Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > फरशीवर-घरभर केस पडलेले दिसतात? स्वयंपाकघरातले ३ पदार्थ लावा, दाट-लांब केस होतील

फरशीवर-घरभर केस पडलेले दिसतात? स्वयंपाकघरातले ३ पदार्थ लावा, दाट-लांब केस होतील

Curry Leaves Hibiscus And Neem For Hair Growth : कडुलिंब, जास्वंद, कढीपत्ता हे तीन असे पदार्थ आहेत जे कोणत्याही जादूई उपायापेक्षा कमी नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 15:55 IST2026-05-06T09:39:00+5:302026-05-06T15:55:55+5:30

Curry Leaves Hibiscus And Neem For Hair Growth : कडुलिंब, जास्वंद, कढीपत्ता हे तीन असे पदार्थ आहेत जे कोणत्याही जादूई उपायापेक्षा कमी नाहीत.

Curry Leaves Hibiscus And Neem For Hair Growth : Make Curry Leaves Hibiscus And Neem Hair Spray | फरशीवर-घरभर केस पडलेले दिसतात? स्वयंपाकघरातले ३ पदार्थ लावा, दाट-लांब केस होतील

फरशीवर-घरभर केस पडलेले दिसतात? स्वयंपाकघरातले ३ पदार्थ लावा, दाट-लांब केस होतील

आजकाल केस गळण्याची समस्या अनेकांमध्ये दिसून येते. गळणारे केस आणि कोंडा सर्वांसाठीच त्रासदायक विषय ठरतो. बऱ्याचजणांचे केस पांढरे होतात तर काहीजणांच्या केसांची वाढच नीट होत नाही. केसांवर महागडी उत्पादनं, महागडे स्प्रे वापरूनही चांगला परिणाम दिसून येत नाही. काही घरगुती पदार्थ केसांसाठी वरदान ठरू शकतात.  कडुलिंब, जास्वंद, कढीपत्ता हे तीन असे पदार्थ आहेत जे कोणत्याही जादूई उपायापेक्षा कमी नाहीत.  या ३ पदार्थांचा वापर  केसांवर कसा करायचा समजून घेऊ. हा उपाय केल्यानं तुमचे केस दाट होतील आणि केसांची लांबीसुद्धा वाढेल. (Make Curry Leaves Hibiscus And Neem Hair Spray For Long Hairs)

 या ३ घरगुती पदार्थांमध्ये खास काय आहे?

कडुलिंबात एंटी बॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे केसांमध्ये कोंडा होणं, खाज येणं अशा समस्या उद्भवत नाहीत. जास्वंदाच्या  फुलात आणि पानांमध्ये व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे केसाचं गळणं कमी होतं आणि केस चमकदार होतात. कढी पत्त्यात बीटा केरोटीन आणि प्रोटीन असते. ज्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात.  त्यामुळे वेळेआधी केस पांढरे होणं टाळता येतं.

केसांचा हेअर स्प्रे तयार करण्यासाठी काय साहित्य लागतं?

कडुलिंबांची पानं
कढीपत्ता
जास्वंदाची फुलं
पाणी
स्प्रे बॉटल

केसांच्या वाढीसाठी होममेड हेअर स्प्रे कसा तयार करायचा?

सगळ्यात आधी कडुलिंब, जास्वंद आणि कढीपत्ता पाण्यानं व्यवस्थित धुवून घ्या. जेणकरून त्यावरील धूळ निघून जाईल. नंतर एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. जेव्हा पाणी उकळेल तेव्हा त्यात हे तीन पदार्थ घाला. पाणी उकळून अर्ध होत नाही आणि रंग गडद होत नाही तोपर्यंत उकळवा.

नंतर गॅस बंद करून पूर्णपणे थंड होऊ द्या. त्यानंतर गाळून हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. तयार आहे तुमचा होममेड हेअर ग्रोथ स्प्रे. या स्प्रे  चा वापर करणं खूपच सोपं आहे.  रात्री झोपण्याआधी किंवा केस धुण्याच्या २ तास आधी केसांच्या मुळांना हा स्प्रे लावा. हलक्या हातानं ५ मिनिटं मसाज करा. नंतर साध्या पाण्यानं स्वच्छ केस धुवा.

Web Title : बालों के झड़ने के लिए प्रभावी घरेलू उपचार: नीम, गुड़हल, करी पत्ता

Web Summary : नीम, गुड़हल और करी पत्ता बालों का झड़ना, रूसी और समय से पहले सफ़ेद होने से रोकते हैं। इन सामग्रियों को पानी में उबालकर, ठंडा करके, छानकर और धोने से पहले खोपड़ी पर लगाकर घर पर हेयर स्प्रे बनाएं, जिससे बाल मजबूत और लंबे होते हैं।

Web Title : Effective home remedies for hair fall: Neem, hibiscus, curry leaves.

Web Summary : Neem, hibiscus, and curry leaves combat hair fall, dandruff, and premature graying. Create a homemade hair spray by boiling these ingredients in water, cooling, straining, and applying to the scalp before washing hair for stronger, longer hair.