सध्याची बदलती जीवनशैली, वाढतं प्रदूषण, मानसिक ताणतणाव आणि चुकीचा आहार यामुळे ऐन तारुण्यात अनेकांचे केस पांढरे होऊ लागले आहेत.(Hair care tips) फक्त केस पांढरे होणेच नाही तर केसगळती, कोरडे पडणे आणि कोंडा होण्याची समस्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. बाजारात मिळणारे महागडे हेअर कलर्स किंवा डाय सुरुवातीला केस काळे करतात पण यात असणारे अमोनिया आणि केमिकल्समुळे उर्वरित केस देखील पांढरे होतात. त्यासाठी काही घरगुती उपाय करणं सोपं आहे. (Herbal hair oil preparation at home)
आपल्या स्वयंपाकघरात असणाऱ्या काही गोष्टींचा वापर करुन आपण होममेड मॅजिकल रोस्टेड ऑइलने केसांची मालिश करु शकतो.(Hair oil for white hair) नियमितपणे हे तेल केसांना लावल्यास पांढरे केस तर काळे होतीलच पण केसांची वाढ देखील होईल. हे तेल केमिकल विरहित असून केसांची गळती थांबवून त्यांना मुळापासून काळे आणि दाट बनवण्यास मदत करते. पाहूया तेल बनवण्याची सोपी पद्धत.
तेल बनवण्यासाठी लागणारे साहित्य
सुकलेल्या कांद्याची साल- २ ते ३
कढीपत्ता- एक मूठभर
कलौंजी- एक चमचा
लवंग- ४ ते ५
राईचे तेल - १ वाटी
तेल बनवण्याची कृती
1. सगळ्यात आधी गॅसवर जाड बुडाचे भांडे किंवा लोखंडी कढई ठेवा. त्यानंतर त्यात राईचे तेल घालून गॅस मंद आचेवर ठेवा.
2. या तेलात कांद्याच्या २ ते ३ साली, मूठभर कढीपत्ता, एक चमचा कलौंजी आणि ४ ते ५ लवंग घाला.
3. हे मिश्रण मंद आचेवर हळूहळू उकळू द्या. जसजसे हे साहित्य तेलात शिजेल तसतसा तेलाचा रंग बदलू लागेल.
4. सर्व साहित्य पूर्णपणे काळे पडेपर्यंत तेल उकळवा. तेल पूर्णपणे काळ्या रंगाचे होईल, तेव्हा गॅस बंद करा.
5. हे तेल थंड होऊ द्या. थंड झाल्यावर एका गाळणीच्या किंवा सुती कपड्याच्या मदतीने गाळून घ्या आणि एका काचेच्या स्वच्छ बाटलीत भरून ठेवा.
हे तेल रोज रात्री किंवा केस धुण्याच्या दोन तासाआधी केसांच्या मुळाशी (Scalp) लावून हलक्या हाताने ५ ते १० मिनिटे मालिश करा. दुसऱ्या दिवशी सौम्य किंवा हर्बल शॅम्पूने केस धुवा. नियमित वापराने केवळ काही दिवसांतच आपले पांढरे केस काळे आणि दाट झालेले पाहायला मिळतील.
कांद्याच्या सालीमध्ये मुबलक प्रमाणात सल्फर असते. हे तेलात मिसळल्याने केसांना नैसर्गिक काळा रंग मिळतो आणि केसांची वाढ होते. तर कढीपत्त्यामध्ये बीटा-कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे अकाली पांढरे होणाऱ्या केसांना रोखतात.
