lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > पोट खूपच सुटलंय? बेली फॅट घटवण्यासाठी रामदेव बाबांचे १० उपाय, सुडौल दिसाल

पोट खूपच सुटलंय? बेली फॅट घटवण्यासाठी रामदेव बाबांचे १० उपाय, सुडौल दिसाल

How to Lose Belly fat : वजन कमी करण्यासाठी बरेच लोक डाएट, व्यायाम करतात पण त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 10:37 AM2023-04-05T10:37:44+5:302023-04-05T17:45:27+5:30

How to Lose Belly fat : वजन कमी करण्यासाठी बरेच लोक डाएट, व्यायाम करतात पण त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही.

How to Lose Belly fat : Baba ramdev suggested weight loss tips by yog guru baba ramdev | पोट खूपच सुटलंय? बेली फॅट घटवण्यासाठी रामदेव बाबांचे १० उपाय, सुडौल दिसाल

पोट खूपच सुटलंय? बेली फॅट घटवण्यासाठी रामदेव बाबांचे १० उपाय, सुडौल दिसाल

जगभरातील इतर देशांप्रमाणेत भारतातही लठ्ठपणाचा त्रास वाढत चाललाय. ही सध्याची सगळ्यात मोठी समस्या बनलीये. (How to loss belly Fat) लठ्ठपणा वाढल्यानं डायबिटीस, हार्ट डिसिज, हाय बीपी, स्ट्रोक, इन्फर्टिलिटी यांसारखे अनेक आजार उद्भवू शकतात.  जे शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. (10 Effective Tips to Lose Belly Fat by expert Baba ramdev) वजन कमी करण्यासाठी बरेच लोक डाएट, व्यायाम करतात पण त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही.

लठ्ठपणा कसा कमी करायचा? (belly Fat loss Tips)

लठ्ठपणा कमी करण्यासाठी योग आणि व्यायाम करणं गरजेचं आहे. डाएट आणि आयुवेर्दीक औषधी वनस्पतींचे कॉम्बिनेशन इफेक्टिव्हा मानलं जातं. योग गुरू बाबा रामदेव यांनी वेगानं वजन कमी करण्यासाठी काही सल्ले दिले आहेत. आपल्या रोजच्या जीवनात बदल  केल्यास तब्येत चांगली राहण्यास मदत होईल. 

१) कपालभाती प्राणायम करा

कपालभाती प्राणायम ३० मिनिटं केल्यानं पोटाच्या मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते. 

२) ५ मिनिटं हस्तपादासन करा. 

रोज ५ मिनिटांसाठी हस्तपादासन करा, नंतर सरळ झोपून एक-एक पाय वर करून सायकलप्रमाणे चालवा. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होईल.

३) सुर्य नमस्कार घाला

नियमित जॉगिंग आणि सूर्यनमस्कार करा. यामुळे पोटाभोवतीची चरबी झपाट्याने कमी होईल.

४) रनिंगनं लठ्ठपणा कमी होईल

जर तुम्ही तरूण असाल तर रनिंग किंवा स्विमिंग करू शकता. यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहतं आणि शरीरात एक्स्ट्रा फॅट जमा होत नाही.

५) उज्जय व्यायाम

थायरॉईडमुळे लठ्ठपणा असल्यास कपालभाती प्राणायाम सोबत उज्जय प्राणायाम ७-११ वेळा करावा. यामुळे थायरॉईड नियंत्रण राहील. लठ्ठपणाची समस्या दूर होईल.

६) एक्यूपंचर

हाताच्या अंगठ्याखाली 2-2 मिनिटे दाबा. यामुळे लठ्ठपणासोबतच थायरॉईडच्या समस्येतही फायदा होईल.

७) लठ्ठपणासाठी वैद्यकीय सल्ला घ्या

मेदोहर वटीच्या २-२ गोळ्या आणि त्रिफळा १-१ गोळी सकाळ संध्याकाळ खा.

८) अश्वगंधा

अश्वगंधाची 3-3 पाने सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी हातात घेऊन चावून खावीत.

९) गोमूत्र

3-5 चमचे गोमूत्र अर्क कोमट पाण्यात मिसळून सकाळी आणि संध्याकाळी रिकाम्या पोटी प्या.

१०) कार्बोहायड्रेट्सचे सेवन कमी करा

कार्बोहायड्रेटचे सेवन कमी करा, हिरव्या भाज्या, मोड आलेले कडधान्य खा आणि प्रथिनेयुक्त आहार घ्या. चरबी आणि गोड टाळा, जेव्हाही तहान लागेल तेव्हा कोमट पाणी प्या.

Web Title: How to Lose Belly fat : Baba ramdev suggested weight loss tips by yog guru baba ramdev

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.