Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > नजर होईल तेज आणि लठ्ठपणा जाईल पळून? पाहा कोणत्या रंगाची गाजरं खाणं तुमच्यासाठी बेस्ट

नजर होईल तेज आणि लठ्ठपणा जाईल पळून? पाहा कोणत्या रंगाची गाजरं खाणं तुमच्यासाठी बेस्ट

4 Surprising Benefits of Black Carrots : लाल - नारंगीपेक्षा 'या' रंगाचे गाजर खा! आरोग्याला मिळतील फायदेच फायदे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2024 03:18 PM2024-05-23T15:18:07+5:302024-05-23T16:52:23+5:30

4 Surprising Benefits of Black Carrots : लाल - नारंगीपेक्षा 'या' रंगाचे गाजर खा! आरोग्याला मिळतील फायदेच फायदे..

4 Surprising Benefits of Black Carrots | नजर होईल तेज आणि लठ्ठपणा जाईल पळून? पाहा कोणत्या रंगाची गाजरं खाणं तुमच्यासाठी बेस्ट

नजर होईल तेज आणि लठ्ठपणा जाईल पळून? पाहा कोणत्या रंगाची गाजरं खाणं तुमच्यासाठी बेस्ट

उन्हाळा असो किंवा हिवाळा. गाजर प्रत्येक ऋतूत खायला हवे (Carrots Health Benefits). गाजर खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहे. गाजर त्यांच्या पौष्टिक मूल्य आणि अष्टपैलुत्वासाठी प्रसिद्ध आहे (Black Carrots). त्यात व्हिटॅमिन ए, सी आणि ई असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते (Weight Loss). शिवाय यात फायबरचे प्रमाणही जास्त असते. ज्यामुळे पचन संस्था सुधारते.

शिवाय बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. मुख्य म्हणजे यात पोटॅशियमचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. व हृदयविकाराचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो. पण आपल्याला गाजर वेट लॉससाठी मदत करते हे ठाऊक होतं का? कोणत्या प्रकारचे गजर खाल्ल्याने वेट लॉस करण्यास मदत होते? पाहूयात(4 Surprising Benefits of Black Carrots).

कोणत्या रंगाचे गजर खाल्ल्याने वेट लॉस होते?

काळ्या रंगाचे गाजर बाजारात कमी प्रमाणात मिळतात. पण आरोग्यासाठी या प्रकारचे गाजर फायदेशीर ठरू शकते. कारण यात पोषक तत्वांचा भंडार आहे. काळे गाजर नियमितपणे खाल्ल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. 

काळे गाजर वजन कसे कमी करते?

काळ्या गाजरात फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मँगनीज, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. शिवाय यात कॅलरीज आणि साखरेचे प्रमाणही कमी असते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. काळ्या गाजरांमध्ये भरपूर फायबर आढळते. फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. याशिवाय शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे, पचनसंस्था निरोगी ठेवणे, बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करते.

चहा करताना साखर आधी घालावी की नंतर? फक्कड चहा घरी करताना घाला '१' सिक्रेट पदार्थ

काळे गजर कसे खावे?

- गाजराचे सेवन करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ते पूर्णपणे धुवून खाणे, जर वरची माती किंवा घाण व्यवस्थित साफ होत नसेल तर त्याचा एक थर सोलून घ्या.

उष्माघाताचा कहर, शाहरुख खानला आली भोवळ! सनस्ट्रोकचा धोका टाळायचे पाहा उपाय - नाहीतर व्हावे लागेल ऍडमिट

- किंवा गाजराचा सॅलड देखील तयार करू शकता. हे सॅलड चवीला तर भन्नाट लागेलच, शिवाय पोटही दीर्घकाळ भरलेले राहील.

- आपण गाजराचा ज्यूस देखील तयार करून पिऊ शकता.

Web Title: 4 Surprising Benefits of Black Carrots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.