Lokmat Sakhi >Fitness > योगाभ्यास म्हणजे रॉकेट, उशीरा शिकाल तर पस्तावाल! दिलजीत दोसांझ सांगतो, योगाभ्यास सुरु केला आणि..

योगाभ्यास म्हणजे रॉकेट, उशीरा शिकाल तर पस्तावाल! दिलजीत दोसांझ सांगतो, योगाभ्यास सुरु केला आणि..

Diljit Dosanjh Advocates For Yoga, Says Every Child Must Do It: Here Are Simple Yoga Poses For Kids : दिलजीत दोसांझ सांगतो योगाभ्यास म्हणजे फक्त स्ट्रेचिंग नाही, योगाभ्यास तुमचं जगणं बदलतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2024 04:49 PM2024-05-23T16:49:59+5:302024-05-23T16:50:58+5:30

Diljit Dosanjh Advocates For Yoga, Says Every Child Must Do It: Here Are Simple Yoga Poses For Kids : दिलजीत दोसांझ सांगतो योगाभ्यास म्हणजे फक्त स्ट्रेचिंग नाही, योगाभ्यास तुमचं जगणं बदलतो.

Diljit Dosanjh Advocates For Yoga, Says Every Child Must Do It: Here Are Simple Yoga Poses For Kids | योगाभ्यास म्हणजे रॉकेट, उशीरा शिकाल तर पस्तावाल! दिलजीत दोसांझ सांगतो, योगाभ्यास सुरु केला आणि..

योगाभ्यास म्हणजे रॉकेट, उशीरा शिकाल तर पस्तावाल! दिलजीत दोसांझ सांगतो, योगाभ्यास सुरु केला आणि..

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगासनं गरजेचं आहे (Yoga). मुलांनीही नियमित योग आणि व्यायाम करायला हवे. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी हे खूप महत्वाचे असते (Diljit Dosanjh). सध्या मुलांमध्ये लठ्ठपणा आणि मन एकाग्रताची समस्या निर्माण होत आहे. या व अशा समस्या सोडवण्यासह योगासनं निरोगी आयुष्यासाठी फायदेशीर ठरते.

नुकतंच योगाचे महत्व दिलजीत दोसांझ यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. त्याने योगा चमत्कार आहे, असं सांगितलं. शिवाय लहान मुलांसाठी योगासनं किती महत्वाचं आहे? या बद्दल माहिती दिली. आपणही योगाभ्यास फार लवकर सुरु करायला हवा होता, ते चुकलंच अशी खंतही तो व्यक्त करतो(Diljit Dosanjh Advocates For Yoga, Says Every Child Must Do It: Here Are Simple Yoga Poses For Kids).

योगबद्दल दिलजित म्हणाला, 'आयुष्यात एका गोष्टीची मला खंत आहे. ती म्हणजे मी फार उशिरा योग करायला सुरुवात केली. लहानपणापासून मला योग शिकायला हवं होतं.  योग ही एक जीवन जगण्याची कला आहे. या दुनियेत योगापेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नाही. आपणं स्वतः योग करायला हवं शिवाय आपल्या मुलांना देखील योग शिकवायला हवं.'

लहान मुलांसाठी योगासनं का महत्वाचं?

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अभ्यासानुसार, 'योग लहान मुलांसाठी अतिशय फायदेशीर ठरते. यामुळे शरीराची लवचिकता वाढते. शिवाय एकाग्रता देखील वाढते. त्यामुळे लहान मुलांनी योगासनाचे धडे शिकायलाच हवे.

शरीरिक आरोग्य

नजर होईल तेज आणि लठ्ठपणा जाईल पळून? पाहा कोणत्या रंगाची गाजरं खाणं तुमच्यासाठी बेस्ट

योगासने लवचिकता, संतुलन आणि एकाग्रता सुधारण्यास मदत करते. जे एकूण शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. शिवाय लहानपणापासून योग केल्याने आपल्याला याची सवय होते, ज्यामुळे आपण निरोगी आरोग्य जगतो. मुख्य म्हणजे मुलांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते.

मानसिक आरोग्य

योगाभ्यास केल्याने एकाग्रता वाढू शकते, तणाव आणि चिंता कमी होऊ शकते. यासह मनात शांततेची भावना वाढू शकते. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी योगासनं करणं गरजेचं. मुख्य म्हणजे या सगळ्याचा फायदा मुलांच्या शालेय जीवनात होऊ शकतो.

मुलांसाठी योगासनं करण्याचे ६ फायदे

- बौद्धिक क्षमता वाढेल

- अभ्यासात मन लागेल. स्मरणशक्ती वाढेल.

दिवसा भरपूर पाणी प्या पण रात्री झोपण्यापूर्वी नको, असं का? झोपण्यापूर्वी पाणी कुणी प्यावे, कुणी नाही?

- रक्तदाब नियंत्रणात राहील.

- रोगप्रतिकार शक्ती वाढेल.

- वजन कंट्रोलमध्ये राहील. 

- हवामान बदलानुसार होणारे आजार छळणार नाही. 

Web Title: Diljit Dosanjh Advocates For Yoga, Says Every Child Must Do It: Here Are Simple Yoga Poses For Kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.