उरणमधील सेवानिवृत्त पोलिस अधिकारी अनंत चाळके यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 16:23 IST2023-11-11T16:22:40+5:302023-11-11T16:23:42+5:30

सेवानिवृत्त पोलिस अधिकारी अनंत तुकाराम चाळकेउरण येथील राहत्या घरी निधन झाले आहे.

Retired police officer Anant Chalke passed away in Uran | उरणमधील सेवानिवृत्त पोलिस अधिकारी अनंत चाळके यांचे निधन

उरणमधील सेवानिवृत्त पोलिस अधिकारी अनंत चाळके यांचे निधन

उरण : विविध पोलिस ठाण्यात गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी अनंत तुकाराम चाळके (७९) यांचे शुक्रवारी (१०) नागाव -उरण येथील राहत्या घरी निधन झाले आहे.

पोलिस दलात अत्यंत प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. पोलिस दलात कार्यरत असलेल्या अनंत चाळके यांनी उमेदीच्या काळात अनेक कुख्यात गुन्हेगारांना त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, कर्नाटक आदी राज्यांत जाऊन जेरबंद करण्याची  कामगिरी बजावली होती. दुदैवाने त्यांची पत्नी सुनीता चाळके यांचे नुकतेच २८ सप्टेंबर  रोजी निधन झाले आहे.

पत्नीच्या निधनानंतर दिड महिन्यातच अनंत चाळके यांचे निधन झाले आहे. त्यांच्यांवर बोरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याच्या पश्चात  मुलगा, तीन मुली, जावई असा परिवार आहे.त्याच्या जाण्याने संपूर्ण उरण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Retired police officer Anant Chalke passed away in Uran