पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 23:56 IST2026-01-11T23:29:14+5:302026-01-11T23:56:34+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात एक मुलाखत पार पडली. या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी मोठं भाष्य केले.

पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचार सभांमधून आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, आज (रविवारी) पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक मुलाखत पार पडली.यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली असून मोठं भाष्य केले.
यावेळी या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातून निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी मोठा खुलासा केला. माझं फक्त पुण्यावर प्रेम आहे. मी निवडणूक मात्र नागपूरमधूनच लढवणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
यावेळी मुलाखतीमध्ये विचारण्यात आले की, अनेक नेत्यांच्या भाषणातून असे समोर येते की तुमचे पुण्याकडे खास लक्ष आहे. आम्ही असे ऐकले की तुम्ही पुण्यातून निवडणूक लढणार? या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, “या ठिकाणी मुरलीधर मोहोळ बसलेत, दादा या ठिकाणी बसलेत. आमचे चांगले चालंलय, नागपूरकरांचे माझ्यावर मनापासून प्रेम आहे. सहा-सहा वेळा त्यांनी मला निवडून दिले आहे. त्यामुळे पुण्यावर फक्त प्रेम ठेवायचे, पण निवडणूक नागपूरमधूनच लढवायची आहे, असंही फडणवीस म्हणाले.
पाताल लोक तयार करणार
पुण्यात २३ नवीन उड्डाण पुल सुरू करणार आहोत. ८ चे काम सुरू झाले आहे. १५ चे काम येत्या तीन महिन्यात सुरू होईल. २० ते २५ वर्ष तोडावे लागणार नाही असे उड्डाण पूल तयार करणार आहोत. पुण्यात खाली जागा उरली नाही, वरतीही जागा नाही. त्यामुळे पुण्यात पाताल लोक तयार करणार आहे. टनेल सेक तयार करणार आहोत. त्या टनेलचं कंम्पिलट प्लानिंग केलं आहे. ५४ किलोमीटरचे टनेल तयार करणार आहोत. येरवडापासून ते कात्रजपर्यंत, पाषाण कोथरूड, औंध संगमवाडी टनेल तयार करणार आहोत. ३२ हजार कोटी रुपये लागणार आहे, असंही फडणवीस म्हणाले.