मोठी दुर्घटना! महाडमधील तळीये गावात दरड कोसळली, ३५ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 01:31 PM2021-07-23T13:31:20+5:302021-07-23T13:37:27+5:30

landslides in Talai village in Mahad: एकीकडे चिपळून महाडसारखी शहरे पुराच्या विळख्यात सापडली असताना कोकणातील डोंगर कपारीत वसलेल्या अनेक गावांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

32 killed, many feared trapped under pile in Talai village in Mahad | मोठी दुर्घटना! महाडमधील तळीये गावात दरड कोसळली, ३५ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती 

मोठी दुर्घटना! महाडमधील तळीये गावात दरड कोसळली, ३५ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती 

Next

रायगड - गेल्या दोन तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणावर मोठे संकट आले आहे. एकीकडे चिपळून महाडसारखी शहरे पुराच्या विळख्यात सापडली असताना कोकणातील डोंगर कपारीत वसलेल्या अनेक गावांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. (landslides in Talai village in Mahad) महाडमधील तळीये गावातही अशीच मोठी दुर्घटना झाली असून, या दुर्घटनेत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप अनेकजण जमिनीखाली दबले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.  (32 killed, many feared trapped under pile in Talai village in Mahad)

मिळत असलेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी चारच्या रायगडमधील तळीये गावात दरड कोसळली. या दरडीच्या ढिगाऱ्याखाली गावातील सुमारे ३५ घरे गाडली जाऊन मोठी दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे या दुर्घटनास्थळावर मदत पोहोचवणे शक्य झाले नाही. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांनीच मदतकार्य सुरू करून येथील गाडल्या गेलेल्या घरांमधून तब्बल ३२ मृतदेह बाहेर काढले आहेत. तर अद्यापही ८० ते ९० मृतदेह ढिगाऱ्याखाली दबले गेले असल्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.  

घटनास्थळी एनडीआरएफ, पाेलिस, स्थानिक प्रशासन आणि काही संस्थांची बचाव पथके युध्द पातळीवर मदत करत आहे, अशी माहिती रायगडचे जिल्हा पाेलिस अधिक्षक अशाेक दुधे यांनी लाेकमतशी बाेलताना दिली. जखमींनी हेलीकाॅप्टरच्या सहायाने बाहेर काढण्यात येत आहे.महाड सावित्री पुरातील नागरिकांना एका हेलीकाॅप्टरच्या सहायाने बाहेर काढण्यात येते आहे. प्रशासनाला आणखी तीन हेलीकाॅप्टरची आवश्यकता आहे. ती मिळण्यासाठी वरीष्ठ स्तरावर बाेलणी सुरु आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यात चार एनडीआरएफच्या चार तुकड्या महाड येथील मदत कार्यात गुंतल्या आहेत.तळीये येथे गुरुवारी सायंकाळी दरड काेसळली हाेती, परंतू पुराचे पाणी आणि मार्गावर दरडी पडल्याने रात्री येथे बचाव कार्यात अडथळे येत हाेते. अडथळे दुर करुन आज दुपारी 12 वाजल्यापासून बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने बचावासाठी लागणारे साहित्य, अन्न पाकीटे, पाणी यांची व्यवस्था ठेवली आहे.-

खेडमध्ये दरड कोसळून १७ जणांचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या धामणंदनजीकच्या पोसरे बौद्धवाडीत शुक्रवारी दरड कोसळून १७ जण त्याखाली गाडले गेले आहेत. गेला आठवडाभर संततधार पाऊस पडत आहे. त्यात बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर अधिक झाला आहे. या मुसळधार पावसामुळे पोसरे येथील बौद्धवाडीवर दरड कोसळली. १२ घरांना त्याचा फटका बसला. त्यातील ६ घरे पूर्णपणे गाडली गेली आहेत. त्यात १७ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. २५ झानावरेही दरडीखाली गाडली गेली आहेत. प्रशासनाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तेथे संपर्क होत नसल्याने यंत्रणाही हतबल झाली आहे.

Read in English

Web Title: 32 killed, many feared trapped under pile in Talai village in Mahad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app