lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > चेहऱ्यावरच्या नको असलेल्या केसांनी लूक बिघडवलाय? मग 'या' घरगुती उपायांनी मिळेल आकर्षक त्वचा

चेहऱ्यावरच्या नको असलेल्या केसांनी लूक बिघडवलाय? मग 'या' घरगुती उपायांनी मिळेल आकर्षक त्वचा

Beauty Tips How to remove facial hairs : चेहऱ्यावर नको असलेले केस हे महिलांच्या ओठांच्या वर, माथ्यावर, दाढीवर असतात. तर परुषांच्या गालांवर आणि भुवयांच्या मधे असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 11:32 AM2021-06-12T11:32:00+5:302021-06-12T11:45:15+5:30

Beauty Tips How to remove facial hairs : चेहऱ्यावर नको असलेले केस हे महिलांच्या ओठांच्या वर, माथ्यावर, दाढीवर असतात. तर परुषांच्या गालांवर आणि भुवयांच्या मधे असतात.

Beauty Tips How to remove facial hairs : Home hacks to get rid of unwanted facial hair | चेहऱ्यावरच्या नको असलेल्या केसांनी लूक बिघडवलाय? मग 'या' घरगुती उपायांनी मिळेल आकर्षक त्वचा

चेहऱ्यावरच्या नको असलेल्या केसांनी लूक बिघडवलाय? मग 'या' घरगुती उपायांनी मिळेल आकर्षक त्वचा

Highlights सतत थ्रेंडिंग आणि वॅक्सिंग करणंही कामाच्या गडबडीमुळे शक्य होत नाही. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे पार्लर अनेक महिने बंद होते.  त्यामुळे घरोघरच्या महिलांची चांगलीच गैरसोय झाली.

तोंडावरचे नको असलेले केस हार्मोनल असंतुलनमुळे किंवा अनुवांशिक कारणांमुळे येण्याची शक्यता असते. या केसांमुळे चारचौघात जायचं म्हटलं की टेंशन येतं. संपूर्ण लूक बिघडतो.  यावर उपाय म्हणून सतत थ्रेंडिंग आणि वॅक्सिंग करणंही कामाच्या गडबडीमुळे शक्य होत नाही. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे पार्लर अनेक महिने बंद होते.  त्यामुळे घरोघरच्या महिलांची चांगलीच गैरसोय झाली. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला नको असलेले केस काढून टाकण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायांचा वापर करून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता. 

डाळ, बटाटा आणि मध

या उपायासाठी आपल्याला अर्धा कप मसूरची डाळ, एक बटाटा, लिंबाचा रस काही थेंब मध एक आवश्यक असेल. डाळ रात्रभर भिजवून सकाळी बारीक करून जाडसर पेस्ट बनवा. बटाटा सोला आणि त्याचा रस काढा. मसूरची पेस्ट आणि बटाट्याचा रस मिसळा. आता मिश्रणात लिंबाचा रस आणि मध घाला. आता ते बाधित भागावर लावा आणि अर्धा तास सोडून. जेव्हा हा मास्क हळूहळू  सुकायला लागेल तेव्हा तुम्ही बोटांच्या साहाय्यानं मास्क काढून टाकू शकता.

काबुली चण्याचे पीठ

एका भांड्यात कप चणाचं पीठ, २ चमचा हळद, 1/2 टीस्पून फ्रेश मलई आणि कप मिल्क घालून पेस्ट तयार करा. आता तोंडाच्या ज्या भागात नको असलेले केस दिसतात त्या भागावर लावा. 20-30 मिनिटांसाठी पॅक लावून सोडून द्या. पॅक हळूवारपणे केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने चोळा. कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून किमान दोनदा हा पॅक वापरा. या प्रयोगानं तुम्हाला नको असलेल्या  केसांपासून सुटका मिळू शकते. 

तांदळाचे पीठ आणि हळद

3 टेस्पून तांदळाचे पीठ, 1 टेस्पून हळद आणि 2 चमचे दूध मिसळा. जर मिश्रण जास्त जाड असेल तर थोडेसे पाणी किंवा गुलाबाचे पाणी घाला. तयार पेस्ट तोंडावरच्या केसांवर 30 मिनिटांसाठी लावा. कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने धुवा. हा उपाय केल्यास जास्त वेदना जाणवणार नाहीत आणि कमीतकमी वेळात केस निघण्यास मदत होईल. 

जवस आणि दुधाचा स्क्रब

एका भांड्यात २ टेस्पून पपईची पेस्ट, १/२ टीस्पून हळद आणि २ चमचे एलोवेरा जेल मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट  केसांच्या भागावर लावा. 20 मिनिटांनंतर पॅक केसांच्या वाढीच्या विरुद्ध दिशेने चोळा. त्यानंतर  चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवून टाका.

लेवेंडर आणि ट्रि ट्रि ऑईल

 तेलाचा वापर चेहरा आणि केसांसाठी अनेक फायदे मिळवून देतो. 2 चमचे लव्हेंडर तेल आणि चहाच्या झाडाचे तेल 8 थेंब मिसळा. कापसाच्या बॉलच्या सहाय्याने दिवसातून दोनदा तोंडावर मिश्रण लावा. आपण काही महिन्यांत फरक पाहू शकाल.

ब्लीचिंग

ब्लीचिंगनेही चेहऱ्यावरील नको असलेले केस नाहीसे होतात. हा उपाय महिला आणि पुरुष दोघेही वापरु शकतात. पण ब्लीचिंग करण्याआधी ते तुमच्या त्वचेला सूट होतं की नाही हे तपासून बघा. तसे न केल्यास त्वचेला इजा होण्याची शक्यता असते. 

थ्रेडिंग

चेहऱ्यावर नको असलेले केस हे महिलांच्या ओठांच्या वर, माथ्यावर, दाढीवर असतात. तर परुषांच्या गालांवर आणि भुवयांच्या मधे असतात. त्यासोबत चेहऱ्यावर आणखीही काही ठिकाणांवर हे केस येतात. थ्रेडिंगच्या माध्यमातून  नको असलेले केस दूर केले जाऊ शकतात. गाल आणि भुवयांच्या मधे असलेले केस महिला प्लकिंग करुन काढू शकतात. 

Web Title: Beauty Tips How to remove facial hairs : Home hacks to get rid of unwanted facial hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.