Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्याला रोज लावा होममेड राइस जेल, तांदळाचा सोपा उपाय तुम्हाला करतो ५ वर्षे तरुण

चेहऱ्याला रोज लावा होममेड राइस जेल, तांदळाचा सोपा उपाय तुम्हाला करतो ५ वर्षे तरुण

Rice Gel for skin : नॅचरल पद्धतीने त्वचा ग्लोइंग हवी असेल, हेल्दी ठेवायची असेल तर राइस जेल हा बेस्ट पर्याय ठरू शकतो. या उपायाने त्वचेला पोषण मिळतं, डाग दूर होतात आणि त्वचा मुलायम सुद्धा होते. चला तर पाहुयात हा उपाय कसा कराल.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 14:43 IST2026-04-28T14:35:26+5:302026-04-28T14:43:02+5:30

Rice Gel for skin : नॅचरल पद्धतीने त्वचा ग्लोइंग हवी असेल, हेल्दी ठेवायची असेल तर राइस जेल हा बेस्ट पर्याय ठरू शकतो. या उपायाने त्वचेला पोषण मिळतं, डाग दूर होतात आणि त्वचा मुलायम सुद्धा होते. चला तर पाहुयात हा उपाय कसा कराल.  

Rice gel for glowing youthful skin naturally at home diy homemade | चेहऱ्याला रोज लावा होममेड राइस जेल, तांदळाचा सोपा उपाय तुम्हाला करतो ५ वर्षे तरुण

चेहऱ्याला रोज लावा होममेड राइस जेल, तांदळाचा सोपा उपाय तुम्हाला करतो ५ वर्षे तरुण

Rice Gel for skin : जसजसं तापमान वाढतं त्याचा प्रभाव थेट आपल्या त्वचेवर बघायला मिळतो. जर आपण त्वचेची योग्य ती काळजी घेतली नाही तर कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागता किंवा त्वचा सैल पडते. अशात बरेचजण मग महागडे क्रीम किंवा प्रॉडक्ट्स वापरतात. पण कमी खर्चातही काही घरगुती उपाय करून आपण त्वचेवरील सुरकुत्या टाळू शकता. हा उपाय म्हणजे तांदळाचं जेल. जर आपल्याला नॅचरल पद्धतीने त्वचा ग्लोइंग हवी असेल, हेल्दी ठेवायची असेल तर राइस जेल हा बेस्ट पर्याय ठरू शकतो. या उपायाने त्वचेला पोषण मिळतं, डाग दूर होतात आणि त्वचा मुलायम सुद्धा होते. चला तर पाहुयात हा उपाय कसा कराल.  

साहित्य  

अर्धा कप पांढरे तांदूळ, १ मोठे चमचा अॅलोव्हेरा जेल, २ मोठे चमचे ग्रीन टी, १ छोटा चमचा मध, १ व्हिटामिन ई कॅप्सूल तेल, अर्धा चमचा ग्लिसरीन, एक मोठा चमचा फर्मेंटेड राइस वॉटर, १ मोठा चमचा काकडीचा रस.   

राइस जेल कसा तयार कराल?   

सगळ्यात आधी तर तांदूळ दोनदा चांगले धुवा. नंतर दोन कप पाण्यात १५ मिनिटे शिजवा. पाण्याचा रंग दुधासारखा होईपर्यंत उकडा. त्यानंतर गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्या. थंड झाल्यावर ते मिक्सरमधून ब्लेंड करा. ब्लेंड केल्यानंतर पेस्ट कापडातून चांगली गाळून घ्या. नंतर ही पेस्ट ३० मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. जेव्हा ही पेस्ट घट्ट होईल, तेव्हा त्यात अॅलोव्हेरा जेल, ग्रीन टी, व्हिटामिन ई तेल, ग्लिसरीन, राइस वॉटर आणि काकडीचा रस टाकून चांगलं मिक्स करा. आपला राइस जेल तयार आहे. हा आपण साधारण एक आठवडा वापरू शकता.   

कसं लावाल? 

राइस जेल आपल्या चेहऱ्यावर लावण्याआधी चेहरा पाण्याचे स्वच्छ धुवा. त्यानंतरच राइस जेल चेहऱ्यावर लावा. हे राइस जेल चेहऱ्यावर हाताने टॅप करत लावा. जेणेकरून ते त्वचेमध्ये खोलवर जाईल. त्यानंतर थोड्या वेळाने सनस्क्रीन किंवा नाइट क्रीम लावू शकता. रात्री झोपण्याआधी जेल लावल्यास अधिक फायदा दिसेल. कारण ते रात्रभर त्वचेवर चांगलं काम करतं. तसं तर हे जेल आपण रोज रात्री लावू शकता. जास्त ड्राय स्किन असलेल्यांनी हे दिवसातून दोनदा लावू शकता. 

(Image Credit : Social Media)

Web Title : घर पर बना राइस जेल: झुर्रियाँ और रूखापन दूर, पाएं निखरी त्वचा

Web Summary : घर पर बने राइस जेल से झुर्रियों और रूखेपन से लड़ें। यह प्राकृतिक उपाय त्वचा को पोषण देता है, दाग-धब्बे कम करता है और मुलायम, चमकदार रंगत प्रदान करता है। चावल, एलोवेरा, ग्रीन टी और अन्य प्राकृतिक सामग्री का उपयोग करके तैयार करें। सर्वोत्तम परिणामों के लिए नियमित रूप से लगाएं।

Web Title : Homemade rice gel: Erase wrinkles and dullness for glowing skin.

Web Summary : Combat wrinkles and dullness with homemade rice gel. This natural remedy nourishes skin, reduces blemishes, and provides a soft, radiant complexion. Prepare using rice, aloe vera, green tea, and other natural ingredients. Apply regularly for best results.