मतमोजणीकरिता जिल्ह्यात यंत्रणा सज्ज; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 12:06 AM2019-05-12T00:06:58+5:302019-05-12T00:07:23+5:30

रायगड लोकसभा मतदारसंघाकरिता २३ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी २३ मे रोजी अलिबागजवळील नेहुली येथील रायगड जिल्हा क्र ीडा संकुलात होणार आहे.

District machinery ready for counting; Election Review Officers Take Review | मतमोजणीकरिता जिल्ह्यात यंत्रणा सज्ज; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आढावा

मतमोजणीकरिता जिल्ह्यात यंत्रणा सज्ज; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आढावा

Next

- जयंत धुळप

अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघाकरिता २३ एप्रिल रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी २३ मे रोजी अलिबागजवळील नेहुली येथील रायगड जिल्हा क्र ीडा संकुलात होणार आहे. मतमोजणीकरिता निवडणूक यंत्रणा जय्यत तयारीत असून, मतमोजणीच्या एकूण १५६ फेºया होतील. लवकरात लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती रायगड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघनिहाय होणाºया प्रत्येक मतमोजणी फेरीसाठी प्रत्येकी १४ टेबल असतील व १५६ फेºया होणार आहेत. त्यात सर्वाधिक २८ मतमोजणाच्या फेºया महाड विधानसभा मतदारसंघात आणि सर्वात कमी २३ मतमोजणीच्या फेºया गुहागर विधानसभा मतदारसंघाच्या होणार आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघासाठी अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड, दापोली, गुहागर अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण १६ लाख ५१ हजार ५६० मतदारांपैकी १० लाख २० हजार १४० मतदारांनी मतदान केले आहे. एकूण ६१.७६ टक्के मतदान झाले आहे.
सर्व प्रथम ईटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम) मते बारकोडद्वारे मोजली जाणार आहेत.
त्यानंतर पोस्टल बॅलेटद्वारे प्राप्त झालेली मते मोजली जाणार
आहेत.
रायगड लोकसभा मतदारसंघात ईटीपीबीएसचे एकूण १००५ मतदार व पोस्टल बॅलेटचे एकूण ९३९९असे एकूण १०८०४ मतदार आहेत. त्यापैकी आतापर्यंत अनुक्र मे ७५५ व ४८५५ अशी एकूण ५५६० मते प्राप्त झालेली आहेत सर्वप्रथम या मतपत्रिकांची मतमोजणी केली जाणार आहे.

२२ मे रोजी रंगीत तालीम
सर्व मतदारसंघाची टेबल व फेरीनिहाय मतमोजणी, पोस्टल बॅलेट व ईटीपीबीएस यांची मतमोजणी झाल्यानंतर निकाल घोषित केला जाणार आहे. मतमोजणीसाठी आवश्यक अधिकारी, कर्मचारी यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. मतमोजणी अधिकारी व कर्मचारी यांना ३० एप्रिल रोजी पहिले प्रशिक्षण देण्यात आलेले असून शनिवार १८ मे रोजी दुसरे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. मतमोजणीची रंगीत तालीम २२ मे रोजी नेहुली येथे घेण्यात येणार असल्याचे डॉ.सूर्यवंशी यांनी सांगितले.

मतदारसंघनिहाय आकडेवारी
मतदार मतदान मोजणी झालेले
संघ केंद्र फेºया मतदान
पेण 375 27 195567
अलिबाग 377 27 189713
श्रीवर्धन 351 25 152664
महाड 392 28 168580
दापोली 363 26 171907
गुहागर 321 23 141709
एकूण 2179 156 1020140

Web Title: District machinery ready for counting; Election Review Officers Take Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.