राजन साळवीही गुवाहाटीच्या गाडीत बसणार होते, खासदार धैर्यशील माने यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 16:15 IST2024-11-08T16:14:35+5:302024-11-08T16:15:25+5:30

राजापूर : अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील राजकारण बदलले, तेव्हा राजापूरचे उद्धवसेनेचे आमदार राजन साळवी हेही गुवाहाटीच्या गाडीत बसणार होते. या ...

Rajan Salvi was also going to sit in the train to Guwahati, MP Darhysheel Mane's secret blast | राजन साळवीही गुवाहाटीच्या गाडीत बसणार होते, खासदार धैर्यशील माने यांचा गौप्यस्फोट

राजन साळवीही गुवाहाटीच्या गाडीत बसणार होते, खासदार धैर्यशील माने यांचा गौप्यस्फोट

राजापूर : अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील राजकारण बदलले, तेव्हा राजापूरचे उद्धवसेनेचे आमदार राजन साळवी हेही गुवाहाटीच्या गाडीत बसणार होते. या गाडीतील त्यांचे तिकीट अंतिम झाले होते. मात्र आयत्या वेळी त्यांनी निर्णय बदलला, असा गौप्यस्फोट शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी केला.

राजापूर तालुक्यातील ओणी येथे झालेल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री रवींद्र चव्हाण, उमेदवार किरण सामंत यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

रिफायनरी प्रकल्प लोकांना नको असेल तर तो न लादता पर्यावरणपूरक उद्योग आणण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. यावेळी उदय सामंत, रवींद्र चव्हाण, किरण सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी भाषणे केली.

Web Title: Rajan Salvi was also going to sit in the train to Guwahati, MP Darhysheel Mane's secret blast