अनिल परबांचे दापोलीतील रिसॉर्ट ऑक्टोबरमध्ये जमीनदोस्त होणार, किरीट सोमय्यांचा दावा

By रहिम दलाल | Updated: September 7, 2022 19:09 IST2022-09-07T18:57:16+5:302022-09-07T19:09:30+5:30

परब यांच्या विरोधात फौजदारी कारवाई होणार

Anil Parab resort in Dapoli will be demolished in October, claims Kirit Somaiya | अनिल परबांचे दापोलीतील रिसॉर्ट ऑक्टोबरमध्ये जमीनदोस्त होणार, किरीट सोमय्यांचा दावा

अनिल परबांचे दापोलीतील रिसॉर्ट ऑक्टोबरमध्ये जमीनदोस्त होणार, किरीट सोमय्यांचा दावा

रहिम दलाल

रत्नागिरी : उद्धव ठाकरे सरकार जुलै महिन्यात जमिनदोस्त झाले आता ऑक्टोबर महिन्यात अनिल परबांचे रिसॉर्ट जमिनदोस्त होईल, असा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. सोमय्या हे रत्नागिरी दौऱ्यावर आले असताना त्यांनी जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.

ते पुढे म्हणाले, एका बाजूला परब यांचे रिसॉर्ट पाडण्याचे काम सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला परब यांनी फसवणुक केली. खोटे दस्तावेज तयार केले. यासंदर्भात परब यांच्या विरोधात फौजदारी कारवाई व्हावी, यासाठी राज्य सरकारने खेड येथील दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या याचिकेची सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे. त्यानंतर परब यांचे विरोधात फौजदारी खटला दाखल होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. खेड दिवाणी न्यायालयात याचिका सहा महिन्यापूर्वीच दाखल करण्यात आली.

Web Title: Anil Parab resort in Dapoli will be demolished in October, claims Kirit Somaiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.