भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:42 IST2026-01-02T12:41:05+5:302026-01-02T12:42:08+5:30
Panvel Municipal Corporation Election 2026: पनवेलच्या प्रभाग 19 अ जागेसाठी दर्शना भोईर आणि शेकाप आघाडीकडून दिव्या चांगदेव बहिरा यांनी अर्ज दाखल केले होते.

भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध
लोकमत न्युज नेटवर्क
पनवेल :पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजपने नितीन पाटील यांच्या रूपाने पहिला विजय प्राप्त केला असताना आणखी दोन उमेदवार बिनविरोध झाले आहेत.
पनवेलच्या प्रभाग 19 अ जागेसाठी दर्शना भोईर आणि शेकाप आघाडीकडून दिव्या चांगदेव बहिरा यांनी अर्ज दाखल केले होते. दोघांचे अर्ज देखील वैध ठरले होते. पण काल झालेल्या घडामोडीत शेकाप आघाडीच्या दिव्या बहिरा यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपच्या दर्शना भोईर या बिनविरोध झाल्या. तर प्रभाग 20 मधून भाजपकडून अजय तुकाराम बहिरा आणि शेकाप आघाडीकडून चांगदेव बहिरा व दिव्या बहिरा यांनी अर्ज दाखल केले होते.यामध्ये चांगदेव बहिरा आणि दिव्या बहिरा यांनी काल अर्ज मागे घेतले.त्यामुळे अजय बहिरा यांचा एकमेव अर्ज राहिला आणि त्यांची जागा बिनविरोध झाली.
भाजपच्या तीन जागा निवडणूक होण्यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. दरम्यान आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी काही उमेदवार मागे घेण्याची शक्यता असल्याने मोठी घडामोड घडू शकते.