Ratnagiri: दापाेलीत सिलिंडरचा स्फोट, पती-पत्नी जखमी; मुले शाळेत गेल्याने वाचली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:12 IST2025-01-04T12:09:47+5:302025-01-04T12:12:08+5:30

दापाेली : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फाेट हाेऊन पती-पत्नी भाजून जखमी झाल्याची घटना दापाेली शहरातील रूपनगर काॅम्प्लेक्स येथे शुक्रवारी दुपारी ...

Husband and wife injured in cylinder explosion in Dapoli | Ratnagiri: दापाेलीत सिलिंडरचा स्फोट, पती-पत्नी जखमी; मुले शाळेत गेल्याने वाचली 

Ratnagiri: दापाेलीत सिलिंडरचा स्फोट, पती-पत्नी जखमी; मुले शाळेत गेल्याने वाचली 

दापाेली : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फाेट हाेऊन पती-पत्नी भाजून जखमी झाल्याची घटना दापाेली शहरातील रूपनगर काॅम्प्लेक्स येथे शुक्रवारी दुपारी घडली. त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आले आहे. सुदैवाने त्यांची दाेन मुले शाळेत गेल्याने ती या दुर्घटनेतून वाचली.

अविनाश शिर्के (४०) आणि अश्विनी शिर्के (३५) असे जखमी दाम्पत्याची नावे आहेत. शहरातील रूपनगर काॅम्प्लेक्समध्ये शिर्के कुटुंब राहत आहे. शुक्रवारी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमाराला घरातील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरने पेट घेतला आणि स्फाेट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की, काही कळायच्या आत घरातील साहित्याची नासधूस झाली.

या स्फाेटामुळे शिर्के यांच्या खाेलीचा मुख्य दरवाजा व त्याच्या बाजूची भिंत शेजारील माने यांच्या दरवाजावर पडली. शेजारी राहणाऱ्या जाधव यांच्या घरालाही या स्फाेटाचे हादरे बसले. तसेच घराच्या खिडकीवरील ग्रील निखळून खाली पडले. त्यामुळे सदनिकेच्या खाली उभ्या असणाऱ्या चारचाकीचे किरकाेळ नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा सायंकाळी उशिरापर्यंत सुरू हाेता.

या घटनेत जखमी झालेल्या अविनाश शिर्के व अश्विनी शिर्के यांना प्रथम दापाेली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. तिथून पुढील उपचारासाठी मुंबईत नेण्यात आले आहे.

नागरिकांची धावाधाव

सिलिंडरच्या स्फोटामुळे घरातील सामानाने पेट घेतला हाेता. या आगीची माहिती मिळताच इमारतीतील रहिवाशांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी आग आटाेक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. ही आग वेळीच आटाेक्यात आल्याने बाका प्रसंग टळला. अन्यथा १०० कुटुंबांना धाेका पाेहाेचला असता.

Web Title: Husband and wife injured in cylinder explosion in Dapoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.