Raigad: मावळ लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार राजाराम पाटील निवडणूकीसाठी पुन्हा एकदा सज्ज 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 10:17 PM2024-03-22T22:17:05+5:302024-03-22T22:17:31+5:30

Maval Lok Sabha constituency: शेतकरी, कामगार, मच्छीमार, मराठा आणि बहुजन समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्या संसदेच्या सभागृहात मांडण्यासाठी अपक्ष म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघात २०१९ नंतर १३ मे  २०२४ रोजी होणाऱ्या दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढविण्याची पक्की तयारी बहुजन समाजाचे नेते राजाराम पाटील सुरू केली आहे.

Raigad: Independent candidate Rajaram Patil is once again ready for election in Maval Lok Sabha constituency | Raigad: मावळ लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार राजाराम पाटील निवडणूकीसाठी पुन्हा एकदा सज्ज 

Raigad: मावळ लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार राजाराम पाटील निवडणूकीसाठी पुन्हा एकदा सज्ज 

- मधुकर ठाकूर
उरण - शेतकरी, कामगार, मच्छीमार, मराठा आणि बहुजन समाजाला भेडसावणाऱ्या विविध समस्या संसदेच्या सभागृहात मांडण्यासाठी अपक्ष म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघात २०१९ नंतर १३ मे  २०२४ रोजी होणाऱ्या दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढविण्याची पक्की तयारी बहुजन समाजाचे नेते राजाराम पाटील सुरू केली आहे. बहुजन समाजाचे नेते राजाराम पाटील यांनी २०१९ मध्ये  झालेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातुन वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढविली होती.

मावळ लोकसभेच्या या निवडणुकीत त्यांना ७५९०४ मते मिळाली होती.१३ मे २०२४ रोजी होणाऱ्या मावळ लोकसभा निवडणूकीतही पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा इरादा राजाराम पाटील यांनी पक्का केला आहे.महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सोबत चर्चेचे गुऱ्हाळ अद्यापही सुरूच आहे.लढविण्याचा निर्णय अद्यापही घेण्यात आलेला नाही.निर्णय झाला तरी आपल्याला उमेदवारी मिळण्याची सुतरामही शक्यता नाही.मात्र यावेळी निवडणुक लढविण्यासाठी आपल्याला पुण्यातील लोकशाही पार्टी, कोकणातील बळीराज सेना या दोन पार्टीकडून आवताण आले आहे .

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील शेतकरी, मच्छीमारांचे अनेक प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.सिडको, नैना, अलिबाग -विरार कॉरिडॉर,नाणार आदी विविध प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने शासनाकडून जबरदस्तीने संपादन करण्यात येत आहेत.कोस्टल झोनमध्ये उभारण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांत मच्छीमार समाज देशोधडीला लागला आहे.त्यांच्या पुनर्वसनाही प्रश्न प्रलंबित आहेत.प्रकल्पग्रस्त गावे आणि शेतकऱ्यांना गावठाण विस्ताराचा प्रश्नही लोंबकळत ठेवण्यात आला आहे.या सर्व सामाजिक मुद्यांवर  मराठा, बहुजन, ओबीसी समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी पुन्हा एकदा मावळ लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याची माहिती राजाराम पाटील यांनी दिली.

Web Title: Raigad: Independent candidate Rajaram Patil is once again ready for election in Maval Lok Sabha constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.