उपनगराध्यक्षपदी विनीता कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:45 IST2019-09-02T00:45:24+5:302019-09-02T00:45:50+5:30
अडीच वर्षांपूर्वी झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत घोडेबाजार झाला होता, त्यामुळे राष्ट्रवादी, शेकाप, बीआरएसपी आघाडीचा

उपनगराध्यक्षपदी विनीता कांबळे
खोपोली : खोपोलीचे उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांनी पाच वर्षांची मुदत संपण्यापूर्वी अडीच वर्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या ठिकाणी नुकत्याच झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विनीता कांबळे यांंचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्या बिनविरोध निवडून आल्या. नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
अडीच वर्षांपूर्वी झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत घोडेबाजार झाला होता, त्यामुळे राष्ट्रवादी, शेकाप, बीआरएसपी आघाडीचा उपनगराध्यक्ष निवडून येणे अपेक्षित असताना शिवसेना, भाजप व काँग्रेस आघाडीचे राजू गायकवाड निवडून आले होते. या वेळीही शेकापचा उपनगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीवर प्रचंड दबाव असतानाही राष्ट्रवादी आघाडीचे गटनेते मंगेश दळवी यांनी ठाम व कणखर भूमिका घेतल्यामुळे घोडेबाजार टळला व विनीता कांबळे या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्या.
खोपोली नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष या दोन्ही पदांवर महिला विराजमान आहेत.