kasba Vidhan Sabha 2024: आम्ही केले, तुम्हीही मतदान करा! तृतीयपंथीयांचे मतदारांना आवाहन
By श्रीकिशन काळे | Updated: November 20, 2024 14:57 IST2024-11-20T14:56:47+5:302024-11-20T14:57:53+5:30
समाजातील प्रत्येक घटकाला मान, सन्मान मिळण्यासाठी आणि त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी हा अधिकार गाजवायला हवा

kasba Vidhan Sabha 2024: आम्ही केले, तुम्हीही मतदान करा! तृतीयपंथीयांचे मतदारांना आवाहन
पुणे : शहरातील तृतीयपंथीय मतदारांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी नागरिकांनी घराबाहेर येऊन मतदान करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ती तृतीयपंथीय कादंबरी यांनी केले.
विधानसभेसाठी आज निवडणूक होत आहे. मतदान केल्यानंतर प्रत्येकजण आपले फोटो शेअर करत आहेत. त्यामध्ये तृतीयपंथी मतदार देखील मागे नाहीत. त्यांनीही मतदान केल्यानंतर इतरांना मतदान करण्याचे आवाहन केले. ‘‘आपला हक्क आणि अधिकार गाजवण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. आपल्या हक्काच्या आणि आवडत्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मतदानाचे कर्तव्य बजावायला हवे. समाजातील प्रत्येक घटकाला मान, सन्मान मिळण्यासाठी आणि त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी हा अधिकार गाजवायला हवा. समाजामध्ये एकोपा टिकविणे गरजेचे आहे. तृतीयपंथीय लोकांना आरक्षण दिले पाहिजे. त्या मागणीसाठी मी लढत आहे. समाजात बदल करण्यासाठी म्हणून आम्ही तृतीयपंथी मतदान करत आहोत,’’ असे कादंबरी यांनी सांगितले.