अनंत गीतेंच्या ‘सिंहावलोकन’वर कारवाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 06:20 AM2019-04-18T06:20:57+5:302019-04-18T06:21:18+5:30

शिवसेना-भाजपा युतीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार अनंत गीते यांची ‘सिंहावलोकन’ ही प्रचार पुस्तिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

Action on 'overview' of infinite songs! | अनंत गीतेंच्या ‘सिंहावलोकन’वर कारवाई!

अनंत गीतेंच्या ‘सिंहावलोकन’वर कारवाई!

Next

अलिबाग : शिवसेना-भाजपा युतीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार अनंत गीते यांची ‘सिंहावलोकन’ ही प्रचार पुस्तिका वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. प्रतींची संख्या आणि मुद्रक, प्रकाशकाचे नाव हा अनिवार्य मजकूर पुस्तिकेतून वगळण्यात आल्याने आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या वकिलांनी केली होती. त्यानुसार, अलिबाग शहर निवडणूक आचारसंहिता देखरेखप्रमुख महेश चौधरी यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार या पुस्तिकेचे मुद्रक व प्रकाशक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता नियम व लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ अन्वये प्रचार पुस्तिकेवर प्रतींची
संख्या आणि मुद्रकाचे नाव छापणे अनिवार्य आहे. मात्र, गीते यांच्या
प्रचार पुस्तिकेत हा मजकूर न
छापला गेल्याने, पुस्तिकेचे प्रकाशक अनिरुद्ध गांधी (मालाड, मुंबई)
आणि मुद्रक श्री. इंटरप्रायझेस, ५०१, गोरेगाव-पश्चिम यांच्या विरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम
१९५१च्या कलम १२७ (क)अन्वये
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पुस्तिकेचा वापर करणारे
शिवसेना-भाजप उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते मात्र नामानिराळे राहिले आहेत.
अनंत गीते यांचे वकील अ‍ॅड. एन. टी. रातवडकर यांनी ‘सिंहावलोकन’ पुस्तिकेच्या छपाईचे बिल निवडणूक अधिकाऱ्यांसमोर सादर केले. ही पुस्तिका प्रचार साहित्य म्हणून सक्षम अधिकाºयाकडून परवानगी न घेता वितरित झाले, तसेच त्यावर मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव नसल्याने आचारसंहितेचा भंग झाल्याचा
निष्कर्ष काढण्यात आला. त्यामुळे ही पुस्तिका छापून घेणारे प्रकाशक
अनिरुद्ध गांधी आणि मुद्रक श्री इंटरप्रायझेस यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १२७ (क) अन्वये पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे आदेश अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी दिले. त्यानुसार, अलिबाग शहर निवडणूक आचारसंहिता देखरेखप्रमुख व अलिबाग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश चौधरी यांनी अलिबाग
पोलीस ठाण्यात दाखल फिर्याद दाखल केली. त्यानंतर, पुस्तिकेचे मुद्रक व प्रकाशक यांच्याविरुद्ध
गुन्हा दाखल करण्यात आला.
>तटकरेंच्या वकिलाने केली तक्रार
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे यांचे वकिल अ‍ॅड. सचिन जोशी यांनी याबाबत रायगड निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
याबाबत अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी शिवसेना उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी त्यांना नोटीस बजावली होती.

Web Title: Action on 'overview' of infinite songs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.