चेहऱ्यावरील नको असलेले अनावश्यक केस काढणे ही अनेक महिलांसाठी एक मोठी डोकेदुखी असते. 'थ्रेडिंग' किंवा 'वॅक्सिंग'च्या वेदना सहन करण्याच्या भीतीने अनेकजणी याकडे दुर्लक्ष करतात, पण यामुळे चेहऱ्याचा नैसर्गिक ग्लो कमी होऊ शकतो. चेहऱ्यावर येणारे नाजूक छोटे - छोटे केस म्हणजेच फेशियल हेअर हे अनेकांसाठी सौंदर्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरतात. हे फेशियल हेअर काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही पद्धतींमुळे त्वचेला वेदना, लालसरपणा किंवा इरिटेशन होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेदनारहित आणि त्वचेसाठी सुरक्षित उपाय शोधणं गरजेचं ठरतं. विशेष म्हणजे, काही सोपे आणि नैसर्गिक घरगुती उपाय वापरून तुम्ही फेशियल हेअर कमी करू शकता आणि त्याचवेळी त्वचेचा नैसर्गिक ग्लोही वाढवू शकता(homemade peel off mask for facial hair removal).
फेशियल हेअर काढण्यासाठी (peel off face mask for smooth skin) रेझर किंवा वॅक्स वापरल्याने त्वचा खराब होण्याची भीती वाटते. अशा वेळी वेदनेशिवाय आणि त्वचेचं नुकसान न होता फेशियल हेअर काढण्यासाठी काही घरगुती उपाय अत्यंत फायदेशीर ठरतात. हे उपाय केवळ केसच काढत नाहीत, तर त्वचेला नैसर्गिक चमकही देतात. त्वचेची जळजळ न होता आणि केमिकल्सचा वापर (remove facial hair at home naturally) न करता फेशियल हेअर अगदी वेदनेशिवाय सहज काढून, चेहऱ्याचा ग्लो वाढवण्यासाठी घरीच पील ऑफ मास्क कसा तयार करायचा ते पाहूयात(face mask for glowing skin and hair removal).
फेशियल हेअर काढण्यासाठी मास्क कसा तयार करायचा?
साहित्य :-
१. टोमॅटोचा रस - १ ते २ टेबलस्पून
२. लिंबाचा रस - २ ते ३ टेबलस्पून
३. बेसन - १ टेबलस्पून
४. हळद - १ टेबलस्पून
५. कॉफी पावडर - १ टेबलस्पून
६. बटाट्याचा रस - १ ते २ टेबलस्पून
७. पील ऑफ मास्क - १ ते २ टेबलस्पून
पील ऑफ मास्क कसा तयार करायचा ?
सगळ्यांत आधी एका बाऊलमध्ये टोमॅटो, कच्च्या बटाट्याचा रस घ्यावा. मग त्यात लिंबाचा रस, बेसन, हळद, कॉफी पावडर घालावी. सगळे जिन्नस चमच्याने कालवून मग त्यात सगळ्यात शेवटी कोणताही आपल्या आवडीनुसार तयार पील ऑफ मास्क घालावा. मग पुन्हा एकदा चमच्याने सगळे मिश्रण कालवून एकजीव करून घ्यावे. घरच्याघरीच फेशियल हेअर काढण्यासाठी पील ऑफ मास्क वापरण्यासाठी तयार आहे.
ब्रेसियरमध्ये एकापुढे एक तीनच हुक का असतात? महिलांना माहीतच नसते खरे कारण...
हा पील ऑफ मास्क कसा वापरावा ?
तयार पील ऑफ मास्क चेहऱ्यावर व्यवस्थित बोटाने किंवा ब्रशच्या मदतीने पसरवून लावून घ्यावा. मग १० ते १५ मिनिटे किंवा मास्क संपूर्णपणे वाळेपर्यंत तसाच ठेवून द्यावा. मग हलकेच हाताने ओढून हा पील ऑफ मास्क काढून घ्यावा. मास्क काढण्यावर आपल्या लक्षात येईल की, या मास्कला चिकटून चेहऱ्यावरचे अगदी नाजूक - छोटे फेशियल हेअर देखील वेदनेशिवाय निघालेले असतील आणि सोबतच त्वचेवर एक नॅचरल ग्लो आलेला दिसेल.
त्वचेवरील फेशियल हेअर अगदी वेदनेशिवाय सहज काढून, चेहऱ्याचा ग्लो वाढवण्यासाठी घरीच पील ऑफ मास्क कसा तयार करायचा याचे सिक्रेट beautifulyoutips/reels या इंस्टाग्राम व्हिडिओ वरून शेअर करण्यात आला आहे.
हा पील ऑफ मास्क वापरण्याचे फायदे...
१. टोमॅटोचा रस :- टोमॅटोमुळे त्वचेवरील टॅनिंग दूर होऊन चेहऱ्याला नैसर्गिक चकाकी मिळते.
२. लिंबाचा रस :- लिंबामुळे त्वचेचा रंग उजळण्यास आणि फेशियल हेअरचा रंग फिका होण्यास मदत होते.
३. बेसन :- बेसन नॅचरल 'क्लिन्झर' म्हणून वापरले जाते. हे त्वचेला टाईट करते आणि मास्क काढताना केसांच्या मुळांना पकडून ठेवण्यास मदत करते. यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि चेहरा मऊ होतो.
४. हळद :- हळद चेहऱ्यावरील मुरुमे रोखण्यास आणि नैसर्गिक उजळपणा देण्यास मदत करते.
५. कॉफी पावडर :- कॉफी त्वचेला 'एक्सफोलिएट' करते, ज्यामुळे त्वचा अधिक स्मूथ मऊ मुलायम होते.
६. बटाट्याचा रस :- बटाट्याचा रस फेशियल हेअर काढताना त्वचेवर येणारा काळवंडलेपणा दूर करतो.
