'बिनविरोध' जिंकलेले भाजपाचे नितीन पाटील पनवेलचे नवे महापौर; 'ही' महिला नगरसेवक उपमहापौरदी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 13:28 IST2026-02-06T13:27:19+5:302026-02-06T13:28:38+5:30

Panvel Municipal Election 2026 Mayor Election: महापौरपदाच्या सोडतीत पनवेल पालिकेच्या वाट्याला ओबीसी सर्वसाधारण गटाचे आरक्षण आले होते

panvel municipal election 2026 mayor election updates bjp nitin patil who won unopposed is new mayor pramila patil new deputy mayor | 'बिनविरोध' जिंकलेले भाजपाचे नितीन पाटील पनवेलचे नवे महापौर; 'ही' महिला नगरसेवक उपमहापौरदी!

'बिनविरोध' जिंकलेले भाजपाचे नितीन पाटील पनवेलचे नवे महापौर; 'ही' महिला नगरसेवक उपमहापौरदी!

Panvel Municipal Election 2026 Mayor Election: गेल्या अनेक दिवसांपासून पनवेलच्या जनतेला पडलेल्या प्रश्नाचे अखेर उत्तम मिळाले. पनवेलच्यामहापौरपदासाठी आज भाजपचे सर्वात पहिले बिनविरोध जिंकलेले नगरसेवक नितीन पाटील (Nitin Patil) यांची महापौरपदी वर्णी लागली आहे. तर प्रमिला रवींद्र पाटील (Pramila Patil) यांच्या गळ्यात उपमहापौरपदाची माळ पडली.

नितीन पाटील यांची निवड का?

महापौरपदाची सोडत निघाली तेव्हा पनवेल पालिकेत ओबीसी सर्वसाधारण गटाचे आरक्षण निघाले. पनवेल महापालिकेच्या ७८ जागांसाठी निवडणूक १५ जानेवारीला झाली. पण त्याआधीच भाजपाचे सहा नगरसेवक बिनविरोध जिंकले होते. त्यातही सर्वप्रथम भाजपचे एक नगरसेवक विजयी झाल्याची बातमी होती. ते उमेदवार नितीन पाटील होते. महापौरपदाची सोडत निघाली तेव्हा पनवेल पालिकेत ओबीसी सर्वसाधारण गटाचे आरक्षण निघाले. त्यामुळे त्यांना आज महापौरपदाचा मान मिळाला.

प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने 'बिनविरोध'

भाजपाला पनवेलमध्ये निकालाआधीच गुलाल उधळण्याची संधी मिळाली होती. भाजपाचे उमेदवार नितीन पाटील बिनविरोध विजयी झाले होते. ३१ डिसेंबरला अर्ज छाननीमध्ये त्यांच्या प्रभागातून दाखल करण्यात आलेला प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज बाद झाला होता. शेकाप-महाविकास आघाडीचे उमेदवार रोहन गावंड यांचा तो अर्ज होता. त्यांचा अर्ज छाननीत बाद झाल्यामुळे तेथील निकाल स्पष्ट झाला आणि त्या प्रभागातून भाजपाचे नितीन पाटील विजयी झाले. याआधीच्या कार्यकाळात नितीन पाटील हे स्वीकृत नगरसेवक होते.

पनवेल पालिकेत पक्षीय बलाबल

पनवेल पालिकेच्या ७८ जागांपैकी भाजपाने ५५ जागांवर विजय मिळवला. शिंदेसेनेने २ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने २ जागा जिंकल्या. दुसरीकडे उद्धवसेनेने ५ तर काँग्रेसने ४ जागांवर विजय मिळवला. तर १० इतर नगरसेवकही विजयी झाले.

Web Title : भाजपा के नितिन पाटिल निर्विरोध पनवेल के महापौर निर्वाचित; उपमहापौर नामित

Web Summary : ओबीसी आरक्षण और प्रतिद्वंद्वी के फॉर्म अस्वीकृति के कारण नितिन पाटिल निर्विरोध पनवेल के महापौर बने। प्रमिला पाटिल उपमहापौर हैं। भाजपा ने 78 में से 55 सीटें जीतीं।

Web Title : BJP's Nitin Patil Unanimously Elected Panvel Mayor; Deputy Mayor Named

Web Summary : Nitin Patil became Panvel's mayor unopposed, thanks to OBC reservation and opponent's form rejection. Pramila Patil is the deputy mayor. BJP won 55 of 78 seats.