Lokmat Sakhi >Fitness > पावसाळी हवेमुळे घशात खवखव, टॉन्सिल्सचा त्रास? २ योगमुद्रा करा, त्रास होईल कमी 

पावसाळी हवेमुळे घशात खवखव, टॉन्सिल्सचा त्रास? २ योगमुद्रा करा, त्रास होईल कमी 

Health Tips: घशात खवखव होणे, टॉन्सिल्स  (throat infection and tonsils) हे पावसाळ्यात हमखास घरोघर दिसून येणारे आजार. त्यावरचा हा बघा एक उत्तम उपाय (Yog Mudra and home remedies)...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2023 05:23 PM2023-08-05T17:23:48+5:302023-08-05T17:35:51+5:30

Health Tips: घशात खवखव होणे, टॉन्सिल्स  (throat infection and tonsils) हे पावसाळ्यात हमखास घरोघर दिसून येणारे आजार. त्यावरचा हा बघा एक उत्तम उपाय (Yog Mudra and home remedies)...

Monsoon Special Health Tips: Yog Mudra and home remedies for throat infection and tonsils, Benefits of Shankh mudra and Pran mudra | पावसाळी हवेमुळे घशात खवखव, टॉन्सिल्सचा त्रास? २ योगमुद्रा करा, त्रास होईल कमी 

पावसाळी हवेमुळे घशात खवखव, टॉन्सिल्सचा त्रास? २ योगमुद्रा करा, त्रास होईल कमी 

Highlights घसा खवखवणे किंवा टॉन्सिलचा त्रास असेल तर सगळ्यात आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही उत्तम. पण त्यासोबतच या काही योग्य मुद्रा करून बघायला हरकत नाही.

पावसाळा आला की येताना सोबत अनेक आजार घेऊन येतो. या दिवसांमध्ये सर्दी- खोकला, ताप येणे, अंगदुखी असा त्रास अनेक जणांना जाणवतो. अगदी घरोघरी या त्रासाचे रुग्ण असतात, असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. शिवाय घशात खवखव होणे आणि टॉन्सिलचा त्रासही (throat infection and tonsils) अनेकांना जाणवतो. लहान मुलंच नाही तर कित्येकदा मोठ्या मंडळींही अशा आजारांमुळे वैतागलेली असतात. तुम्हालाही पावसाळी हवेमुळे (Monsoon Special Health Tips) घशात खवखव होणे, टॉन्सिल्स असा त्रास होत असेल तर हा उपाय (Yog Mudra and home remedies) करून बघायला हरकत नाही.

 

हा उपाय इंस्टाग्रामच्या yogic_hacks या पेजवर शेअर करण्यात आला आहे. घसा खवखवणे किंवा टॉन्सिलचा त्रास असेल तर सगळ्यात आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही उत्तम.

Friendship Day: १०० रूपयांपेक्षा कमी किमतीत मित्रमैत्रिणींना द्या ६ भन्नाट गिफ्ट, दोस्त होतील खुश

पण त्यासोबतच या काही योग्य मुद्रा करून बघायला हरकत नाही. शंखमुद्रा आणि प्राणमुद्रा (Shankh mudra and Pran mudra) घशातली खवखव आणि टॉन्सिलचा त्रास कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. थायरॉईड असणाऱ्यांसाठी देखील हा उपाय गुणकारी ठरेल, असे या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे.

 

कशी करायची शंखमुद्रा?
शंखमुद्रा करण्यासाठी उजव्या हाताच्या अंगठ्याच्या खालच्या बाजुला डाव्या हाताच्या अंगठ्याचे वरचे टोक ठेवा.

मुलांच्या डब्यासाठी करा ‘डाळींचे आप्पे’! चविष्ट गरमागरम नाश्ता- रेसिपी सोपी आणि पौष्टिक 

आता उजव्या हाताची चारही बोटे डाव्या हाताच्या अंगठ्याभोवती लपेटून घ्या. डाव्या हाताची उर्वरीत चार बोटे उजव्या हाताच्या बोटांवर ठेवा आणि डाव्या हाताच्या मधल्या बोटाचे वरचे टोक उजव्या हाताच्या अंगठ्याच्या वरच्या टोकावर लावा. ही मुद्रा केल्यानंतर २१ वेळा भ्रामरी प्राणायाम पद्धतीने श्वसन करा. 

 

प्राणमुद्रा करण्याची पद्धत
शंखमुद्रा करून झाल्यानंतर पुढील ५ मिनिटांसाठी प्राणमुद्रा करावी.

‘तारीफ करु क्या..’- अजय देवगणने काजोलला लेकीसह दिली वाढदिवसाची खास भेट

ही मुद्रा करण्यासाठी दोन्ही हातांची करंगळी आणि तिच्या बाजुचे बोट तसेच अंगठा यांचे वरची टोके एकमेकांना जोडावीत. डोळे मिटून शांत मनाने पुढील ५ मिनिटांसाठी ही मुद्रा टिकवून ठेवावी. 

 

 

Web Title: Monsoon Special Health Tips: Yog Mudra and home remedies for throat infection and tonsils, Benefits of Shankh mudra and Pran mudra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.