lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > व्हिटॅमिन B १२ खूप कमी आहे? खा ५ पदार्थ - मिळेल भरपूर व्हिटॅमिन बी

व्हिटॅमिन B १२ खूप कमी आहे? खा ५ पदार्थ - मिळेल भरपूर व्हिटॅमिन बी

Top 5 foods rich in vitamin b : असे अनेक शाकाहारी पदार्थ आहेत जे या पोषक तत्वांनी भरलेले असतात. अनेक हिरव्या पालेभाज्या फोलेट (B9) चा उत्कृष्ट स्रोत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 01:52 PM2023-04-02T13:52:11+5:302023-04-02T15:37:10+5:30

Top 5 foods rich in vitamin b : असे अनेक शाकाहारी पदार्थ आहेत जे या पोषक तत्वांनी भरलेले असतात. अनेक हिरव्या पालेभाज्या फोलेट (B9) चा उत्कृष्ट स्रोत आहेत.

Top 5 foods rich in vitamin b : Include these 5 vitamin b rich vegetarian foods in your diet to beat weakness and tiredness | व्हिटॅमिन B १२ खूप कमी आहे? खा ५ पदार्थ - मिळेल भरपूर व्हिटॅमिन बी

व्हिटॅमिन B १२ खूप कमी आहे? खा ५ पदार्थ - मिळेल भरपूर व्हिटॅमिन बी

नेहमी थकवा, कमकुवतपणा जाणवल्यानं मांसपेशी कमकुवत होतात. यामुळे हातापायांमध्ये झिणझिण्या येतात. जर तुम्हालाही हा त्रास जाणवत असेल तर समजून जा व्हिटामी बी ची (Vitamin-B) कमतरता तुमच्या शरीरात आहे. शरीराच्या सुरळीत कार्यासाठी प्रोटीन्स, व्हिटामीन सी, कॅल्शियम आणि अन्य पोषक तत्वांची आवश्यकता असते. यामुळे शरीराला उर्जा मिळते. 
व्हिटामीन बी च्या कमतरतेनं लोकांना थकवा, कमकुवतपणा, उर्जेची कमतरता जाणवते. (Include these 5 vitamin b rich vegetarian foods in your diet to beat weakness and tiredness)

हात पाय सुन्न पडतात. मांसपेशी कमकुवत होतात. यामुळे कठीण स्थितीचा सामना करावा लागू शकतो. यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. ज्यात पेलाग्रा, एनिमिया  यांसारख्या आजारांचा धोका असतो. याव्यतिरिक्त तुम्हाला स्मृती कमी होणं, कंफ्यूजन, डिप्रेशन, डिमेंशिया यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. (Top 5 foods rich in vitamin b)

व्हिटामीन बी ची कमतरता  कशी पूर्ण करायची?

बहुतेक लोकांना असे वाटते की व्हिटामिन बी फक्त अंडी, चिकन, मांस किंवा मासे यासारख्या मांसाहारी पदार्थांमध्ये आढळते, परंतु ही कल्पना चुकीची आहे. असे अनेक शाकाहारी पदार्थ आहेत जे या पोषक तत्वांनी भरलेले असतात.
अनेक हिरव्या पालेभाज्या फोलेट (B9) चा उत्कृष्ट स्रोत आहेत.

- हिरव्या पालेभाज्या जसे की पालक,मेथी  रोजच्या गरजेच्या ३९ टक्के बी व्हिटामीन  पुरवू शकतात. जेवण करताना भाज्या हलक्या वाफवून घ्याव्यात कारण जास्त शिजवल्याने पोषक तत्वांचा नाश होऊ शकतो.

जेवण कमी केल्यानं वजन भराभर घटतं? स्लिम, फिट राहण्यासाठी तज्ज्ञ सांगतात की....

- FDA च्या मते, एक कप (240 ml) दूध तुम्हाला तुमच्या दैनंदिन गरजांपैकी 26% रिबोफ्लेविन, तसेच इतर B व्हिटामीन पुरवू शकते. दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थ हे बी जीवनसत्त्वांचा चांगला स्रोत आहेत.

- चणे, काळे हरभरे आणि हिरवे वाटाणे यांसारख्या शेंगा फोलेटने परिपूर्ण असतात. हे पदार्थ थायामिन, रिबोफ्लेविन, नियासिन, पॅन्टोथेनिक ऍसिड आणि B6 सह इतर बी जीवनसत्त्वे देखील चांगले स्रोत आहेत.

- दह्यात रिबोफ्लेविन आणि बी12 भरपूर प्रमाणात असते. 163 ग्रॅम दही तुम्हाला तुमच्या रोजच्या गरजेपैकी 18% B2 आणि 26% B12 देऊ शकते. याशिवाय दह्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीनही मुबलक प्रमाणात आढळते.

शरीरातलं बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारी भाजी, रोज खा-बीपी वाढण्याचा त्रासही होईल कमी

- सूर्यफुलाच्या बिया हे पॅन्टोथेनिक ऍसिडच्या सर्वोत्तम वनस्पती स्त्रोतांपैकी एक आहेत. 28 ग्रॅम बिया तुम्हाला तुमच्या दैनंदिन गरजांपैकी 40% पॅन्टोथेनिक ऍसिडच्या पुरवू शकतात. याशिवाय, हे नियासिन, फोलेट आणि बी6 चा चांगला स्रोत आहे.

Web Title: Top 5 foods rich in vitamin b : Include these 5 vitamin b rich vegetarian foods in your diet to beat weakness and tiredness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.