Raigad: आमदार महेंद्र दळवींनी कुटुंबीयासमवेत बजावला मतदानाचा हक्क

By निखिल म्हात्रे | Published: May 7, 2024 01:31 PM2024-05-07T13:31:45+5:302024-05-07T13:32:18+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: रायगडच्या विकासासाठी आम्ही काम करीत आहोत. तळागाळीत माझ्या मतदारांनी याची कल्पना आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आमच्या प्रयत्नांना यश मिळून महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे विजयी होणार हे निश्चित असल्याचा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी दिला आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024: MLA Mahendra Dalvi exercised his right to vote with his family | Raigad: आमदार महेंद्र दळवींनी कुटुंबीयासमवेत बजावला मतदानाचा हक्क

Raigad: आमदार महेंद्र दळवींनी कुटुंबीयासमवेत बजावला मतदानाचा हक्क

- निखिल म्हात्रे
 अलिबाग - रायगडच्या विकासासाठी आम्ही काम करीत आहोत. तळागाळीत माझ्या मतदारांनी याची कल्पना आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आमच्या प्रयत्नांना यश मिळून महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे विजयी होणार हे निश्चित असल्याचा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी दिला आहे. याबरोबरच गावागावतून मतदार मतदानासाठी घरातून बाहेर पडताना दिसत असल्याने यावर्शी मतदानाचा टक्का वाढणार असल्याचे आमदार दळवी यांनी स्पष्ट केले आहे. 

रायगड लोकसभा मतदार संघात आज ७ मे रोजी सकाळी सात वाजता मतदानाला शांततेत सुरुवात झाली आहे. अलिबाग मुरुड विधान सभेचे आमदार महेंद्र दळवी यांनी आपल्या कुटूंबासह अलिबाग तालुक्यातील वायशेत येथील आपल्या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी जिल्हा परीषदेच्या माजी सदस्या मानसी दळवी, थळ ग्रामपंच्यातीचे उपसरपंच अभिराज दळवी, अदिती नाईक दळवी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे शंभर टक्के विजयी होणार असल्याचा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी बोलून दाखवला आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून जनतेला मतदानाचा हक्क दिला आहे. मी ही मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदारांनीही बाहेर पडून मतदान करावे असे आवाहन जिल्हा परीषदेच्या माजी सदस्या मानसी दळवी यांनी मतदारांना केले आहे. महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे हे शंभर टक्के विजयी होऊन लाखोच्या फरकाने प्रतिस्पर्धी यांचा पराभव करतील असा विश्वास ही त्यांनी बोलून दाखवला आहे.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: MLA Mahendra Dalvi exercised his right to vote with his family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.