स्वयंपाकघरातले नॅपकिन चिकट, कडक होतात- कळकट नॅपकिन स्वच्छ करण्याचा १ सोपा उपाय

Published:April 22, 2024 09:18 AM2024-04-22T09:18:21+5:302024-04-22T19:05:45+5:30

स्वयंपाकघरातले नॅपकिन चिकट, कडक होतात- कळकट नॅपकिन स्वच्छ करण्याचा १ सोपा उपाय

स्वयंपाक घरातले हात पुसण्याचे नॅपकिन वारंवार खरकटे हात लागल्याने चिकट, तेलकट होतात. त्यांचा रंगही अगदीच कळकट दिसू लागतो.

स्वयंपाकघरातले नॅपकिन चिकट, कडक होतात- कळकट नॅपकिन स्वच्छ करण्याचा १ सोपा उपाय

हे नॅपकिन आपण धुवायला टाकतो, पण हळूहळू त्यांच्यातला तेलकटपणा, खरकटेपणा स्वच्छ झाला नाही तर ते नॅपकिन कडक होऊ लागतात. शिवाय त्यांच्यातला कळकटपणा निघतही नाही.

स्वयंपाकघरातले नॅपकिन चिकट, कडक होतात- कळकट नॅपकिन स्वच्छ करण्याचा १ सोपा उपाय

तुमच्या घरातले असे खराब झालेले नॅपकिन पुन्हा नव्यासारखे चकाचक करण्यासाठी हा एक घरगुती उपाय करून पाहा. हा उपाय housewife_to_homemaker या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

स्वयंपाकघरातले नॅपकिन चिकट, कडक होतात- कळकट नॅपकिन स्वच्छ करण्याचा १ सोपा उपाय

हा उपाय करण्यासाठी आपल्याला व्हिनेगर लागणार आहे.

स्वयंपाकघरातले नॅपकिन चिकट, कडक होतात- कळकट नॅपकिन स्वच्छ करण्याचा १ सोपा उपाय

सगळ्यात आधी एका पातेल्यात कडक पाणी करून घ्या. त्या पातेल्यात २ ते ३ टेबलस्पून व्हिनेगर आणि १ टेबलस्पून लिक्विड डिटर्जंट टाका आणि त्यामध्ये जवळपास अर्ध्या तासासाठी नॅपकिन भिजत ठेवा.

स्वयंपाकघरातले नॅपकिन चिकट, कडक होतात- कळकट नॅपकिन स्वच्छ करण्याचा १ सोपा उपाय

यानंतर ते नॅपकिन कपडे घासण्याच्या ब्रशने घासून स्वच्छ करा.

स्वयंपाकघरातले नॅपकिन चिकट, कडक होतात- कळकट नॅपकिन स्वच्छ करण्याचा १ सोपा उपाय

पुन्हा एकदा स्वच्छ पाण्यातून धुवून घ्या आणि घट्ट पिळून वाळायला टाका. नॅपकिनवरचे सगळे कळकट डाग निघून जातील.