lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > घरून काम केल्यानं उद्भवताहेत हाडांच्या समस्या; तज्ज्ञांनी सांगितली बसून काम करण्याची योग्य पद्धत

घरून काम केल्यानं उद्भवताहेत हाडांच्या समस्या; तज्ज्ञांनी सांगितली बसून काम करण्याची योग्य पद्धत

Work from home tips : ऑफिसप्रमाणे घरातली खुर्ची, टेबल आरामदायक नसल्यामुळे लोकांना मानदुखी, पाठदुखी, डोकेदुखी तसंच कमरेच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 01:26 PM2021-05-20T13:26:07+5:302021-05-20T14:02:37+5:30

Work from home tips : ऑफिसप्रमाणे घरातली खुर्ची, टेबल आरामदायक नसल्यामुळे लोकांना मानदुखी, पाठदुखी, डोकेदुखी तसंच कमरेच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.

Common orthopedic problems faced while wfh and how to treat diet expert rujuta divekar gave tips | घरून काम केल्यानं उद्भवताहेत हाडांच्या समस्या; तज्ज्ञांनी सांगितली बसून काम करण्याची योग्य पद्धत

घरून काम केल्यानं उद्भवताहेत हाडांच्या समस्या; तज्ज्ञांनी सांगितली बसून काम करण्याची योग्य पद्धत

Highlightsलॅपटॉपमधून बाहेर येणारा प्रकार तुमच्या डोळ्यांसाठी घातक ठरतो. अशा स्थितीत खोलीत जास्तीत जास्त उजेड असेल याची काळजी घ्या.

एकिकडे कोरोना व्हायरसच्या संक्रमणानं लोक संकटात सापडले आहेत. तर दुसरीकडे घरात बंद राहिल्यामुळे लोकाना डिप्रेशन, एंग्जायटी अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. वर्क फॉर्म होममुळे २४ तास ७ दिवस लोकांना काम करावं लागत आहे. ऑफिसप्रमाणे घरातली खुर्ची, टेबल आरामदायक नसल्यामुळे लोकांना मानदुखी, पाठदुखी, डोकेदुखी तसंच कमरेच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी  प्रसिद्ध आहारतज्ज्ञ रुजूता दिवेकर यांनी  काही टिप्स सांगितल्या आहेत. 

या व्हिडीओत  त्यांनी शरीराच्या स्नायूंना आराम देण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत. जर आपण घराबाहेर काम करत असाल आणि काही तास सिस्टमवर बसावे लागत असेल तर काहीवेळ तुम्ही स्वतःला विश्रांती द्यायला हवी. तुम्ही सतत कंम्प्यूटरकडे पाहून थकला असाल तर थोडा ब्रेक घ्या. आपली खुर्ची विरुद्ध बाजूनं वळवून डोळ्यांना आराम द्या. त्यानंतर तुम्ही थोडेफार व्यायाम प्रकार करू शकता. जेणेकरून बराचवेळ एकाच स्थितीत बसल्यानं अवयवांवर आलेला ताण कमी करता येईल. 

जर तुम्ही काम करण्यासाठी लॅपटॉपचा वापर करत असाल तर दुसरा माऊस आणि किबोर्ड कनेक्ट करून याचा उपयोग करा.  त्यामुळे हात आणि मानेवर जास्त ताण येणार नाही. बसताना नेहमी बॉडी पोश्चरकडे लक्ष द्या. बसताना कंबर, पाठ , मान सरळ  एका रेषेत असावेत. 

लॅपटॉपमधून बाहेर येणारा प्रकार तुमच्या डोळ्यांसाठी घातक ठरतो. अशा स्थितीत खोलीत जास्तीत जास्त उजेड असेल याची काळजी घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही लॅपटॉपवर स्क्रिनवर गार्ड नक्कीच लावू शकता. त्यामुळे तुमचे डोळे चांगले राहण्यास मदत होईल.  घरून काम केल्यामुळे, आपल्याला बर्‍याच तासांकरिता काम करावे लागते. अशावेळी  हाडांच्या समस्या उद्भवण्याचा धोका वाढू शकतो. अशा स्थितीत आपली पाठ, मान, हात आणि पाय योग्य मार्गाने स्ट्रेच करा. यामुळे तुमच्या शरीरात वेदना होणार नाहीत आणि स्नायूंचा ताणही कमी होईल.

जर तुम्ही पूर्ण दिवस काम करत असाल तर व्यायाम, आराम करणंही तितकंच महत्वाचं आहे. एक-दोन तास काम केल्यानंतर तुम्ही १० मिनिटं व्यायाम करायला हवा. त्यावेळी आपल्या जागेवरून उठून चालण्याचा प्रयत्न करा.  त्यामुळे तुमच्या डोळ्यांना आराम मिळण्यास मदत होईल. जेव्हाही तुम्ही फोनवर बोलत असाल तेव्हा स्क्रिनवरून नजर बाजूला फिरवा, वेळ मिळाल्यास अधेमधे डोळ्यांना  थंड पाण्यानं धुवा.

रुजूता दिवेकर या नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर  एक व्हिडीओ शेअर केला होता. यात त्यांनी पारंपारिक उपवास करणं आणि बारिक होण्यासाठी उपाशी राहणं यातील फरक सांगितला होता. 

कोणत्याही धर्माचा पारंपारिक उपवास करताना आपण रोज जे अन्न खातो ते पदार्थ न खाता  वेगळ्या पदार्थांचा आहारात समावेश केला जातो किंवा अनेकजण फळं खाऊन, पूर्णपणे उपाशी राहून उपवास करतात. वजन कमी करण्यासाठी उपाशी राहिल्यास शरीरातील कॅलरीज कमी होणं हेच उद्दिष्ट असते.  त्यामुळे शरीरातील चरबी कमी होऊन वजन कमी होतं. इंटरमिटेंट फास्टिंग (Intermittent Fasting), OMAD  करण्याला लोक प्राध्यान्य देतात.

पारंपारिक उपवासासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचा फराळात समावेश करतात. काही उपवास असेही असतात जे आनंद साजरा करण्यासाठी केले जातात. साधारपणपणे साबुदाणा वडा, खिचडी, शिंगाड्याची पुरी,वरीचे तांदूळ असे पदार्थ तयार केले जातात. वजन कमी  करण्यासाठी फास्टींगमध्ये आहारात पोषक तत्वांचा समावेश असणं आवश्यक आहे. कार्ब्स, प्रोटीन्स, फायबरर्स असलेल्या पदार्थांचा समावेश रोजच्या आहारात असावा. जेणेकरून शरीराला पोषण मिळेल आणि जास्त चरबी जमा होणार नाही.

पारंपारिक उपवासासाठी अनेक नियम पाळावे लागतात. कारण या उपवासांसाठी शरीला फायदा मिळण्याच्या तुलनेत  देवाप्रती प्रेम, त्याग याकडे सगळ्यात जास्त लक्ष दिलं जातं.  उपवासांबाबत घरातील कोणत्याही व्यक्तीकडून तुम्हाला माहिती मिळते. पण वेट लॉस फास्टींगबाबत डायटीशियन, जाहिराती, लेख किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळते. 

Web Title: Common orthopedic problems faced while wfh and how to treat diet expert rujuta divekar gave tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.