून
४. धणेपूड - १/२ टेबलस्पून
५. जिरेपूड - १/२ टेबलस्पून
६. हळद - १/२ टेबलस्पून
७. लाल तिखट मसाला - १/२ टेबलस्पून
८. हिंग - चिमूटभर
९. कोथिंबीर - १ टेबल्स्पून (बारीक चिरलेली)
१०. लिंबाचा रस - ३ ते ४ टेबलस्पून
११. मीठ - चवीनुसार
१२. पाणी - गरजेनुसार
१३. वालपापडीमधील दाणे - १ ते २ टेबलस्पून (बारीक चिरुन घालावेत)
मदुराई स्पेशल थन्नी चटणी करा घरी, नारळ न वापरता केलेली चटणी-मदुराई सिल्कपेक्षा सॉफ्ट...
एक तेल थेंब न वापरता करा भरली उकड वांगी! अस्सल गावरान बेत, बाजरीच्या भाकरीसोबत खाऊन तर पाहा...
कृती :-
१. सगळ्यातआधी वालपापडीच्या शेंगा पाण्याने २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घ्याव्यात.
२. मग या शेंगां बरोबर मधोमध फोडून त्यांचे धागे दोन्ही बाजुंनी काढून घ्यावेत. या सगळ्या शेंगा व्यवस्थित निवडून बरोबर मधोमध उघडून त्यातील काही दाणे काढून घ्यावेत.
प्रमाण चुकलं की इडली डोसे फसलेच, डाळ तांदळांचं ‘असं’ गणित परफेक्ट- अजिबात विसरु नका प्रमाण...
३. एका बाऊलमध्ये बेसन, तांदुळाचे पीठ, धणेपूड, जिरेपूड, हळद, लाल तिखट मसाला, हिंग, कोथिंबीर, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ तसेच वालपापडी मधील दाणे हलकेच दाबून क्रश करून घालावेत सगळ्यात शेवटी गरजेनुसार पाणी घालून पीठ कालवून त्याची घट्टसर अशी पेस्ट तयार करून घ्यावी. तयार बेसनाचे सारण या फोडून घेतलेल्या वालपापडीच्या शेंगांमध्ये भरून घ्यावे.
४. पॅनमध्ये तेल घेऊन त्यात या सारण भरलेल्या वालपापडीच्या शेंगा ठेवून तेलात खरपूस होईपर्यंत भाजून घ्याव्यात.
खाण्यासाठी तयार आहेत बेसनाचे सारण भरलेली खमंग चवीची 'भरली वालपापडी'... साधा वरण भात असो किंवा अगदी चपाती, भाकरीसोबतही ही कुरकुरीत 'भरली वालपापडी' खाण्याची मज्जा काही औरच आहे.
