Lokmat Sakhi >Fitness > कंबर-मागचा भाग खूपच वाढलाय? शिल्पा शेट्टी सांगतेय २ योगासनं, स्लिम-फिट राहण्याचं सिक्रेट

कंबर-मागचा भाग खूपच वाढलाय? शिल्पा शेट्टी सांगतेय २ योगासनं, स्लिम-फिट राहण्याचं सिक्रेट

Shilpa Shetty Fitness Routine : शिल्पाप्रमाणे तरूण दिसण्यासाठी २ योगासनं तुम्ही रोज केलीत फायदा होईल. तिनं इंस्टाग्रामवर याबद्दल माहिती दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 12:16 PM2023-05-08T12:16:30+5:302023-05-08T12:44:59+5:30

Shilpa Shetty Fitness Routine : शिल्पाप्रमाणे तरूण दिसण्यासाठी २ योगासनं तुम्ही रोज केलीत फायदा होईल. तिनं इंस्टाग्रामवर याबद्दल माहिती दिली आहे.

Shilpa Shetty Fitness Routine : Fitness lessons to learn from Shilpa Shetty yoga for women | कंबर-मागचा भाग खूपच वाढलाय? शिल्पा शेट्टी सांगतेय २ योगासनं, स्लिम-फिट राहण्याचं सिक्रेट

कंबर-मागचा भाग खूपच वाढलाय? शिल्पा शेट्टी सांगतेय २ योगासनं, स्लिम-फिट राहण्याचं सिक्रेट

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे वय  ४७ वर्ष आहे. या वयातही ती यंग आणि सुपरफिट दिसते. तिचा फिटनेस आणि सुंदरता पाहून प्रत्येकाला तिचा हेवा वाटतो. शिल्पा शेट्टी फिटनेस फ्रिक असून ती स्वत:ला मेटेंन ठेवण्यासाठी रोज योगासनं करते.  (Shilpa Shetty Fitness Routine) शिल्पा  शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्याकडेही तितकंच लक्ष देते.  इंस्टाग्रामवर ती आपल्या फॅन्ससह फिटनेस रुटीनचे  व्हिडिओज आणि फोटोज शेअर करत असते.  शिल्पाप्रमाणे तरूण दिसण्यासाठी २ योगासनं तुम्ही रोज केलीत फायदा होईल. तिनं इंस्टाग्रामवर याबद्दल माहिती दिली आहे. (Fitness lessons to learn from Shilpa Shetty yoga for women)

पार्श्व बकासन

शिल्पा शेट्टी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी रोज पाश्व बकासन करते. याचे फायदे सांगताना तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, पार्श्व बकासनाला साइड क्रो पोज असंही म्हणतात. हे एक एडवांस आसन आहे. रोज हे योगासन केल्यानं कोअर मसल्स मजबूत होतात आणि मानसिक आरोग्यही सुधारते. 

गत्यात्मक एकपाद उष्ट्रासन

शिल्पानं इंस्टाच्या एका व्हिडिओमध्ये गत्यात्मक एकपाद उष्ट्रासन करताना  दाखवले आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिनं फायदे लिहिले ती म्हणाली की हे आसन ऑब्लिक मसल्सना टोन करते आणि पाठीची स्ट्रेंथ आणि फ्लेस्किबिलिटी वाढवते.  यामुळे शरीर निरोगी आणि तंदरूस्त राहते आणि अखडलेल्या स्नायूंना आराम मिळतो. 

शरीरात साचलेले घातक पदार्थ बाहेर काढतील ७ डिटॉक्स टिप्स; शरीर होईल स्वच्छ-ग्लोईंग दिसाल

शिल्पा शेट्टी दिवसाला १८०० कॅलरीज घेते. तिच्या दिवसाची सुरूवात एलोवेरा ज्यूसनं होते. याशिवाय ती कमी ग्लायसेमिक एंडेक्स  असलेल्या कार्ब्सचा आहारात समावेश करते. जेवणात ती ऑलिव्ह ऑईलचा वापर करते.  शिल्पाला नॉनव्हेजिटेरियन पदार्थ जास्त आवडतात. योगा आणि व्यायामासह शिल्पाला प्रोटीन शेकही खूप आवडतो.  आठवड्यात ६ दिवस ती जेवणावर नियंत्रण ठेवते आणि एका दिवशी रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाते. जेवणादरम्यान ती स्नॅक्स खात नाही यामुळे कॅलरीज वाढतात असं तिचं मत आहे.

शरीर सडपातळ, पोट फार सुटलंय? रोज फक्त इतकी पाऊलं चाला; झरझर घटेल चरबी

स्वत:ला मेटेंन ठेवण्यासाठी शिल्पा वेगवेगळे व्यायाम करते. ज्यात कार्डिओ वर्कआऊटपासून स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि योगाचा समावेश आहे. ती आठवड्यातून फकक्त ५ दिवस व्यायाम करते. ज्यात कार्डिओ वर्कआऊटपासून स्ट्रेंथ टेनिंगचा समावेश आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंगदरम्यान मांसपेशींना आकार देण्यासाठी ती जड वजन उचलण्याचा प्रयत्न करते. इतकंच नाही तर ताण तणाव कमी करण्यासाठी १० मिनिट मेडिटेशनसुद्धा करते. 

Web Title: Shilpa Shetty Fitness Routine : Fitness lessons to learn from Shilpa Shetty yoga for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.