Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > काख काळवंडलेली दिसते ? डार्क अंडरआर्म्सवर लावा हे घरगुती पॅक, ४ सोपे उपाय ठेवतील त्वचा सुंदर ...

काख काळवंडलेली दिसते ? डार्क अंडरआर्म्सवर लावा हे घरगुती पॅक, ४ सोपे उपाय ठेवतील त्वचा सुंदर ...

Do your armpits look dark? Apply this homemade pack on dark underarms, 4 simple remedies will keep your skin beautiful : काखेतील काळवंडलेली त्वचा सुंदर होते, फक्त करा हे उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2026 19:25 IST2026-04-23T17:54:58+5:302026-04-23T19:25:26+5:30

Do your armpits look dark? Apply this homemade pack on dark underarms, 4 simple remedies will keep your skin beautiful : काखेतील काळवंडलेली त्वचा सुंदर होते, फक्त करा हे उपाय.

Do your armpits look dark? Apply this homemade pack on dark underarms, 4 simple remedies will keep your skin beautiful... | काख काळवंडलेली दिसते ? डार्क अंडरआर्म्सवर लावा हे घरगुती पॅक, ४ सोपे उपाय ठेवतील त्वचा सुंदर ...

काख काळवंडलेली दिसते ? डार्क अंडरआर्म्सवर लावा हे घरगुती पॅक, ४ सोपे उपाय ठेवतील त्वचा सुंदर ...

काखेतील काळवंडलेला पॅच ही अनेकांना जाणवणारी पण बोलायला संकोच वाटणारी समस्या आहे. घाम, डेड स्किन, चुकीची शेव्हिंग पद्धत, घट्ट कपडे किंवा केमिकलयुक्त डिओडरंट्स यामुळे काख काळवंडू शकते. पण योग्य घरगुती उपाय आणि पॅक वापरल्यास ही समस्या हळूहळू कमी करता येते. त्यासाठी फार महागातल्या ट्रिटमेंट्स मुली करुन घेतात. (Do your armpits look dark? Apply this homemade pack on dark underarms, 4 simple remedies will keep your skin beautiful...)त्यामुळे तात्पुरता रंग बदलतो मात्र आधीपेक्षा जास्त काळा रंग काही दिवसांत दिसू लागतो. फक्त रंब बदलणे ही समस्या नाही तर त्यातून वासही फार भयंकर आणि घाण येतो. ज्यामुळे हात वर करण्याचीही लाज वाटते. 

सर्वात सोपा आणि परिणामकारक पॅक म्हणजे बटाटा आणि लिंबाचा. बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात, तर लिंबू त्वचा उजळवण्यास मदत करते. बटाट्याचा रस काढून त्यात काही थेंब लिंबाचा रस मिसळा आणि काखेवर लावा. १० ते १५ मिनिटांनी स्वच्छ धुवा. हा पॅक आठवड्यातून 3 वेळा वापरल्यास फरक दिसू लागतो. फक्त बटाटा फिरवला तरी फायदा होतो. बटाटा काळेपणा कमी करण्यासाठी फायदेशीर मानला जातो.

दुसरा उत्तम पर्याय म्हणजे बेसन आणि दही पॅक. बेसन त्वचेवरील मृत पेशी काढून टाकतो आणि दही त्वचेला मऊ व उजळ बनवते. दोन चमचे बेसन, एक चमचा दही आणि चिमूटभर हळद घालून पेस्ट तयार करा. हा पॅक काखेवर लावून सुकू द्या आणि नंतर हलक्या हाताने स्क्रब करुन काढा. यामुळे त्वचा स्वच्छ आणि उजळ दिसते. मात्र एकदा करुन फायदा नाही किमान ३ महिने तरी हा उपाय करायला हवा. 

अलोव्हेरा (कोरफड) देखील खूप फायदेशीर आहे. कोरफडीचे जेल थेट काखेवर लावल्यास त्वचा शांत होते, काळेपणा कमी होतो आणि ओलावा टिकून राहतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी लावल्यास चांगला परिणाम दिसतो. तसेच उन्हाळ्यात लावला तर थंडावाही मिळतो. बेकिंग सोडा आणि पाण्याचा स्क्रबही वापरता येतो. यामुळे डेड स्किन निघून जाते आणि त्वचा उजळते. पण हा उपाय आठवड्यातून एकदाच करा, कारण जास्त वापरल्यास त्वचा कोरडी पडू शकते. तसेच तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
 
या पॅक्ससोबत काही सवयी बदलणेही तितकेच महत्त्वाचे आहे. खूप घट्ट कपडे टाळा, कॉटनचे सैल कपडे वापरा. शेव्हिंग करताना योग्य क्रीम वापरा आणि शक्यतो वारंवार रेजर वापरणे टाळा. तसेच, अल्कोहोलयुक्त डिओडरंट्स कमी वापरणे फायद्याचे ठरते. थोडक्यात, काखेतील काळवंडलेला पॅच कमी करण्यासाठी घरगुती पॅक नियमितपणे वापरणे आणि त्वचेची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. सातत्य ठेवले तर हळूहळू त्वचेचा रंग सुधारतो आणि आत्मविश्वासही वाढतो.

Web Title : कांख काली दिखती है? सुंदर त्वचा के लिए ये घरेलू उपाय आजमाएं।

Web Summary : काली कांख को आलू-नींबू या बेसन-दही जैसे घरेलू उपचारों से ठीक किया जा सकता है। एलोवेरा और हल्के एक्सफोलिएशन से भी मदद मिलती है। सर्वोत्तम परिणामों के लिए तंग कपड़े और कठोर डिओडोरेंट से बचें।

Web Title : Dark underarms? Use these simple home remedies for beautiful skin.

Web Summary : Dark underarms can be treated with home remedies like potato-lemon or besan-curd packs. Aloe vera and gentle exfoliation also help. Avoid tight clothes and harsh deodorants for best results.