केस गळण्याची समस्या खूप वाढली आहे. अगदी शाळकरी मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यंत सगळ्यांचेच केस गळत आहेत. काही जणींचे केस तर नेहमीच एवढे गळत असतात की याच वेगात केस गळत राहिले तर एक दिवस टक्कल पडेल की काय अशी भीती वाटू लागते. हे टाळण्यासाठी केसांना लावण्याच्या तेलामध्ये थोडा बदल करा आणि पुढे सांगितलेल्या पद्धतीने घरगुती तेल करून केसांना लावा (Homemade Hair Oil for Reducing Hair Fall). काही दिवसांतच केसांमध्ये चांगला बदल दिसून येईल.(which hair oil is best to reduce hair loss?)
केस गळणं कमी करणारं घरगुती तेल
हा उपाय करण्यासाठी गॅसवर लोखंडी कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये पाव लीटर खोबरेल तेल घाला. या तेलामध्ये एक चमचा कलोंजी, एक चमचा मेथी दाणे, एक चमचा भृंगराज पावडर आणि एक चमचा आवळा पावडर घाला.
लिव्हर खराब होत चाललंय हे सांगणारी ४ लक्षणं, सावध व्हा- फॅटी लिव्हर, कोलेस्टेरॉलचा धोका
त्यानंतर अर्धी वाटी जास्वंदाची कुस्करलेली फुलं, अर्धी वाटी झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या आणि अर्धी वाटी चिरलेला कांदा तसेच कडिपत्त्याचे ७ ते ८ पानं घाला.
आता या तेलाला चांगली उकळी येऊ द्या. त्यानंतर गॅस बंद करा आणि १० ते १२ तास तेल कढईमध्ये तसेच राहू द्या.
त्यानंतर हे तेल गाळून घ्या आणि आठवड्यातून दोनदा केसांना लावून हलक्या हाताने मसाज करा.
उन्हाळ्यात गाडीत चुकूनही ठेवू नका 'या' वस्तू; छोट्याशा चुकीमुळेही लागू शकते आग
तेल लावल्यानंतर ते रात्रभर डोक्याला राहू द्या आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे शाम्पू वापरून केस धुवून टाका. काही दिवस हा उपाय नियमितपणे केल्यास केस गळण्याचे प्रमाण कमी झालेलं दिसेल.
